विठोबाचें नाम ज्याचे मुखीं नित्य । त्या देखिल्या पतित उद्धरती ॥१॥ विठ्ठलविठ्ठल भावें म्हणे वाचे । तरी तो काळाचे दांत ठेंची ॥ध्रु.॥ बहुत तारिले सांगों किती आतां । ऐसा कोणी दाता दुजा नाहीं ॥२॥ तुका म्हणे म्यां ही ऐकोनियां कीर्ती । धरिला एकांतीं हृदयामाजी ॥३॥