Тёмный

श्री गंगाष्टकम् | Gangaashtakam | रचना - प. प. श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज 

VASUDEV SANGEET SABHA
Подписаться 13 тыс.
Просмотров 6 тыс.
50% 1

#वासुदेवसंगीतसभा #vasudevsangeetsabha #gangastroram #dattatraya #dattaguru #Gangaashtakam
रचना - प. प. श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज.
संगीतकार - सौ. अश्विनी मेढेकर , साऊरकर.
बासरी - श्री. श्रीहरी पुराणकर
संगीत संयोजक
श्री अजिंक्य श्रौती
ध्व्नीमुद्रण : (GLR bliss sound studio pune) जि.एल.आर.( ब्लिस साऊन्ड स्टुडिओ पुणे )
गायन - सौ अश्विनी साऊरकर.सौ कल्याणी कुळकर्णी
वासुदेव संगीत सभा, वेद वासुदेव प्रतिष्ठान, पुणे
श्रीगंगाष्टक -
माँ गंगा आणि प.प.श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज या माता-पुत्रांचा हा अद्वितीय आणि अत्यद्भुत असा संवाद.
भगिरथाने केलेल्या तपश्चर्येच्या निमित्ताने जी स्वर्गातून या भूमीवर अवतीर्ण झाली, प्रत्यक्ष भगवान शंकराने जिला स्वजटांमध्ये धारण केले आणि चारही युगांमध्ये समस्त जीवांचे पापक्षालन करीत तापत्रयाच्या विळख्यातून सोडवीत जी साधकाला शाश्वत सुख प्रदान करण्यासाठी अखंड प्रवाहित आहे, अश्या मातृस्वरुप गंगामातेला तिची करुणा भाकण्यासाठी थोरल्या महाराजांनी घातलेली साद.
दुर्लभ अश्या नरदेहाची प्राप्ती होऊनसुद्धा केवळ अज्ञानामुळे-सारासार विवेक न उमगल्यामुळे क्षणिक सुखांचा मागोवा घेत केलेले जीवनयापन, क्षणा-क्षणाला चाललेले सत् व दुष् प्रवृत्तींचे अंतरद्वंद्व-प्रसंगी भय व त्यामुळे निर्माण होणारी अकर्मण्यता आणि या साऱ्यांच्याच ओघात संपुष्टात येत असलेल्या जीवनप्रवासाची जाणीव.
साधनमार्गात अश्याप्रकारच्या अदम्य कोलहलामुळे गलबलुन गेलेला साधक- अविद्येच्या विळख्यातून सुटू न शकल्यामुळे निर्माण होणारी असह्य तळमळ-बोलून दाखवावी कुणाला? ऐकेल कोण? या सर्वामध्ये आपलीच चूक आहे हे ओळखून सुद्धा जवळ घेऊन ईप्सित पुरवील कोण? अश्या असंख्य प्रश्नाने व्याकुळ होतो.
अश्यावेळी या व्याकुळतेला शांत करून त्याला जवळ घेऊन अभय देऊ शकते ती 'आईच'
साधक-मुमुक्षु-सिद्ध या सर्वांवर पुत्रवत् प्रेम करणाऱ्या, सर्वांचीच तळमळ समभावाने जाणणाऱ्या व त्यांची तळमळ शांत करीत अतीव वात्सल्याने आत्मानंदरुपी अमृतस्तन्याने तृप्त करणाऱ्या या गंगामातेस पाहून तिच्या वात्सल्याच्या ओढीने साक्षात् दत्तरुप अश्या श्रीमद्वासुदेवांचे हृदय द्रवित झाले व श्रीमुखातून शब्द उमटले:
मला तारी गंगे सकलभयभंगे त्रिपथगे...
धर्म-अर्थ-काम-मोक्ष अश्या चारही पुरुषार्थविहीन व ज्ञान-भक्ती-कर्म-योग यांचा लवलेशही नसलेले जीवन आजन्म अतिघोर अश्या निद्रे व तंद्रेमध्ये काढल्याची खंत व त्यानिमित्ताने निर्माण झालेला खेद या नित्यजागृताने भगवती गंगेसमोर व्यक्त करीत अभय मागितले. कुणासाठी? तर तुमच्या-माझ्यासाठी.
या प्रार्थनेच्या नित्य पठणाने, या गुरु-गंगा संवादाच्या नित्य अनुसंधानाने माझ्या व आपल्या सर्वांच्याच जीवनामध्ये वृत्ती व विचारांचे जागेपण येवो ही थोरल्यामहाराज व गंगामातेच्या चरणी अनन्यभावाने प्रार्थना.

Опубликовано:

 

15 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 32   
@mangalayadwadkar1058
@mangalayadwadkar1058 Год назад
प. प.श्री वासुदेवानंद टंब्ये स्वामी महाराजांचे चरणी कोटी कोटी प्रणाम🙏🙏👣🙏🙏🌹🌹
@adinathjoshisir2019
@adinathjoshisir2019 4 месяца назад
सुंदर.... सुस्वर.... सादरीकरण अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा.....नमामि गंगे🙏🙏
@meenabhurangi354
@meenabhurangi354 5 месяцев назад
हर हर गंगे
@GirishDamale
@GirishDamale 5 месяцев назад
श्री स्वामी महाराजांच्या चरणी नतमस्तक.जय हो माउली.
@pinkydesh833
@pinkydesh833 2 года назад
गंगा माता की जय 🙏🙏
@sandhyanimdeo2367
@sandhyanimdeo2367 2 года назад
हर हर गंगे 🙏🙏🙏🙏
@maheshamlekar3584
@maheshamlekar3584 Год назад
सुश्राव्य व भावपूर्ण गायन 🙏🙏
@tanujasavaji2670
@tanujasavaji2670 Год назад
खुप छान ..हर हर गंगे...
@alchemistpvyj1009
@alchemistpvyj1009 8 месяцев назад
धन्य धन्य धन्य झालो। विलक्षण रचना दत्ता अवतार श्री टेम्बे स्वामी , त्रिवार वंदन।
@kalyaniamlekarkulkarni582
@kalyaniamlekarkulkarni582 2 года назад
सद्गुरू नाथ महाराज की जय.
@dndabke
@dndabke 4 месяца назад
खूप छान सादरीकरण !
@NaliniHulsurkar
@NaliniHulsurkar 4 месяца назад
खुप छान
@suchitrakale3201
@suchitrakale3201 2 года назад
सुंदर गायन👌👌जय गंगामाता🙏🙏🙏 थोरले स्वामी महाराज यांचे चरणी कोटी कोटी नमन🙏🌹🙏🌹🙏🌹
@manul7830
@manul7830 Месяц назад
Kay Prasad IKR svar ahe!namaste shri vasudeva!
@mangalayadwadkar1058
@mangalayadwadkar1058 Год назад
खूप च सुंदर👌👌🙏हर हर गंगे
@NaliniHulsurkar
@NaliniHulsurkar 4 месяца назад
खूप छान..
@arnavjoshigrade6thc318
@arnavjoshigrade6thc318 2 года назад
उच्चार छान 👌🙏🏻
@swatikulkarni8163
@swatikulkarni8163 5 месяцев назад
🙏🙏🙏🌹🌹🌹
@madhumagokhale4872
@madhumagokhale4872 Год назад
🙏🙏🙏
@vijaykale5651
@vijaykale5651 2 года назад
Very nice
@anjalichoudhari9940
@anjalichoudhari9940 2 года назад
👌👌🙏
@vasudhapanchpor9064
@vasudhapanchpor9064 2 года назад
अप्रतिम चाल 🙏🙏
@deeplaxmichouhan584
@deeplaxmichouhan584 Год назад
🌅🚩🇮🇳🙏🙏🙏💐💐
@adwaitmunje2380
@adwaitmunje2380 2 года назад
हर हर गंगे गंगा ष्टकात संपूर्ण गंगा शब्दाची उत्पत्ती स्वामींनी सांगितलि आहे.अस मला वाटतं कारण गं हे बीज ज्ञानाच प्रतिक आहे व गा हे शक्तिच प्रतिक आहे.म्हणजे ज्ञान शक्ति एकप्रकारे इथे ज्ञानशक्तिम्हणजे परमात्म्याचा शक्तिचा महिमा गाईला आहे
@ashutoshdeshpande4853
@ashutoshdeshpande4853 Год назад
हर हर गंगे
@NaliniHulsurkar
@NaliniHulsurkar 4 месяца назад
खूप छान
@divyapatil621
@divyapatil621 2 года назад
🙏🙏🙏
@sameerbhide3117
@sameerbhide3117 Год назад
खूप सुन्दर 👌👍
@kshiprasadhanbharad
@kshiprasadhanbharad Год назад
गंगा दशंहरा निमित्त यथोचित .हर हर गंगे.. विठ्ठल भरड
@sadashivagodbole1546
@sadashivagodbole1546 5 месяцев назад
खूप छान
@madhavisule6308
@madhavisule6308 2 года назад
खुप सुंदर
@mrunalshastri8036
@mrunalshastri8036 Год назад
खुप छान
Далее
Ecstatic Kirtan! - Kadamba Kanana Swami | PS Alumni
29:27