भाग्यवंता घरी भजन पुजन
त्याची वाट पाहे रघुनंदन ||धृ||
जगाच्या बाजारी सर्व काही मिळे
परी हे दुर्लभ हरीचे नाम || १||
पूर्वपुण्य ज्याचे असेल पुण्याई
तोची मुखी गाय हरीचे नाम || २ ||
निळा म्हणे तुम्ही आता तरी साधा
रामकृष्ण म्हणा वेळोवेळी ||३||
8 сен 2024