Тёмный

#मेंदूची 

SUPREME MARATHI NEWS NETWORK
Подписаться 347
Просмотров 1,3 тыс.
50% 1

#मेंदूची 'वाट' लावणाऱ्या या 11 सवयी तुम्हाला आहेत का|तर ताबडतोब थांबवा...
मुंबई (प्रतिनिधी) : आपण आपल्या अशा 11 सवयींची चर्चा करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या मेंदूला हानी पोहोचत आहे. त्यासोबत अशा सवयींवर मात कशी करायची, हेही जाणून घेणार आहोत.असे बरेच लोक आहेत ज्यांना आता बाहेर जायला आवडत नाही. काहींना अंधाऱ्या खोलीत पडून वेळ घालवायला आवडतं किंवा हेडफोनवर मोठ्या आवाजात संगीत ऐकायला आवडतं.पण तुमच्या अशा वागण्यामुळे मेंदूवर वाईट परिणाम होतोय, असं काही संशोधनातून समोर आलं आहे.
या लेखातील माहिती ही हार्वर्ड मेडिकल स्कूल आणि अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर अँड स्ट्रोक यासह विविध संशोधन अहवालांमधून एकत्रित मांडली आहे.
1) अपुरी झोप
अमेरिकेच्या न्यूरोलॉजी आणि वेलनेस सेंटरच्या मते, आपल्या मेंदूचं सर्वात जास्त नुकसान हे अपुऱ्या झोपेमुळं होतं.प्रौढांसाठी पुरेशी झोप म्हणजे दिवसातील 24 तासांपैकी 7 ते 8 तासांची झोप. रात्री सलग झोप घेणं अधिक प्रभावी राहातं, असं तज्ज्ञ सांगतात.झोपल्यानंतर मेंदूला विश्रांती मिळते. याशिवय झोपेच्यावेळेस मेंदू नवीन पेशी तयार करतो. परंतु जर तुम्ही 7 तासांपेक्षा कमी झोपला तर नवीन पेशी तयार होत नाहीत.परिणामी, तुम्हाला काहीही आठवत नाही. लक्ष केंद्रित करण्यात अडचण येते. चिडचिड होते. निर्णय घेण्यास त्रास होतो. झोपेच्या कमतरतेमुळे डिमेंशिया अल्झायमरचा धोकाही वाढतो.
जर तुम्हाला तुमच्या मेंदूचं संरक्षण करायचं असेल, तर एकच उपाय आहे. रोज रात्री किमान सात तासांची झोप घेणं.
आठ तास झोप घेतली तर आणखी उत्तम.दुसरी गोष्ट - कधीही तोंडावर पांघरुण घेऊन झोपू नका. कारण त्यामुळे आपण नाकातून ऑक्सिजन शरीरात घेतो आणि कार्बन डायऑक्साइड वायू बाहेर सोडतो. या सततच्या प्रक्रियेमुळे तुमच्या चेहऱ्याभोवती CO2 जमा होतो. परिणामी तुम्हाला रात्रीतून ऑक्सिजनची कमतरता भासू शकते.
2. नाश्ता करणं टाळणे रात्रभर न जेवल्यानंतर दिवसभर काम करण्याची ऊर्जा नाश्त्यातून मिळते. पण आपल्यापैकी बरेच जण सकाळी घाई करतात आणि नाश्त्यासारखी महत्त्वाची गोष्ट सोडून देतात.असं केल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होते, ज्यामुळे मेंदूवर परिणाम होतो.दिवसेंदिवस न्याहारी न केल्याने मेंदूचे नुकसान होते, पेशींची कार्यक्षमता कमी होते.पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे मेंदूला सामान्य क्रियाकलाप करणं कठीण जातं.
3. दीर्घकाळ तणावात असणे प्रदीर्घ तणावामुळे मेंदूच्या पेशी मरतात आणि मेंदूचा पुढचा भाग आकुंचन पावतो. त्याचा आपल्या स्मरणशक्तीवर आणि विचारशक्तीवर परिणाम होतो.
संशोधकांच्या म्हणण्यानुसार, जे लोक सतत कामात बुडून राहतात. इतरांनी काही काम सांगितलं तर त्यांना 'नाही' म्हणू शकत नाहीत. अशा लोकांना सर्वात जास्त ताण सहन करावा लागतो.पण असं करणं ताबडतोब थांबवा. थेट सुटी घ्या.असं नाही केलं तर, त्याचा मेंदूवर दीर्घकालीन विपरित परिणाम होतो, असं संशोधनातून समोर आलं आहे.
4. पुरेसे पाणी न पिणे आपल्या मेंदूतील 75% भाग हा पाण्याचा आहे.त्यामुळे मेंदूला हायड्रेटेड ठेवणं हे त्याच्या उत्कृष्ट कार्यासाठी खूप महत्वाचं आहे.पाण्याच्या कमतरतेमुळे मेंदूच्या ऊती आकुंचन पावतात आणि पेशी कार्य गमावतात.या घटनेमुळे तार्किकदृष्ट्या विचार करण्याची किंवा निर्णय घेण्याची क्षमता कमी होऊ शकते.
5. सतत हेडफोन वापरणं, मोठ्या आवाजात गाणी ऐकणं तुम्ही वापरत असलेले हेडफोन किंवा एअर पॉड 30 मिनिटांपेक्षा कमी वेळात तुमचं नुकसान करू शकतात.
6. गुगल सर्चचा अतिवापर
तुम्हाला आठवत असेल, आपल्या आधीची पिढी कॅल्क्युलेटरचा वापर न करता बऱ्याचदा छोटी-मोठी आकडेमोड करायची. अनेक फोन नंबर त्यांच्या लक्षात राहायचे. भरपूर पुस्तके वाचल्यामुळे त्यांचे सामान्य ज्ञानही चांगले असायचे.
7. नकारात्मक विचार आणि लोक जर तुम्हाला सतत नकारात्मक विचार करण्याची सवय असेल, आपलं काहीच होऊ शकत नाही, जगात खूप वाईट परिस्थिती आहे, भविष्य अंधकारमय आहे, आपण नशीबवान नाहीये असे नकारात्मक विचार मेंदूला हानीकारक ठरतात.
कारण नकारात्मक विचारांमुळे एकीकडे तणाव, नैराश्य आणि चिंता निर्माण होते.
8. सतत एकटं राहणं, लोकांमध्ये न मिसळणं
लोकांशी बोलणं, गप्पा मारणं हे तुमच्या मेंदूच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.एकट्याने जास्त वेळ घालवल्याने तुमच्या मेंदूवर पुरेशी झोप न मिळण्याइतकाच वाईट परिणाम होतो.मित्र-मैत्रिणींसोबत आणि घरातील लोकांसोबत राहिल्याने आपला मेंदू ताजातवाना राहतो.त्याऐवजी, एकाकीपणामुळे नैराश्य, चिंता आणि स्मृतिभ्रंश आणि अल्झायमर रोगाचा धोका वाढतो.तुमचा मेंदू निरोगी ठेवायचा असेल तर काही जवळचे मित्र आणि कुटुंबियांसोबत नियमितपणे वेळ घालवा.पण हो, ते 'सकारात्मक विचारांचे लोक' असले पाहिजेत.
9. अंधारात जास्त वेळ घालवणं अमेरिकेतील एका संशोधनातून असं दिसून आलं की, जे लोक अंधारात जास्त वेळ घालवतात किंवा बंदिस्त ठिकाणी जास्त काळ थांबतात जिथे जास्त प्रकाश आणि हवेची हालचाल होत नाही,
10. अतिरिक्त स्क्रीन टाईम जास्त स्क्रीन टाईमचा मेंदूच्या आकारावर आणि विकासावर मोठा परिणाम होतो आहे. मुलांच्या मोबाईलच्या अतिवापरामुळे फ्रन्टल कॉर्टेक्समध्ये अधिक नुकसान होतं, जे पौगंडावस्थेपासून ते 25 वर्षांपर्यंत बदलतं.
11. जास्त खाण्याची सवय
कितीही 'हेल्दी फूड' असलं तरीही जास्त खाण्याची सवय मेंदूला हानी पोहोचवते.
संशोधनातून असं दिसून आलं आहे की, जास्त खाल्ल्याने मेंदूच्या धमन्यांमध्येही अडथळे तयार होतात आणि रक्त प्रवाह कमी होतो.यामुळे स्मरणशक्ती आणि विचार कमी होतात. ज्यामुळे स्मृतिभ्रंश आणि अल्झायमर होऊ शकतो.
जंक फूड, तळलेले पदार्थ, जास्त साखर असलेले पदार्थ, शीतपेये इत्यादी खाल्ल्याने मेंदूला तेवढाच धोका निर्माण होतो.#comments #like #subscribe #share #youtubeviral #youtube #Brain #11_Bad_Habit_Brain

Опубликовано:

 

6 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии    
Далее
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Просмотров 6 млн
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Просмотров 6 млн