संदेश सर आजचा जो व्हिडिओ आहे ना त्याचं शब्दात वर्णन करूच शकत नाही. अप्रतिम व्हिडिओ आहे .काय सुंदर गाव आहे. आजीचे ते प्रेमळ बोलणे,घर ,शेती जवळचा नजारा खुप सुंदर 👍 धन्यवाद 🙏
खुपच सुंदर गाव कोकणातील रायगड जिल्ह्यातील सृष्टी सौंदर्य छान कोकणातील माणूस प्रेमळ व कष्टकरी आहे हे एक उदाहरण संदेश छान विडिओ कोकण संस्कृती च्या माध्यमातून खुपच👏✊👍 सुंदर विडिओ येवा कोकण आपलाच आसा जय भवानी जय शिवाजी जय शिवराय जय महाराष्ट्र
खूप सुंदर व्हिडिओ👍🙏🙏 चारी बाजूंनी डोंगरांनी वेढलेली दरी पाहून काश्मीरमधल्या आरु व्हॅली ची आठवण झाली. खरंच आपला कोकण खूपच निसर्गरम्य आहे. हा व्हिडीओ खूपच आनंददायी होता.
संदेश खुप छान. भात ठेवतात ती कणगी. भिंतींमध्ये होती ती देवळी. लाकडांची फाटी रचलेली खोप, जुने जाते बघून छान वाटले. आजही कुडाच्या आणि मातीच्या भींती आहेत. शेणाने सारवलेल्या जमीनी. प्रकृती स्वस्थासाठी हे आवश्यक आहे. नवीन मुलांनी खरोखरच बघावे आत्मसात करावे. अनुकरण करावे. आयुष्य वाढीसाठी निसर्ग महत्त्वाचा आहे. खुप छान. माणगाव एक जंक्शन आहे. पण तरीही माणगाव मध्ये खुप खुप ठिकाणे बघण्यासारखी आहेत.
थोडक्यात सांगायचे झाले तर...नशीब लागते असे अनुभव आयुष्यात अनुभवायला... जवळपास सगळेच व्हिडिओ मनाला तृप्त करणारे असतात मित्रा...एकच होत किमान ०१ व्हिडिओ रोज यावा... धन्यवाद...काळजी घ्या
खुप छान व्हिडिओ बनवला आहेस मित्रा. आजींनी खुप सुंदर माहिती दिली. तुझे मित्र सुद्धा तुला खुप मदत करताहेत. इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोयस आणि ते तुझ्या या माणगावच्या series मधुन दिसतंयसुद्धा. असाच आपला कोकण आहे आणि तेच तु दाखवतोयस. Keep it up. #vinodtraveller from Canada