नमस्कार ताई माझा प्रश्न असा आहे की जर महालक्ष्मीदेवी चा फोटो नसेल तर काय करावं? आणि आपण ज्या ज्या देवांच्या मूर्ती पूजेसाठी मांडल्यात त्या नेहमीच्या देवघरातल्या आहेत की वेगळ्या ठेवलेल्या आहेत? आणि जर ते देवघरातील आहेत तर तो पर्यंत ते रिकामं स्थान तसचं ठेवावे की त्याठिकाणी अजून काय ठेवावे Plz reply ताई.
मी मांडलेल्या मूर्ती आमच्या देव्हाऱ्यातल्याच आहेत पण तुम्ही माझे व्हिडीओ नेहमीच पाहत असाल तर कदाचित तुम्हाला प्रश्न पडला असेल की माझ्या देवघरातील मूर्ती तर वेगळ्या आहेत. धनत्रयोदशीचे व्हिडीओ शुट माझ्या गावी केले असल्याने तिथल्या घरच्या देवघरातील या मूर्ती आहेत. फोटो नाही तर धनत्रयोदशीच्या निमित्ताने घेता आला तर पहा ताई,अन्यथा सर्व देवांच्या नावाने तुम्ही सुपार्या देखील पूजू शकतात
ताई 1st time पूजा करणारे त्यामुळे हे सगळे प्रश्न आहेत. तरीही confusion तेच आहे की देवघरातील त्या त्या मूर्तीची जागा तो पर्यंत तशीच रिकामी ठेवावी का म्हणजे जो पर्यंत उत्तर पूजा करून पुन्हा त्यांना देवघरात ठेवत नाही तो पर्यंत?
@RJ0207 हो उत्तर पूजा होईपर्यंत त्यांची जागा रिकामी राहते पण दुसरीकडे आपण त्यांना पूजा मांडणीत ठेवतोच ना त्या दिवशी. सणावारांच्या पूजेत देवघरातील च मूर्तींची वेगळीकडे मांडून पूजा होते एवढाच फरक आहे,नवीन मूर्ती नाही घेत
नमस्कार ताई. मला लक्ष्मीमाता आणि कुबेराची स्थापना करायचीय तर धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मीमाता आणि कुबेराची पूजा करून स्थापना करू की लक्ष्मीपूजन ला करू? आणि जर धनत्रयोदशी ला पूजा करून स्थापना केली तर पुन्हा लक्ष्मीपूजनच्या दिवशी पण सगळं मांडून पूजा करायची का?
धनत्रयोदशीला करा पूजा व स्थापना. आणि धनत्रयोदशीला स्थापना झाली असल्याने तुम्ही लक्ष्मीपूजनाला पुन्हा पूजा मांडा. आधीच तुमच्या कडे लक्ष्मी व कुबेरजी होते असं समजून