इतका सहज,सरळ ,साधा अभिनय त्यात ग्रामीण वातावरण. मस्त पावसाळी दिवस अन त्यात पित्राचे जेवण सासुरवाडीला..वा काय मस्त जमलय सगळच...आणी गावचा निवांत रोड... खूपच मजा आली व्हिडिओ बघताना...माऊली भाऊ व्हिडिओ टायमिंग थोडा वाढवा... खूप खूप शुभेच्छा.....
व्वा काय जबरदस्त व्हिडिओ आहे , आणि माउली भाऊ नी काय गाण म्हणलय , पण सासर्याबूवाचे लय हाल हे राव, सर्व लय भारी एक्टींग करतात राव,, चिखला पाण्याचे मोठ्या जावायचे खूप हाल आहे भो 🙏🙏👍👍😂
अप्रतिम व्हिडीओ. सादरीकरण खूप खूप छान. ओरिजनल वाटतं. एकदम सत्य वाटतं सारं. असं ग्रामीण भागात खरच घडतं. नात्यागोत्यात हे असं चालतं. जबरदस्त मांडणी. जबरदस्त संवादफेक. सासू, सासरा, माऊली, मुलगी, साडू, साडीन. सर्व टीम जबरदस्त. सासूबाई च्या सरळ आणि साधा संवाद लई भारी. किती ओरिजिनल दाखवलं माऊली भाऊ. लई हसलो बा, असं जेवणं कोणाच्या नशिबात नसतं. व्हिडीओ ला निशब्द म्हणणार होतो. पण राहवत च नाही. शो रूम बंद. 👍👌👌👌👌😛😛😛😛😛😛👌👌👌👌👌
छान व्हिडिओ बनवला माऊली भाऊ विनोद शैली ही मूलतः अंगी असावी लागते तुमचा विनोद हा अंगी भिनला आहे खास करून तुमच्या बरोबरच असणाऱ्या सासूबाई की ज्या नात्याने तुमच्या बहिण लागतात त्यांचा अभिनय सुद्धा खूप चांगला आहे आम्हा नगरकरांची हीच इच्छा आहे की आपल्याला चित्रपटात काम करण्याची संधी मिळावी
माऊली भाऊ तुम्ही लयी साधे भोळे आहेत तुमच्या साडुने चालू चालू तुम्हाला गाडी च्या नादात फसवले फक्त तुमचे सासरे तुमचे हीताचे आणि कैवारी आहे बाकी सर्व तुम्हाला वेड्यात काढतात 😃😃😃😃😃 एखाद्या एपिसोड असा काढा की सासुबाई आणि साडुला तुम्ही फसवले पाहिजे वेड्यात काढले पाहिजे एपिसोड 👍 👍 एकच नंबर खुप हसलो राव आज
माऊली भाऊ ...तुम्हाला असे नवीन नवीन कॉमेडी अभिनय टाकण्याची बुध्दी येते तरी कोठून ..देव जाणे.. मस्त vdo असेच टाकत जा आम्ही आतुरतेने आपल्या vdo. ची वाट पाहात असतो.