खुप खुप आभार एक सुंदर शास्त्रीय गाण्याची मेजवानी दिल्याबद्दल. श्री आनंद भाटे अप्रतीम गायन. डॉ समिरा गुजर-जोशी बहारदार व मनोरंजक माहितीयुक्त सूत्रसंचालन. 🙏🪔🙏
दिवाळी पहाट सुरेल आणि आनंदी केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आमच्यावेलची आठवण झाली. आमच्यावेळी दिवाळीत नाटकंची मेजवानी असायची. आज नाटक नाही पण नट्यागीते ऐकायला मिळत आहेत.
स्मृती गंधच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते ह्यांना दिवाळीच्या मनपुर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद इतक्या सुंदर दिवाळी पहाट च्या महिफिली साठी घर बसल्या इतकी सुंदर दिवाळी पहाट महिफील ऐकायला मिळाली ❤❤
गतकाळातील दिग्गज कलाकारांची माहिती करून देणारे हे तिघेही आजच्या काळातील दिग्गज आहेत...समीराताई तर विदुषी आहेत... प्रचंड अभ्यास पुन्हा गोड मृदू सु संस्कृत व्यक्तिमत्व आहे.
शुभ दिपावली दिवाळीच्या सकाळच्या विलोभनीय सौम्य शांत वातावरणात आनंद गंधर्व या़चे हृदयस्पर्शी स्वर अहाहा....केवळ अप्रतिम 🙏👌 स्मृतिगंध च्या संपूर्ण टीमला आणि सर्वांना खूप खूप धन्यवाद आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. 🙏🙏🙏
नात्यांचा गोडवा व सुखद गारवा दिवाळीची पहाट आज सुखद गारव्याने आनंदली थंडीच्या सहवासात घराघरात जमलेली नाती सुखावली सकाळची प्रसन्न हवा हवेत सुखद गारवा दिवाळीच्या दिवसात हवा उबदार नात्यांचा गोडवा सुंदर फराळाच्या साथीला वाफाळता चहा हवा असा दिवाळीचा नात्यांचा माहोल वाटतो नेहमी हवा हवा शुभ सकाळ वर्षा छत्रे
झी .टी.व्ह.च्या सारेगम ह्या इ.स. २००० च्या आधी आलेल्या रिअॅलिटी शो मध्ये बेगम परविन सुलताना प्रमुख अतिथी परिक्षक होत्या . महाराष्ट्रातील मराठी स्पर्धक व्यासपीठावर गायल्यानंतर प्रतिक्रिया देतांना बेगम परवीन सुलताना म्हणाल्या होत्या की , महाराष्ट्रमे संगीत की पूजा होती है । मला फार आवडली ही प्रतिक्रिया ! एका आसामी मुसलमानी गायिकेने केलेली महाराष्ट्रातील संगीताची भारी च प्रशंसा !
मला श्री आनंद भाटें ना विनंती करायची आहे की ते लहान असतांना तुझाच छकुला तुझाच गे मी माऊली.गोकुळ राखी गोधना .नंदबाळ मी कान्हा.हे गाणं ऐकवाल का.बरेच वर्षांत ऐऐकल नाही.तेव्हा तुंम्ही एक सात ते आठ वर्षाचे असाल.तेव्हा तुंम्ही म्हटलेल हे गाणं आंम्ही ऐकलय.तेव्हा ब्लॅक अँड व्हाईट टी.व्ही. होते. हे तुमच गाणं आंम्हाला फार आवडते.मी हे गाण घरात काम करतांना गुणगुणते.मी 70 वर्षाची आहे.मला हे आवडेल ऐकायला.