Тёмный

मणचे केंद्र शाळेत शाळा पूर्व तयारी मेळावा 

मुलुख मालवणी
Подписаться 528
Просмотров 217
50% 1

देवगड तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा मणचे नं. १ मध्ये शाळापूर्व तयारी मेळावा २८ एप्रिल२०२३ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
नव्याने इयत्ता पहिली मध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांना किमान प्राथमिक संख्याज्ञान, अक्षर ओळख असणे गरजेचे आहे हा उद्देश ठेवून शासनाच्या नियमांच्या अधीन राहून शाळापूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन देवगड तालुक्यातील पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा मणचे नं. १ मध्ये गावचे सरपंच दीपक तोरस्कर यांच्या अध्यक्षतेखाली व उपसरपंच मन्सूर सोलकर, शाळा व्यवस्थापन समिती केंद्रशाळा मणचे नं. १च्याअध्यक्षा सारिका रहाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष अजित कानेटकर ,केंद्रमुख्याध्यापक चिंतामणी पवार, सातपुते सर, श्रीम.हुलमनी मॅडम, पाटील मॅडम, आंबेकर सर इत्यादी मान्यवर व्यासपीठावर होते.
इयत्ता पहिली मध्ये नव्याने दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळापूर्व तयारी शिबिरामध्ये ढोल ताशांच्या गजरात ग्रामपंचायत मणचे येथून शाळेपर्यंत आणण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या डोक्यावर मुकुट घालून गुलाब पुष्प देऊन औक्षण करून शाळेत स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी कुंकवाच्या पाण्यात पाय बुडवून पहिले पाऊल शाळेमध्ये टाकले.
मेळावा कक्षाचे फित कापून उदघाटन व सदिच्छा समारंभाचे दीपप्रज्वलन मणचे गावचे सरपंच दिपक तोरस्कर यांच्या हस्ते करण्यात आले. तर सारिका रहाटे-अध्यक्ष ,शाळा व्यवस्थापन
समिती केंद्रशाळा मणचे यांच्या हस्ते सरस्वती मातेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या काही शैक्षणिक पूर्वज्ञानाच्या कसोट्या पाहण्यात आल्या. यात विद्यार्थ्यांमध्ये कोणते गुण आहेत आणि कोणत्या गुणांमध्ये आपण सुधारणा करू शकतो हे पाहण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या पालकांना विद्यार्थ्यांकडून पहिलीमध्ये दाखल होण्यापूर्वी अपेक्षित असलेल्या काही प्राथमिक संकल्पना स्पष्ट असणे गरजेचे आहे हे निदर्शनास आणून देण्यात आले व विद्यार्थ्याकडून आपण कशा पद्धतीने मातांनी तयारी करून घ्यायची याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
एकीकडे पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचा आनंद उत्सव तर दुसरीकडे इयत्ता सातवी मधून एक टप्पा पार करून पुढच्या शिक्षणासाठी हायस्कूलमध्ये जाणाऱ्या सातवीच्या विद्यार्थ्यांना सदिच्छा समारंभ ही आयोजित करण्यात आला होता. शाळेविषयी आणि शिक्षकांविषयी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थी खूप भावुक झाले होते डोळ्यात अश्रू आणून विद्यार्थी आपल्या भावना व्यक्त करत होते. यावेळी विद्यार्थ्यांनी भविष्यात आपले, आपल्या आई-वडिलांचे, शाळेचे, गावचे, तालुक्याचे,जिल्ह्याचे नाव रोशन करावे, यासाठी खूप परिश्रम घेऊन अभ्यास करावा. असे देखील प्रोत्साहन पर मार्गदर्शन शाळेतील शिक्षक सातपुते सर व हुलमणी मॅडम यांनी केले . तसेच शाळेतील कार्यरत असलेले दोन शिक्षक राहुल सातपुते व शिक्षिका चंदना हुलमणी यांची बदली झाली असल्याने गावचे सरपंच दीपक तोरस्कर यांच्या हस्ते सहायक शिक्षक सातपुते सरांना तर सहायक शिक्षिका चंदना हुलमणी यांना सारिका रहाटे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मणचे यांच्या हस्ते शाल,श्रीफळ, गुलाबपुष्प,सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेला निरोप देताना आणि आपले शिक्षक आपल्याला सोडून दुसऱ्या शाळेत जाणार म्हणून विद्यार्थी व शिक्षक खूप भावूक झाले होते, त्यांना अश्रू अनावर झाले. गुरु आणि शिष्य यांच्यामधील नात्याचे मोल हा प्रसंग खूप काही सांगून गेला. संपूर्ण कार्यक्रमाबद्दल मन्सूर सोलकर उपसरपंच मणचे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, गावातील पालक,अंगणवाडी सेविका ,आरोग्य सेविका विध्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन, प्रास्ताविक व आभार मुख्याध्यापक चिंतामणी पवार यांनी केले.

Опубликовано:

 

9 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1   
@chintamanipawar9331
@chintamanipawar9331 Год назад
सर,एकदम मस्त
Далее
Beautiful Military 🏅
00:10
Просмотров 2,7 млн
Oops 😅
00:10
Просмотров 3,2 млн
LIVE | Samsung Solve for Tomorrow 2024 | Grand Finale
3:11:26
Beautiful Military 🏅
00:10
Просмотров 2,7 млн