भारतातील कोकण हा प्रदेश भारता पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भागात असलेला भूमीचा पट्टा आहे. कोकण किनारपट्टी हा एक ७२० कि.मी. (४५० मैल) लांबीचा समुद्रकिनारा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र,गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांच्या सीमावर्ती भागात येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. माडांच्या राया, आंबे, सुपारी, केळीच्या बागा, फणस, काजू, कोकमाची झाडे आणि डोंगरउतारांवर केलेली भातशेती हे खूप मोठ्या प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही या कोकण पट्ट्यातच आहे.कोकण म्हणजे स्वर्गच आहे.
कल्याणःकल्याणमधील नावाजलेल्या Sahyadri Rock Adventure या साहसी गिर्यारोहण संस्थेने पुन्हा एकदा विक्रमी कामगिरी करत शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवून कल्याणचे नाव उज्वल केले. महाराष्ट्र राज्य निर्मिती अर्थात महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत रत्नागिरी येथील १०० फूट उंचीचा सुया सुळका सर करत त्यांनी राज्याला अनोख्या प्रकारे मानवंदना करून एक नवीन विक्रम केला आहे. विशेष म्हणजे हा सुळका अगदी समुद्रातच असून पाण्याने त्याची पकड निसरडी झालेली होती.
त्यामुळे अशा ठिकाणी कामगिरी करत असताना जोखीम जास्त असते. पण अनुभवी संघ आणि योजनाबद्ध कामगिरी असल्याने हा सुळका सर करण्याची मोहीम देखील यशस्वी
करण्यात आली. कल्याणचा सह्याद्री रॉक अॅडवेंचर संघ हा सातत्याने अश्या विविध कामगिरी करत कल्याण शहराचे नाव संपूर्ण राज्यात एक प्रकारे उंचावत आहे. ही कामगिरी यशस्वी करण्यात संघाचे प्रशिल अंबाडे,सुहास जाधव,दर्शन देशमुख, सुचित लाड, स्वप्नील भोईर, स्मितेश येवले,भूषण पवार, संजय करे, अभिजित कळंबे, अभिषेक गोरे, आणि अंकिता पटलेकर हे उपस्थित होते.Music from #InAudio: inaudio.org/
Track Name.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
►RU-vid - Psycho Prashil
►Facebook - Prashil Ambade
► Instagram- Psycho Prashil
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
Ignor Hashtags:
#adventure #climbing #amazing #india #hiddengems #viralvideo #kokan #explore
2 май 2024