Тёмный

' नदीकाठी मठात | शून्यगर्भात | ' - रोहिणी गणपुले - भक्तीगीतमाला पुष्प ५  

Krishnakamal कृष्णकमळ
Подписаться 356
Просмотров 932
50% 1

' नदीकाठी मठात ' ,या भक्तीगीतमालेचे हे .पाचवे .पुष्प ', 'नदीकाठी मठात| शून्यगर्भात || ', रसिकांना सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे.
प्रत्येकजण,नदीकाठी असलेल्या माउलींच्या मठात, जातो. तेव्हा त्याला कधीतरी, आतापर्यंत न आलेले अनुभव, येतात. त्यात असणाऱ्या शांत भक्तीभावाचा उद्गार डॉ माधव पुराणिक यांच्या या कवितेत आहे.
मठाचा परिसर देऊळे ,पशुपक्षी आणि वनराई,यामुळे रमणीय झाला आहे. त्याला ,मठातील साधुपुरूषाची, त्याच्या तपसामर्थ्याची जोड मिळालेली आहे.
मी मठात जेव्हा जातो तेव्हा दु:खाने पापण्या मिटू लागतात आणि ते दु:ख एक एक थेंब होऊन मठातल्या शून्यात नाहीसे होते. मठात शोकाकुल माणसे तुटलेली नाती, मठातल्या पोकळीत नाहीसे होताना पाहत असतात.
मठात जेव्हा आरतीचा सुरवात होते, तेव्हा मनातील उदासीनता कमी होत जाते. मठात मंत्रघोष चालू असतात.मला जाणवते कि माझे कामना आणि कांतेकडे जाणारे भाव अवकाशात नाहीसे होत आहेत.
मग शेवटी हरिनामाचा गजर सुरू होतो. तो तर या काळोखाला आपल्यात कधी सामावून घेतो ते कळत सुद्धा नाही. मठात प्रथमच असे होते कि माउलीच्या ओव्या म्हणताना मनाला, काही मागावेसे वाटत नाही.
मी मठात जातो आणि समाधी मंदिराकडे पाहतो तेव्हा मला कांतेची जागा रुक्मिणी घेताना दिसते. मी मठात जातो तेव्हा माझे मन, बुध्दी, अहंकार आणि प्राण तेथील आत्मप्रकाशाशी एकरूप होतात.
मी माऊलींच्या समाधीकडे पाहत असतो. कधीतरी अचानक त्यांचा कृपा कटाक्ष माझ्यावर पडल्याचा मला भास होतो.
नदीकाठी मठात विलक्षण खेळ चाललाय असे वाटते. अव्यक्तातून व समाधीतून कोणीतरी मला त्याची जाणीव करून देत आहे असे वाटत राहते.
' नदीकाठी मठात | शून्यगर्भात | या भक्तीगीताच्या अभिवाचनात रोहिणी गणपुले यांनी मनातील भक्तीभावाची आर्तता, तरलपणे,सुरेलपणे व्यक्त केली आहे. कवितेतलाआध्यात्मिक भाव अमूर्त अर्थाची प्रतीती देत हळूवारपणे श्रोत्यांपर्यंत पोचविला आहे.
श्री.मुकुंद फडकले यांची उत्तम छायाचित्रे पण या गूढ,अदभुत भावाला साजेशी आहेत.

Опубликовано:

 

15 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 11   
@mukundujalambkar3497
@mukundujalambkar3497 2 года назад
खूप छान भक्तीगीत.सुंदर कल्पना.अभिनंदन.🙏🌷
@hemamaggavi4035
@hemamaggavi4035 2 года назад
निवेदन आणि काव्यवाचन दोन्ही छान
@madhavdhekney8653
@madhavdhekney8653 2 года назад
चांगली सादर केली आहे.
@devyanihinge1
@devyanihinge1 2 года назад
👌🙏💐
@prashantragade7739
@prashantragade7739 2 года назад
Awsome sir
@swatikamtikar3274
@swatikamtikar3274 2 года назад
Khup sundar 👌👌
@shubhangikamble2087
@shubhangikamble2087 2 года назад
Khup chan
@padmashreegaikwad12
@padmashreegaikwad12 2 года назад
Very nice
@ananttinaikar3534
@ananttinaikar3534 2 года назад
Maast. Sundar
@kanchanshende1286
@kanchanshende1286 2 года назад
सुंदर!
@vijaykumarnale2473
@vijaykumarnale2473 2 года назад
मठ कुठे आहे, पत्ता सांगा
Далее
9월 15일 💙
1:23:23
Просмотров 1,1 млн