Тёмный
No video :(

श्रोतेजनस्तवन. दासबोध दशक १ समास ६. दासबोधाचे क्रमशः निरूपण. 

gondavalekar maharaj
Подписаться 32 тыс.
Просмотров 1,1 тыс.
50% 1

दासबोधाचे क्रमशः निरूपण.
श्रोतेजनस्तवन. दासबोध दशक १ समास ६
समास सहावा : श्रोतेजनस्तवन
॥ श्रीराम् ॥
आतां वंदूं श्रोते जन । भक्त ज्ञानी संत सज्जन । विरक्त योगी गुणसंपन्न । सत्यवादी ॥ १॥येक सत्वाचे सागर । येक बुद्धीचे आगर । येक श्रोते वैरागर । नाना शब्दरत्नांचे ॥ २॥जे नाना अर्थांबृताचे भोक्ते । जे प्रसंगीं वक्तयाचे वक्ते । नाना संशयातें छेदिते । निश्चै पुरुष ॥ ३॥ज्यांची धारणा अपार । जे ईश्वराचे अवतार । नांतरी प्रत्यक्ष सुरवर । बैसले जैसे ॥ ४॥किं हे ऋषेश्वरांची मंडळी । शांतस्वरूप सत्वागळी । जयांचेनि सभामंडळीं । परम शोभा ॥ ५॥हृदईं वेदगर्भ विलसे । मुखीं सरस्वती विळासे । साहित्य बोलतां जैसे । भासती देवगुरु ॥ ६॥जे पवित्रपणें वैश्वानर । जे स्फूर्तिकिरणाचे दिनकर । ज्ञातेपणें दृष्टीसमोरे । ब्रह्मांड न ये ॥ ७॥जे अखंड सावधान । जयांस त्रिकाळाचें ज्ञान । सर्वकाळ निराभिमान । आत्मज्ञानी ॥ ८॥ज्यांचे दृष्टीखालून गेलें । ऐंसें कांहींच नाहीं उरलें । पदार्थमात्रांसी लक्षिलें । मनें जयांच्या ॥ ९॥जें जें कांहीं आठवावें । तें तें तयांस पूर्वीच ठावें । तेथें काये अनुवादावें । ज्ञातेपणेंकरूनी ॥ १०॥परंतु हे गुणग्राहिक । म्हणौन बोलतों निःशंक । भाग्यपुरुष काये येक । सेवीत नाहीं ॥ ११॥सदा सेविती दिव्यान्नें । पालटाकारणें आवेट अन्नें । तैसींच माझीं वचनें । पराकृतें ॥ १२॥आपुले शक्तिनुसार । भावें पुजावा परमेश्वर । परंतु पुजूं नये हा विचार । कोठेंचि नाहीं ॥ १३॥तैसा मी येक वाग्दुर्बळ । श्रोते परमेश्वरचि केवळ । यांची पूजा वाचाबरळ । करूं पाहे ॥ १४॥वित्पत्ती नाहीं कळा नाहीं । चातुर्य नाहीं प्रबंद नाहीं । भक्ति ज्ञान वैराग्य नाहीं । गौल्यता नाहीं वचनाची ॥ १५॥ऐसा माझा वाग्‌विळास । म्हणौन बोलतों सावकाश । भावाचा भोक्ता जगदीश । म्हणौनियां ॥ १६॥तुम्ही श्रोते जगदीशमूर्ति । तेथें माझी वित्पत्ती किती । बुद्धिहीण अल्पमती । सलगी करितों ॥ १७॥समर्थाचा पुत्र मूर्ख जगीं । परी सामर्थ्य असे त्याचा आंगीं । तुम्हां संतांचा सलगी । म्हणौनि करितों ॥ १८॥व्याघ्र सिंह भयानक । देखोनि भयाचकित लोक । परी त्यांचीं पिलीं निःशंक । तयांपुढे खेळती ॥ १९॥तैसा मी संतांचा अंकित । तुम्हां संतांपासीं बोलत । तरी माझी चिंता तुमचे चित्त । वाहेलच कीं ॥ २०॥आपलेंची बोले वाउगें । त्याची संपादणी करणें लागे । परंतु काहीं सांगणें नलगे । न्यून तें पूर्ण करावें ॥ २१॥हें तों प्रीतीचें लक्षण । स्वभावेंची करी मन । तैसे तुम्ही संतसज्जन । मायेबाप विश्वाचे ॥ २२॥माझा आशय जाणोनी जीवें । आतां उचित तें करावें । पुढें कथेसि अवधान द्यावें । म्हणे दासानुदास ॥ २३॥इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे श्रोतेस्तवननाम समास सहावा ॥ ६॥
जानकीजीवनस्मरण जयजय राम
#jaishreeram #ram #spirituality #discourse
#श्रीराम #प्रवचन #हरिपाठ #meditation #spiritual #yoga #ida #pingala #nadi #pranayama #bhakti #janm #birth #saint #saints #namasmaran #faith #god #marathi

Опубликовано:

 

6 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 20   
@manjirimundle1757
@manjirimundle1757 Месяц назад
जय जय रघुवीर समर्थ 🙏 श्रीराम जय राम जय जय राम 🙏 🙏
@vishwanathpatil6266
@vishwanathpatil6266 Месяц назад
श्रीराम जय राम जय जय राम 🌹🙏
@sandeepkulkarni8281
@sandeepkulkarni8281 Месяц назад
🙏🙏🌹श्रीराम समर्थ🌹🙏🙏 📿
@shobhatikam1334
@shobhatikam1334 Месяц назад
श्री राम जय राम जय जय राम 👏🌸🏵️🪷
@sharadkhatu6921
@sharadkhatu6921 Месяц назад
🙏🏿जय जय रघुवीर समर्थ 🙏🏿
@pratibhak9786
@pratibhak9786 Месяц назад
ಶ್ರೀರಾಮ ಜಯರಾಮ ಜಯಜಯರಾಮ 🙏🌹
@tulsidas6443
@tulsidas6443 Месяц назад
🌿🌹 श्रीराम 🚩🙏
@annadarajput8492
@annadarajput8492 Месяц назад
Ram Krishna Hari
@balasahebbandal3003
@balasahebbandal3003 Месяц назад
🙏 जय सद्गुरु 🙏
@manjiriwakankar4820
@manjiriwakankar4820 Месяц назад
🙏🙏🙏
@dipalimore5639
@dipalimore5639 Месяц назад
Namaskar mauli 🙏
@urmilaapte9853
@urmilaapte9853 Месяц назад
🕉️🎵 श्रोत्यांची पात्रता काय असावी ? ते सांगण्यासाठी हे सद् गुण सांगितले आहेत. असे मला वाटते🎼 ..… ह्या ग्रंथाचे परिशीलन करून त्यानुसार वागून ही पात्रता मिळवावी/ किंवा मिळवता येते किंवा ह्या मार्गाने अनेक वर्षे जीवन जगल्यास मनुष्य असा होऊ शकतो असे समर्थ रामदास स्वामी समर्थपणे सांगत आहेत असा माझा स्वानुभव आहे!!! 🎶🕉️
@gondavalekarmaharaj
@gondavalekarmaharaj Месяц назад
सुंदर🙏🏼🙏🏼 चिंतन करावे तेवढे थोडेच आहे. श्रीराम 🙏🏼
@vaishalidivekar1080
@vaishalidivekar1080 Месяц назад
Namaskar. Dashak 1 samas 7 ani samas 8 nahi milala. Link pathaval ka?
@gondavalekarmaharaj
@gondavalekarmaharaj Месяц назад
दशक १ समास ९ ची सुरुवात ऐकली तर कळेल... की दशक १ समास ७ आणि ८ यांचा थोडक्यात उल्लेख करून पुढे गेलो आपण. मुख्य दासबोध आणि निरूपण हे दोन्ही मुख्य परमार्थ विषयी असल्याने त्याला गरजेच्या गोष्टी बघत आहोत आपण. समास ७ आणि ८ मधे त्याचा उल्लेख नाही असं नाही. पण त्यातील आलेले बारकावे स्पर्शून झाले आहेत. परमार्थ, साधन इत्यादी बद्दल ज्या ज्या समासात जास्त खोल जाता येईल असे समास आपण विशेषत्वाने बघणार आहोत.
@vaishalidivekar1080
@vaishalidivekar1080 Месяц назад
Abhari
@daniujwal5
@daniujwal5 Месяц назад
Sir 7th samas che nirupan takal ka
@gondavalekarmaharaj
@gondavalekarmaharaj Месяц назад
समास ७ आणि ८ यांचा थोडक्यात उल्लेख करून पुढे गेलो आपण. मुख्य दासबोध आणि निरूपण हे दोन्ही मुख्य परमार्थ विषयी असल्याने त्याला गरजेच्या गोष्टी बघत आहोत आपण. समास ७ आणि ८ मधे त्याचा उल्लेख नाही असं नाही. पण त्यातील आलेले बारकावे स्पर्शून झाले आहेत. परमार्थ, साधन इत्यादी बद्दल ज्या ज्या समासात जास्त खोल जाता येईल असे समास आपण विशेषत्वाने बघणार आहोत.
@daniujwal5
@daniujwal5 Месяц назад
@@gondavalekarmaharaj mi sakhol abhyas karat ahe apli nirupane sahaj sopi asatat pl purna dasbodh samas savadine you tube var takava hi vinanti
@anilpuranik6411
@anilpuranik6411 Месяц назад
जय जय रघुवीर समर्थ 🙏
Далее
3d printed demon core vs real
00:24
Просмотров 7 млн
Bike Challenge
00:20
Просмотров 10 млн
नामस्मरण - भाग १
6:27
Просмотров 7 тыс.
3d printed demon core vs real
00:24
Просмотров 7 млн