भाग्यनागर(हैद्राबाद)येथे दिनांक 27 जानेवारी ते 3 फेब्रुवारी 2019 या कालावधीत (४०९२) वाचकांसह भव्यदिव्य श्रीतुकाराम गाथा पारायण सोहळा साजरा झाला. याच काळात सायं सत्रात सद्गुरुंच्या मुखातून श्रीतुकाराम महाराज चरित्र कथासार प्रवचने झाली. गाथा पारायणा करिता श्रीदादा महाराज शिरवळकर व श्री राम महाराज अखेगावकर उपस्थित होते. जागराचे कीर्तन श्रीगुरु चैतन्य महाराज देगलूरकर तर काल्याचे कीर्तन सद्गुरूंनि केले। तेलंगणा येथे झालेला हा मोठा, भव्य दिव्य असा हा वारकरी सांप्रदयाचा प्रथम सप्ताहच.
आयोजन - बन्सीलाल वागदरे परिवार व
सद्गुरू श्रीचंद्रशेखर महाराज देगलूरकर सेवा समिती यांनी केली.
15 сен 2024