वाह ..... अनमोल माहिती मिळाली , हे कधी ऐकले नव्हते , मधुरा ..... खरंच मन : पूर्वक धन्यवाद की ह्या सगळ्या भागांतून , अक्षरशः खजिना सापडल्याचा आनंद मिळतोय . कमालच .... तुम्हा सगळ्यांचे खूपच कौतुक .... ❤❤❤❤ . एक गोष्ट विचारायची आहे की , " मधुरव " चा प्रयोग , बोरीवली , येथे केव्हा होणार आहे ? ते कृपया सांगाल का ? मनापासून पाहायचा आहे . मनापासून वाट पाहात आहोत .....
🎊सर्व प्रथम आपणास आणि आपल्या मधूरवच्या संपूर्ण संचास दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!🙏 मागच्या महिन्यात आम्ही मथुरेला गेलो होतो तेव्हा यमाच्या मंदिराचे दर्शन घेतले. पण आता त्याची कथा कळली खूप छान वाटलं. अशीच ज्ञानात भर घालणारी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मनापासून धन्यवाद!
दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा मधुरा तुझ्या कडून अनेक महत्त्वाची माहिती अनेक विडिओ तुन तु देत असते. ज्या कधी वाचनात, किंवा न ऐकलेल्या संस्कृतील अनमोल असा खजिना तु आमच्या समोर घेऊन येत असते.तया साठी खुप खुप धन्यवाद आणि तुझ्या वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा
खरंच. असे व्हिडीओ करणं सोपं नाहीच, तर अवघड आहे. प्रत्येक भागाला खूप वाचन करून , माहिती गोळा करून, ती संकलित करणे, म्हणजे मोठेच काम. शिवाय अतिशय रसाळ आणि मधुर (नावाप्रमाणेच) भाषेत सादरीकरण करणे हे ही विशेष. उदंड प्रतिसाद लाभो ! अशी शुभेच्छा !!
अप्रतिम! फारच सुंदर!मराठीविषयीची तळमळ कळते आणि भावते.मराठी ....माझीही आवडती भाषा 10:47 आहे.तुझ्या या उपक्रमाला खूप शुभेच्छा 🌹मला ही कथा माहिती होती. वडिलांनी सांगितली होती.कदाचित म्हणूनच रात्र =यामिनी म्हणत असावेत का?
खूप छान माहिती दिलीत. आमच्या विदर्भात आहे पाडव्याला वडील,.सासरे यांना ओवळण्याची पद्धत. तूझ्या व्हिडियो तून खूप विविध माहिती मिळते आहे. खूपचं छान अभिनव उपक्रम. आपली संस्कृती नव्याने आम्हला तू दाखवते आहेस. खूप खूप. आभार. ऐक विनंती, मधुरव बोरू ते ब्लॉग नागपुरात घेऊन यावं. आम्ही नागपूरकर वाट पहात आहोत.
५०००वर्ष जुनी भाषा आहे, भविष्य पुराणात सांगितले आहे मराठी, ५००० वर्ष जुनी आहे पाडवा ला मुली सुना वडील सासरे काका ना ओवाळतात नाही यमयमी चा कथात काही सत्य नाही, यम कधी च़ मनुष्य नवता तो आधी पासुन च़ देव आहे, शनि, यम, यमुना, अर्यमा हे सर्व सूर्य पत्नी छाया चे अपत्य आहे