नाचणीचे कूकी हा खूप healthy option आहे.. लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल अशी ही healthy कूकी केक रेसिपी आहे... त्यात साखर न वापरता गुळ पावडर वापरल्यामुळे पौष्टितकता आणखीन वाढते..
तुम्ही हे नाचणीचे कुकी केक नक्की करून बघा आणि कंमेन्ट बॉक्स मध्ये नक्की कळवा कशी झालीये ते..
याला सॉफ्ट बिस्किटे असही म्हणता येईल... केक,बिस्किटे करताना प्रमाण व्यवस्थित घेणं खूप आवश्यक आहे.. 1 कप सांगितले तर खूप दाबुन पीठ मोजायची नाहीये हलक्या हाताने भरून जास्तीचं पीठ काढून लेव्हल करून घ्यावी.. म्हणजे आपले चाके बिस्कीट बिघडणार नाहीत, मस्त होतील.. शक्यतो measuring cups आणि spoons वापरा...
नाचणीच्या बिस्कीट साठी लागणारे साहित्य
नाचणी पीठ 1 कप
गव्हाचं पीठ 1/2 कप
खोबरा किस 2 टेबलस्पून (ऑपशनल)
घरच साजूक तूप 1/2 कप + 2 टेबलस्पून
गुळ पावडर 1/2 कप
बेकिंग पावडर 1 टीस्पून
चोकॉचिप्स डेकोरेशन साठी
टिप : खोबऱ्याचा किस ऑपशनल आहे,टाकत असाल तर वर दिल्याप्रमाणे तुपाचे प्रमाण घ्या.. टाकत नसाल तर तुप फक्त 1/2 कप घ्या...
#biscuit_recipe#cake_recipe
17 сен 2020