#वासुदेवसंगीतसभा #vasudevsangeetsabha
वासुदेव संगीत सभा, श्री वेद वासुदेव प्रतिष्ठान, पुणे
निवेदन: श्री अजित कृष्ण तुकदेव.
मुख्य गायिका : रेणुका भृगुवार
||श्री श्रीमद् सद्गुरूसंग||
“कष्ट सर्व वारी । नरहरी कष्ट सर्व वारी”
साऱ्या मानवजातीला भयमुक्त ,संकटमुक्त करण्यासाठी श्री प. प. थोरल्या स्वामीमहाराजांची यवतमाळ जिल्ह्यातील अंजी येथील प्राचीन हेमाडपंथी श्री लक्ष्मीनरसिंह मंदिरातील रचना होय.एका रात्रीच्या मुक्कामात प्रत्यक्ष भगवंताशी संवाद व सारांच्याच कष्टनिवारण्यासाठी प्रार्थना.हि रचना एक थेट संभाषण, दर्शन,सवांद व पूर्ण कृपेची मागणी होय.
भगवान विष्णू यांचा चौथा अवतार महादैत्य हिरण्यकश्यपूच्या पोटी,साक्षात विष्णूंचा नामावतार प्रल्हाद जन्म घेते झाले.अत्यंत कठोर तपश्चर्येने भगवान ब्रह्मदेवांना प्रसन्न करून अजेय वरदान मागून घेतले.आजही दैत्य मानवाच्या वागण्यातून कृतीतून अत्याचारांची पराकाष्ठा करीत आहेत.दैत्यानाच का वर देतात?एवढी तपाची ताकद दैत्यांना कुठून प्राप्त होते? तपानंतर एवढे क्रौर्य कसे प्राप्त होते व भावंताशीच कृतघ्नता कशी निर्माण होते
नरसिंह पूर्ण,एक उपपुराण भगवान व्यासांची एक रचना त्यातून ही सारी कथा उलगडत जाते.
आज नरसिंह प्रकट दिन वरा प्रमाणे अभय मिळालेल्या हिरण्यकश्यपूला प्रल्हादांच्या विंष्णूभक्तीने प्रचंड संताप क्रौर्य स्वतःच्या मुलाला मारण्याचा आदेश त्यावेळी क्रोधीत होऊन ना आत बाहेर ,ना आकाशात ना जमिनीवर ,ना दिवसा ना रात्री ,ना शस्त्राने ना अस्त्राने ,ना मनुष्य ना प्राणी अशा सर्व अघटित रूपाने धड मनुष्याचे व मस्तक सिंहाचे असे उग्र भयानक रूप धारण करून प्रत्यक्ष मांडीवर नखाने पोट फाडून दैत्याचा महानाश केला तो हा दिवस तिथी क्रोध वेळ-काळ.
आज ही भारत व अनेक राष्ट्रे दैत्य ताकदी समोर हतबल होत आहेत-.नरसिंह अवतार हा केवळ पूजन नवरात्र व आरतीचा विषय नसून सामर्थ्याचा समाजात अविष्कार होवो.हा नरसिंह(दाह) तुमचा माझा दाहक शांत करून सर्व कष्टांचे निवारण करो.
हीच महाराजांची प्रार्थना व आपल्यासाठी अनुसरण .
वासुदवांचे चरण ...
6 сен 2024