Тёмный

रोजची देवपूजा कशी करावी.सुरवातीपसुन ते शेवटपर्यंत सर्व नियम🙏 पूजेचे प्रकार, देवपूजेत या चुका टाळा. 

Pooja's Corner
Подписаться 208 тыс.
Просмотров 7 тыс.
50% 1

#dailypoojavidhi #swami
रोजची देवपूजा कशी करावी.सुरवातीपसुन ते शेवटपर्यंत सर्व नियम.देवाऱ्यामधे देवांची मांडणी कशी करावी
देवपूजेचे साडे सोपे नियम सर्व माहिती
#dailypoojavidhi# Devpooja#swami jyotish #onlymarathi #dailypoojavidhi #swamisamarthprachiti
रोजची देवपूजा | कशी करावी. सोपे नियम | देवांना अंघोळ कशी घालावी🙏Dev ghar tips देवपूजेत या चुका टाळा.
#dailypoojavidhi# Devpooja
#देवपूजा
#देवघर
#पूजा
#dailypooja
#pooja
#देव्हारा
#dailypoojavidhi#devpuja #swamiseva
#swamisamarth #स्वामीसमर्थअनुभव #godisgreat #स्वामीअनुभव #swamianubhv #swamivanigreat #swamisamarthprachiti#paisayenyasathiupay
#paisatikatnahi
#gharatpaisayenyasathiupay
#onlymarathi
#ओन्लीमराठी
dailypujavidhiरोजची पूजा अशी करा. How to do daily Pooja Vidhi in Marathi. पंचोपचारी पूजा अशी करावी
#How to do daily Pooja in Marathi
This video is about doing daily Pooja in Marathi. In this video there is the Maharashtrian way to worship God daily.in this video you will find the importance of daily Pooja and some rules regarding daily Pooja Vidhi.
घरातील देवघर कसे असावे.?,देवघर,देवघर कसे असावे,कोणते देव घरात असावेत,देवघराची दिशा,देवघराची दिशा कोणती असावी,#devghar konate asave,devghrachi disha,home temple,home temple direction,best direction,best directions for temple,देवघर कुठे ठेवावे,कोणते देवघर असावे,मंदिर,टेम्पल,
पंचोपचारी पूजा म्हणजे गंध, पुष्प, धुप, दिप आणि नैवेद्य
1) नित्य पूजा कशी करावी
देव पूजा हा एक आचार आहे.... एक आचरण पध्दती
उप - आचार
मानस पूजा
प्रत्यक्ष पूजा - नित्य पूजा / नैमित्तिक पूजा
1) पंचोपचार, 2) षोडशोपचार, 16 ( शोडोपचार x )
3) राजोपचार!!!
रोज ची पंचोपचार पूजा करु शकतो.
काही विशेष दिवशी उपाध्यायांच्या देखरेखीखाली जी पूजा केली जाते ती षोडशोपचार पूजा / राजोपचार पुजा
शुचिर्भूत होणे - आसन सिद्धी - दीप - धूप -
निर्माल्य - विसर्जन उत्तर दिशा - कनिष्ठ देवता - थोडी फुले सुवास घेणे।
शंख घंटा - दिशा -
देव स्नान घालणे - ओली पूजा / कोरडी पूजा.
पंचोपचार पूजा (५ प्रकराचे उपचार)
१) गंध (चंदन, अष्टगंध, गोपीचंदन)
२) पुष्प (फुले) - सुकलेली x उलटी x आवडीची बेस्ट - स्वतः लावलेली श्रेष्ठ - विकत - गौण - दुसऱ्याच्या बागेतील x किडलेली/ रस्त्यावरील / पडलेली/ चोरलेली - पुष्पदंत - गंधर्व राज कथा
३) धूप (अगरबत्ती, ऊदबत्ती, धूपकांडी)
४) दीप (गाईच्या तुपाचे नीरांजन)
५) नैवेद्य (नुसती साखर, गाईचे दूध व साखर इ.)
षोडशोपचार पूजा (१६ प्रकारचे उपचार)
१) आवाहन (प्रतिमेमध्ये येण्याची देवाला विनंती करणे)
२) आसन (बसण्यासाठी आसनाची व्यवस्था करणे व स्थानापन्न होण्याची विनंती देवाला करणे)
३) पाद्य (देवाची पावले धुणे)
४) अर्घ्य (देवाला हात धुण्यासाठी सुगंधी पाणी देणे)
५) आचमन (देवाला पिण्यासाठी पाणी देणे)
६) स्नान (देवाला विविध द्रव्यांनी आंघोळ घालणे - यात पंचामृत पण येते) (या नंतर देवाच्य आवडत्या सुक्तांनी अभिषेक केला जातो
जसे गणेश - अथर्वशीर्ष, देवी श्री सुक्त, विष्णू - पुरुष सुक्त, शंकर - रुद्र सुक्त.... )
७) यज्ञोपवित (जाणवे घालणे)
8) वस्त्र (देवाला अधरीय नेसवणे) उपवस्त्र (देवाला उत्तरीय नेसवणे)
९) गंध (देवाच्या कपाळाला गंध लावणे
१०) पुष्प (देवाला आवडतील अशी त्या त्या ऋतूत उपलब्ध असलेली ताजी फुललेली, निरोगी फुले वाहणे)
११) धूप (उदबत्ती पेटविणे व तिने देवाला घंटा वाजवित ओवाळणे)
१२) दीप (तुपाची वात पेटविलेले नीरांजन देवापुढे घंटा वाजवित ओवाळणे)
१३) नैवेद्य ( वाटीत दुधसाखर वा मिठाई ठेउन व तुळशीचे पान घालून त्याद्वारा आपले पंचप्राण अर्पण करणे)
१४) प्रदक्षिणा (स्वतःभोवती / मंदिरात देवाभोवती देव उजव्या हाताला ठेवून नमस्कारासहित चालणे)
१५) नमस्कार (हात जोडणे व डोके नमविणे / अष्टांग टेकवून)
१६) मंत्रपुष्प (मंत्र म्हणत फुले व अक्षता वाहणे)
राजोपाचार पूजन - देव / देवी राजा - सिंहासन छत्र चामर वाद्य आवरण पूजन अंग पूजन या सह।
Pooja's Corner

Опубликовано:

 

30 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 19   
@varshadamandlik7688
@varshadamandlik7688 10 дней назад
खूप छान माहिती दिलीत एक सांगायचं म्हणजे ज्या देवाच्या मूर्ती आहेत त्या अंगठ्यापर्यंत उंचीच्या असाव्यात आणि पितळ किंवा चांदीच्या असतील तर खूप चांगल, खोटे दागदागिने सहसा देवाला रोज घालू नका. हे सुद्धा सांगा. त्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. आपल्या सुखात संपत्तीत वाढ होते.
@darshanapatil2802
@darshanapatil2802 10 дней назад
श्री स्वामी समर्थ
@PoojasCorner
@PoojasCorner 10 дней назад
श्री स्वामी समर्थ 🙏
@poojagawande9586
@poojagawande9586 7 дней назад
Tai mla tulas lavychi ahe tr kontya divshi lavavi
@sayaliberad609
@sayaliberad609 11 дней назад
Khup छान पूजा केली... ताई मला एक विचारायचं होतं ते सांगता का तुळशीला मुख्य दरवाजावर आणि देवासमोर तुपाचा दिवा लावला तर चालेल का घरी बनवलेला तो पाय म्हशीच्या दुधापासून बनवते तू ते तुम्ही साईटला ठेवते प्लीज प्लीज सांगा ना ते तो वापरला तर
@renukapardeshi329
@renukapardeshi329 11 дней назад
Khupch chhan puja ani mahiti Dhanyvad
@PoojasCorner
@PoojasCorner 10 дней назад
धन्यवाद
@manishapatilvlogs9088
@manishapatilvlogs9088 11 дней назад
खूप छान
@PoojasCorner
@PoojasCorner 10 дней назад
धन्यवाद
@arpitatelrandhe5787
@arpitatelrandhe5787 11 дней назад
खूब सुंदर पूजा असतें तुझी ताई
@PoojasCorner
@PoojasCorner 11 дней назад
धन्यवाद 🙏
@rohinijadhav9773
@rohinijadhav9773 4 дня назад
Khurchit basun devpooja keli tr chalel ka mandi ghalta yet nahi mhanun vicharte
@PoojasCorner
@PoojasCorner 4 дня назад
हो ताई चालते.. देव म्हणत नाही की आपली तब्येत खराब करुन माझी पूजा करा 🙏..
@roshaniluhar1544
@roshaniluhar1544 11 дней назад
Hi dear tumhi turtle pani madhe ka nhi thevat rice var thevla tar chalt ka
@PoojasCorner
@PoojasCorner 10 дней назад
कासवाच्या खाली जर नंबर असतील तर ते तांदळामध्ये ठेवावे आणि नंबर नसतील तर ते पाण्यात ठेवतात
@HarnakshGanesha-mj9yu
@HarnakshGanesha-mj9yu 11 дней назад
Didi kalash ki coconut kab change karna hai please batao
@PoojasCorner
@PoojasCorner 10 дней назад
जर तडा गेला असेल किंवा खराब झाला असेल तर लगेच बदलावा त्यातली त्यात तुम्ही शुक्रवारी मंगळवारी आणि पौर्णिमा गुरुवारी या दिवशी नारळ बदलू शकता..
@varshanikam6221
@varshanikam6221 11 дней назад
Tai mi navryasobat rent ne baher rahte maje sagle dev sasari ahet mi rent chya ghari kontya devacho Puja kavari sangal ka kalsh sthapan karava ka sanga
@PoojasCorner
@PoojasCorner 10 дней назад
कलश स्थापना तुम्ही भाड्याच्या घरातही करू शकता.. गणपती बाप्पा, कुलदेवी, कुलदेवता यांची मूर्ती त्याचबरोबर स्वामींची मूर्ती ,अन्नपूर्णा ,शिवपिंड बाळकृष्ण
Далее
🎙ПЕСНИ ВЖИВУЮ от КВАШЕНОЙ🌹
3:09:38
🎙ПЕСНИ ВЖИВУЮ от КВАШЕНОЙ🌹
3:09:38