Тёмный

संग्रामदुर्ग | Sangramdurg | चाकण चा किल्ला | Chakan fort | कसं होत चाकण च्या किल्ल्याच "रणमंडल "? 

Marathi Factor
Подписаться 282
Просмотров 106
50% 1

पुणे शहरा जवळ असलेला,इतिहासात पराक्रम गाजवून ऐतिहासिक पाऊलखुणा जपलेला एक भुईकोट किल्ला पाहायला मिळतो शिवरायांच्या फक्त एका शब्दाखातर, आदिलशाहीची नोकरी सोडून स्वराज्यात सामील झालेले किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यांनी स्वराज्यात येताना चाकणसारखा अतिशय देखणा आणि मजबूत किल्ला त्यांनी शिवरायांना हसत हसत नजर केला. शहिस्तेखानाच्या बलाढ्य फौजेला चाकणचा भुईकोट म्हणजे तसे अगदी मातीचे छोटेसे ढेकूळ. तरीही शाहिस्तेखानाच्या अवाढव्य लमाजम्याला हा एक किल्ला घ्यायला तब्बल ५६ दिवस लागले. फार फार उमेदीने आणि प्रचंड सैन्यानिशी हा खान दख्खनेत आला होता, मात्र चाकणच्या किल्ल्याचा एक टवका उडवायला एवढा संघर्ष करावा लागल्याने खान नाराज झाला. या किल्ल्याची सध्याची स्थिती पाहिल्यास काही वर्षानंतर 'इथे एक किल्ला होता' असे सांगावे लागेल, अशी चाकणच्या संग्रामदुर्गाची स्थिती आहे.
जेव्हा शाहिस्तेखानने या भुईकोट दुर्गाला त्याने वेढा घातला. या दुर्गात फिरंगोजी नरसाळा नावाचा किल्लेदार होता.संग्रामदुर्ग म्हणजे काही खूप भक्कम दुर्ग नव्हे. आधीच तो स्थलदुर्ग; पण खंदकाने वेढलेला. त्यामुळे थोडी बळकटी आलेला. खंदकात पाणीही होते, शिवाय दिवस पावसाचे होते. २१ जून १६६० रोजी किल्ल्याला मुघलांचा वेढा पडला. फिरंगोजी नरसाळ्याने सयाजी थोपटा, मालुजी मोहिता, भिवा दूधावडा, बाळाजी कर्डीला याच्यासह शूर ३०० - ३५० लोकांनीशी चाकण तब्बल ५६ दिवस झुंजवत ठेवला होता. १४ ऑगस्ट १६६० हा दिवस उगवला.मोघली सैन्याने चाकणचा संग्रामदुर्ग जिंकला. मावळ्यांचे साहसपर्व कडू घोट घेत संपले.

Опубликовано:

 

25 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии    
Далее
БЕЛКА СЬЕЛА КОТЕНКА?#cat
00:13
Просмотров 1,3 млн