We so pseudo पुरोगामी की गीता हि आपल्याला आउटडेटेड वाटते....टिळक, ज्ञानदेव , नामदेव, भक्ती परंपरा हे खरचं कोणी आजकाल सांगतच नाही.. आपल्या पेक्षा युरोपियन लोक जास्त जाणतात.सरांची वाणी एकत राहावी अशी वाटते.... Petition for तत्त्वज्ञान न्यास / अध्यासन केंद्र ऑन यूट्यूब.... Thank you so much sir 🙏🏻
अभिवादन सर. नरक चतुर्दशी दिवशी आपले व्याख्यान ऐकले. भगवतगीता आपल्याला वर्तमानाशी जोडून घेण्याची गुरुकिल्ली पुढे ठेवली आहे. आपापल्या कर्मसु कौशल्यनुसार मार्ग उलगडत जातील. धन्यवाद सर. तेजोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻
अतिशय सुरेख प्रवचन , श्रीमद् भगवत गीता ,ज्ञानेश्वरी , कर्मे ईशु भजावा , श्रीमद् भगवत् गीतेचे त्रिकालाबाधित सत्य सनातन वचन, मार्ग दर्शन , एकमेवाद्वितीय दर्शन घडविले , ओघवती भाषा ,खरेच एकतरी ओवी अनुभवावी चा साक्षात्कार , वारंवार नमस्कार धन्यवाद
जुनी ज्ञानेश्वरी आहे आमच्याकडे तिची प्रस्थावना मामासाहेब दांडेकरांनी लिहिलेली होती। त्यात त्यांनी कर्मे इशु भजावा यावर लिहिलेली होती। आता पान न पान वेगळे झाले। 1980 च्या आसपास ला आजीने घेतली होती।
@@Ashwajitpalande9162 पण तु दुकानातुन कोळसाच का विकत घेतोस , कितीतरी चांगल्या गोष्टी आहेत त्या पण बघ .. आणि तुला निश्चितता आहे का जिवनात ती पहा , गीतेचा शिंतोडा घेवुन दुरुन तुला काय निश्चितता कळणार ??
नितांत सुंदर प्रवचन. दर आठवड्याला अध्यायवार निरुपण सुरू करावे ही नम्र विनंती. आपले "वाटेल ते" तसेच इतर अनेक विषयांवरील अभ्यासपूर्ण व्हिडिओ मी न चुकता बघत असतो आणि इतरांना पण ऐकण्यासाठी प्रवृत्त करत असतो. आपल्या निस्वार्थी कार्याला मन:पूर्वक शुभेच्छा.🎉
त्याच संविधानाचं रक्षण करणारी संस्था म्हणजे सुप्रीम कोर्ट. त्या सुप्रीम कोर्टचं ब्रीदवाक्य भगवद्गीता आणि महाभारतातून घेतलं आहे. आजकाल संविधान म्हणजे fashion झाली आहे. जरी संविधान कधी वाचला नसेल तरी त्या पवित्र ग्रंथाचं नाव घेऊन स्वतःला पुरोगामी दाखवण्याचा प्रयत्न होतो. असो.