एकदम सुंदर व्हिडीओ. जे कव्हर केले ते अप्रतिम आहे. सरळ भाषा. जे आहे ते दाखवले आहे. आजीला देठाची पाने दिल्यावर जे चेहेऱ्यावर समाधान दिसले त्याला तोडच नाही. कोकण एकदम बेस्ट.
भेल्वाल्याच्या दहा रुपयाचे टेंशन नका घेऊ. मी पाच फेब ला जर माझ्या गावी म्हणजे करंजाडी ला गेलो आणि तो भेल्वाला आला तर मी देईन त्याचे पैसे. हे सगळे आपले लोक आहेत.
रोशन भाऊ, तुम्ही लोकांना पुन्हा दिवा सावंतवाडी गाडीने गावी येण्याची ओढ लावली. तशी ही गाडी बारा महिने फुल्ल असते. पण तुम्ही खरंच चांगलं चित्रीकरण करून हा प्रवास म्हणजे जत्रोत्सव असतो हे दाखवून दिलं. खरंच खूप छान.
मस्त व्हिडीओ. जुने दिवस आठवले नोकरीं निमित्त रोज पनवेल तें वीर या गाडी ने 8 वर्ष प्रवास केला व्हिडीओ च्या निमित्ताने सर्व फेरीवाले भाऊ बहिणी चे दर्शन झाले बरे वाटले
एकदम मस्त व्हिडीओ,तुमचे खूप खूप अभिनंदन, व आपणास खूप खूप धन्यवाद कारण तुमच्या मुळे प्रत्यक्षात आम्हाला दिवा, सावंतवाडी रेल्वे (कोकणरेल्वे चा प्रवास )प्रवास केल्या सारखं वाटले प्रवासातील गमती जमती प्रेमळ कोकणी माणसांचा सहवासात असल्या सारखं वाटले तुमच्या प्रेमळ मातोश्री, आजी, मामा यांना भेटून आमचेच घरचे लोक भेटल्या सारखे वाटले. 👍👍👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
@@YesMaharaja कोकण आणी अगत्यशीलता.. आपण उपशि रहिलोतरी चालेल पण घरी आलेल्या पावण्याना आपण खायला प्यायला देतो ही आपली संस्कृति… भेळवाला पाटिल काही कमी पड़ला नाही.. भेळ विकून चरितार्थ करतो पण विचार किती उच्य.. आणी तुमचे पैशे पण घेतले नाही… डोळे पाणवले… अशे आपले कोकण आणी आपली माणसे.
रोशन भाई प्रवास खूप छान झाला.प्रवासामध्ये खाऊ घेतलास पण पैसे नाही घेतले असच प्रेम राहुदे सगळ्यांचं तुझ्यावर मस्त व्हिडिओ होता आणि छान होतात.भेलवाले आणि इतर यांची खूप मेहनत आहे.
Dada mi ratnagiri pavs mde rahate tuze व्हिडिओ atach पाहायला लागली ahe pn bghun khup chan vatat आपल्या कोकण पाहायला मिळत रोज तास मी मुंबई ला राहते आणि जास्त येणं होत नाही आपल्या कोकणात खरचं खूप छान काम करतोय तू तुझ्या पोडील वाट चाळीस खूप खूप शुभेच्छा
यश महाराजा (कोकण दर्शन)लयच भारी विडीओ भन्नाट झाला आहे. आजी चा हसरा चेहरा बघायला भेटला रे आज. रेल्वे मधल्या बाकीच्या प्रवाशांना काय शिल्लक ठेवले की नाय.
रोशन तुझे सर्व विडियो छान असतात पण हा दिवा ते राजापूर अप्रतिम झाला भेळवाले भाऊ खूप छान बोलून लोकांना भेळ घ्यावसी वाटणार प्रवास तू एकटा नव्हता करत तर आम्हीपण करत होतो अस वाटत होत माहिती पण छान दिली खरेदी तर खूप केली आवडला विडियो
कोकण रेल्वे ने एक वेळ प्रवास करायलाच हवा .त्याशिवाय कोकण समजत नाही. आमच्या खानदेश मध्ये सूरत-भूसावल पॅसेंजर मध्ये अशीच मजा येते. मी मंगला एक्सप्रेस ने कोकण पाहीला आहे. A.C.चे तिकिट काढलं होतं तरीही दरवाजात ऊभा राहून कोकण पाहीला. मजा येते.
Mushkil se aaj time mila.RU-vid pe browsing kar raha tha.aapka channel first time dekha.turant subscribe kar diya.Ek number video. Bachpan ki yaad dila di. Hum bachpan me Mumbai to Jabalpur jaate the train se. Majaa aata tha jab chaiwale, vadapav wale, snacks aur khilonewale aate the train me aur humlog mom-dad se jidh karke kharida karte the.
दिवा-सांवतवाडी पँसेजर..जी आता फक्त जास्त पैसे उकळण्यासाठी रेल्वेने या गाडीला एक्सप्रेस केली..पण सुविधा काही नाही.. पँसेजर प्रमाणेच तळकोकणात खूप उशिरा पोहचते....दादर-रत्नागिरी गाडीला मात्र पँसेजर ठेवले...तळकोकणातल्या प्रवाशांवर हे अन्यायकारक आहे