Тёмный

धूतपापेश्वर (राजापूर) - पाप धुवून टाकणारा ईश्वर || Dhutpapeshwar Temple- Rajapur|| कोटीतीर्थ धबधबा 

ctararider
Подписаться 202
Просмотров 275
50% 1

धूतपापेश्वर (राजापूर) - पाप धुवून टाकणारा ईश्वर || Dhutpapeshwar Temple- Rajapur|| कोटीतीर्थ धबधबा
/ @googler_sid
धूतपापेश्वर हे रत्‍नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातील धोपेश्वर गावामधील प्रसिद्ध शिवमंदिर आहे. राजापूर शहरापासून सुमारे ५ किलोमीटरवर अंतरावर हे गाव लागते. सोमवारी आणि महाशिवरात्रीला येथे प्रचंड गर्दी होते.
मंदिराशेजारी काळ्या कातळावरून खाली झोकून देणारा मृडानी नदीचा प्रवाह आहे. कोसळणाऱ्या पाण्याचा एक नितांत सुंदर धबधबा होतो. धबधब्याची खरी शोभा ऐन पावसाळ्यात दिसते.वरून खाली पाणी जेथे कोसळते तेथे एक डोह बनला आहे. त्याला “कोटितीर्थ" म्हणतात.
१) मंदिराशेजारून वाहणारी मृडानी नदी आणि या नदीवरील आकर्षक छोटे छोटे धबधबे. पावसाळ्यात त्याचे सौंदर्य अधिकच खुलते.
२) संपूर्ण मंदिर परिसरावर निसर्गाने मुक्त हस्ते सौंदर्याची उधळण केली आहे. गर्द झाडीत हे मंदिर वसलेले आहे.
३) मंदिराच्या सभामंडप आणि गर्भगृहावरील छतावर, खाबांवर,तुळयांवर ज्या प्राण्यांची,वनस्पतींची, फुलांची चित्रे काढून शिल्पकला केली आहे ते प्राणी वगैरे त्या मंदिर परिसरात आढळनारेच आहेत. उदाहरणार्थ - शंकराला वाह्याला जाणाऱ्यारा कैलासचाफा या आकर्षक फुलाचे झाड हे या एकमेव ठिकाणी पहायला मिळते.
४) मंदिर परिसरातील खांबांवर आणि भिंतीवर चित्रांसाठी व शिल्पकलेवर वापरलेले रंग पूर्णत नैसर्गिक म्हणजे पाने, फुले झाडाची साल यांपासून तयार केलेले रंग आहेत.
५) दररोजच्या पूजेत मांडलेल्या समयांवर इ.स.तारीख आहे त्यामुळे हे मंदिर किती प्राचीन असणार आहे याची कल्पना येते.
६) दररोज रात्री शेवटची महापूजा होते आणि शंकर-पार्वती यांच्यासाठी सारीपाटाचा (सोंगट्यांचा) खेळ मांडला जातो, . आणि गर्भगृहाचा दरवाजा बंद केला जातो. दुसऱ्या दिवशी पहाटे आरतीसाठी दरवाजे उघडतात तेव्हा ह्या सोंगट्या विखुरलेल्याले आढळतात. असे दररोज होत नाही आणि होईलच असे नाही शक्यतो (सोमवार, गुरुवार, अमावास्या, महाशिवरात्र, श्रावण सोमवार) यावेळी जास्त होते. येथील भाविकांची श्रद्धा आहे की भगवान शंकर-पार्वती येते येऊन सारीपाट खेळून जातात.
७) राजापूरची गंगा ज्यावेळी प्रकट होते त्यावेळी लोक प्रथम उन्हाळे येथे जाऊन गरम पाण्याच्या प्रवाहात आंघोळ करतात, नंतर राजापूरच्या गंगेत स्नान करतात. आणि राजापूरच्या अर्जुना नदीपात्रातील पुंडलिकाचे दर्शन घेऊन धूतपापेश्वरला अभिषेक करतात. असे केल्यावर कशीविश्वेश्वराचे दर्शन पूर्ण होते अशी भावना राजापूर आणि आसपासच्या गावातील भाविकांची श्रद्धा आहे.
८) धूतपापेश्वर मंदिराच्या बरोबर मागे कामेश्वराचे मंदिर आहे राजापूर व आसपासच्या गावातील एखादे जनावर आजारी पडले किंवा दूध देत नसेल तर या मंदिरात नवस केला जातो. त्यांचे जनावर ठणठणीत बरे होते. असा अनुभव ग्रामस्थांना आहे.
९) धोपेश्वर गावात नखे वाढवण्याचा जागतिक वर्ड रेकाॅर्ड मध्ये दुसऱ्या क्रमांकवर असणारी वसंत ठाकूर ही व्यक्ती राहते. त्यांचा पत्ता विचारल्यावर येथील मंदिरातील पुजारी किंवा ग्रामस्थ सांगतात.
१०) थोरल्या माधवराव पेशव्यांनी या मंदिराला भेट दिली होती त्यांनी मंदिरासाठी शाळिग्राम भेट दिला होता.तो आजही धोपेश्वर गावातील ग्रामस्थं धोंडूमामा करंबळकर यांच्या घरात पहायला मिळतो.
११) तसेच पेशवेकाळातील सरदार बिनीवाले यांनी भगवान शंकराच्या पिंडीवर सोन्याचा मुकूट भेट दिला होता.जो आजही पुजेत वापरतात.
१२) महाराष्ट्र शासनाने youtube वर www.ratnagiri.tourisam.in या वेबसाईटवर रत्‍नागिरी जिल्हयातील मुख्य पर्यटन स्थळांची फोटो व video सहीत माहिती दिली आहे. यात धूतपापेश्वर मंदिराला अग्रस्थान दिले आहे. धूतपापेश्वर मंदिर, मृडानी नदी आणि धबधबा यांचे ड्रोन कॅमेरामधून टिपलेले विहंगम दृश्य पहायला मिळते.
विडिओ ला लाईक करा आणि चॅनेल ला subscribe करून बेल icon दाबा म्हणजे माझे नवीन सर्व विडिओ तुमच्याकडे पहिले पोहचतील.
विडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल खूप आभार.
गुरुनाथ गोपाळ कातकर
शिवडी.

Опубликовано:

 

10 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 6   
Далее
İlham Əliyev və Vladimir Putin görüşü başladı
00:17