यशोदे कृष्णाला सांगावे । गोकुळी रहावे का जावे ॥ १॥
अवघ्या मिळोनी गौळणी । जात होत्या मथुरे बाजारी ॥
उभा हा कृष्ण वाटेवरी । गोकुळी रहावे का जावे ॥२॥
अनया गवळी करी धंदा । त्याची गौळण मी राधा ।
जावूनि नंदशी सांगावे । गोकुळी रहावे का जावे ॥३॥
पेंद्या सुदामाची जोडी । बळी भद्र त्याचा गडी ॥
कृष्णाला उखाळाशी बांधावे । गोकुळी रहावे का जावे ॥४॥
देव विधीचा जनिता । भानुदास चरणी ठेवी माथा ॥
प्रभुच्या चरणासी लागावे । गोकुळी रहावे का जावे॥५॥
कृष्णाला सांगावे l गोकुळी रहावे का जावे ll
#bhajan #abhang #dindi #music #palkhisohla #marathi #reelsinstagram #pandharpurvari #bmw #santtukarammaharaj #भजन #भजन_कीर्तन_कार्यक्रम #भजनीमंडळ #भजनचाल
24 окт 2024