Тёмный

भक्तीगीतमाला - पुष्प १' माउली माउली | भक्तीरूप |' - स्मिता करंदीकर -  

Krishnakamal कृष्णकमळ
Подписаться 356
Просмотров 114
50% 1

Document from Madhav Puranik
माउली माउली | भक्तीरूप |
कृष्णकमळ भक्तीगीतांची तिसरी मालिका ' माउली माउली 'चे पहिले पुष्प - ' माउली माउली | भक्तीरूप | सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे.
मी, कवि डॉ माधव पुराणिक, नेहेमीप्रमाणे, विठोबा रखुमाईच्या देवळात दर्शनाला गेलो होतो. सभोवार संत ज्ञानेश्वरांची अनुभुतीत उत्कट झालेली प्रतिमा होती. खाली ओव्या लिहीलेल्या होत्या. व्यथित मनांना त्या दिलासा देत होत्या. करूणेची पखरण करीत होत्या. कोवळे व रसाळ बोल बोलत होत्या. तेव्हा मलाही काहीतरी सांगावेसे वाटले. त्याचे हे शब्दरूप.
मी सकाळी माउलींकडे निघालो होतो. संसारातील न सुटणाऱ्या प्रश्नांचे मला चटके बसत होते. मी समोर पाहिले तर माझी भक्तीच माउलीची सावली होऊन पुढे चालत होती . माझ्या मनाला शांत करित होती.
तिने हातात एकतारी घेतली होती. ती कीर्तनातली एक एक ओवी म्हणत देउळाकडे आपल्याच नादात चालली होती .अन् माझ्याभोवती शांततेची वलये पसरत चालली होती.
माऊलीने साधुपुरूषाचा वेष धारण केला होता. अन् तिच्या एकतारीतील सूर ओंकाराचा खोल व गहनगंभीर नाद होत अंतरात विरत होता.
तरीही माझे चित्त घराकडे जाऊन हळूच आत डोकावून पाहत होते.' मायलेकरे काय करित आहेत ?' त्याचा अंदाज घेत होते. अन् मन त्यांच्या ममतेच्या जाळ्यात झोके घेत होते.
मन म्हणत होते -' काय करू माउली ? जीव कासावीस होतो आहे. हृदय या नात्यांच्या रेशमी धाग्यांनी गुंतत चालले आहे. हा अभिमन्यू चक्रव्यूहात अडकत चालला आहे.'
' अग, मला नकळतच माझ्या महत्वाकांक्षेचे व अपेक्षांचे ओझे वाढत चालले आहे. अन् प्रणयाचा वाऱ्याबरोबर मी ही भरकटत चाललो आहे.
' हे माउली, आता तूच मला धीर दे.या अनावर आकर्षणातून बाहेर पडायचा मार्ग दाखव. माझ्या अपराधांना क्षमा कर. माझी सोबत सोडू नकोस. मला ओवी गुणगुणत देवळाकडे जाऊ दे. '
' अग, या मनमोहक आणि मादक कामनांच्या भोवऱ्यात मी सापडलो आहे. तू माझी शेवटची आशा आहेस. आता मला त्या समोरच्या पैलतीरावर शांतपणे, सहजतेने घेऊन जा.'
' माउली माउली | भक्तीरूप | ' या भक्तीगीताचे अभिवाचन स्मिता करंदीकर यांनी अतिशय भावपूर्ण आवाजात व भक्तीरसाने परिपूर्ण स्वरमेळात केले आहे.
माउली माउली | भक्तीरूप |
माउली माउली | तुझी ग साउली |
संसारात होई | भक्तीरूप || १ ||
कीर्तनी भजनी | एकतारी गाई |
ओवी ओवी होई | शांतरूप || २ ||
बोध निरूपणी | माउली श्रवणी |
अंतरात होई | नादरूप || ३ ||
चित्त जाता घरी | लेकरांसी पाही |
गुंती मायाजाळी | अखंडित || ४ ||
कासावीस मनी | काय करू माई |
जीवाच्या बंधनी | अविरत || ५ ||
कामनांच्या पाशी | वासनांच्या राशी.
जाती नभापाशी | नकळत || ६ ||
धीर मज देई | सांभाळून घेई |
सावकाश नेई | मठापाशी || ७ ||
मोहाच्या भोवरी | माउली सावरी |
नेई पैलतीरी | सहजचि || ८ ||
माधव पुराणिक
..मठ,पुणे, ०५/१०/२०२२

Опубликовано:

 

15 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 2   
@purnimajoshi5887
@purnimajoshi5887 Год назад
मस्त. विशेषतः निरूपण. खूप आवडलं. माऊलींची कृपा सदैव तुमच्यावर असुदे.
@sharayuranade1041
@sharayuranade1041 Год назад
फारच छान. वाचन आणि निरूपण दोन्हीही.
Далее