हे ईश्वरा सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव ,सर्व पोलिस भरती करिता आलेल्या तरुण महिला ,पुरुष उमेदवारांची निवड प्रक्रिया सुखरूप,यशस्वी पने यश होऊ दे,सर्वांना त्यांच्या मना सारखे पद मिळू दे. सद्गुरू वामनराव pai, जीवन विद्या मिशन.
माझ्या सर्व भाऊबहिणींना पोलीस भर्ती च वर्षानुवर्षे अभ्यास करणारे आणि स्वप्न पाहणाऱ्यांना मनःपुर्वक शुभेच्छा सर्वाच स्वप्न पूर्ण हो हिच गणपती बाप्पा कडे प्रार्थना करेल🙏 मित्रांनो परिक्षेच्या दरम्यान तुम्हाला नकारात्मक विचार मनात आले तर एकच लक्षात ठेवा.. मी वर्षभर मेहनत केलीय.. आज मी मैदान गाजवले नाही तर माझ आयुष्य कधी बदलेल.. ज्या आई बाबानी मला लहानापासून मोठ होईपर्यंत वाढवले त्यांच्यासाठी आज मला मैदानात स्वतः ला सिद्ध करायचे आहे... मला ज्यांनी नावे ठेवले ज्यानी मला सांगितले होत तुझ्या कडून काहीच होणार नाही अशा लोकांना आपण पोलीस होणार हे दाखवण्यासाठी आज आपल्याला सिद्ध करायचे आहे हे तर जाऊदे पण स्वतःला फक्त स्वतःसाठी नक्कीच सिद्ध करेल हा माझा शब्द आहे जित आपलीच आहे आणि या वर्षी मैदान आपणच गाजवणार...मित्रांनो आपल्या आयुष्यातील लढाई आपल्याला स्वतःलाच लढायची आहे या साठी मागे नाही यायचे तणाव तर रोज येणार रे आधी पण आले आहे आज ही आहे आणि जर आज आपण जिंकलो तर मागील सर्व दिवसातील तणावाखालील जिवण नाहीसे होईल आणि आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात होणार आहे.. पण मित्रांनो यासाठी आज मला मागे यायचे विचार सुद्धा करायचा नाही 🙂जा पुढे गड्या तुला भिती कशाची... अरे मित्रा तुझ्या मनाला सांग मी करून दाखवेल स्वतः ला आज सिद्ध करूनच दाखवणार हा शब्द फक्त स्वतः साठी 🙏 माझ्या सर्व भाऊबहिणींनी साठी.. .. मैदानी आणि लेखी परिक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांना परीक्षेच्या काळात खूप ऊर्जा मिलो.. हिच प्रार्थना गणपती बाप्पा कडे करेल🙏जय शिवराय 🙏