Тёмный

सिद्धबेट आळंदी | Siddhabet Alandi | Alandi | आळंदी दर्शन | आळंदी मधील हे ठिकाण पाहिले आहे का? 

Paulvata पाऊलवाटा
Подписаться 239 тыс.
Просмотров 1,9 млн
50% 1

श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आयष्यातील अविभाज्य ठिकाण म्हणजे सिद्धबेट. श्री ज्ञानेश्वर महाराज यांची कर्मभूमी म्हणून सिद्धबेट प्रसिध्द आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत आणि आई रुक्मिणी यांना वाळीत टाकल्या नंतर त्यांचे वास्तव्य सिद्धबेटात होते.
ज्ञानेश्वर महाराजांचे बालपण त्यांच्या भवंडा सोबत निवृत्ती, सोपान आणि मुक्ताई सोबत सिद्धाबेटात गेले.
सिद्धाबेटात माउलींनी बाललीला, चिंतन, मनन, योग आणि अभ्यास केला.
तसेच ज्ञानेश्वर महाराजांच्या आयुष्यातील अनेक महत्वाचे प्रसंग येथेच घडले.
जसे... ज्ञानेश्वर महाराजांच्या पठीवर भाजलेले मांडे, मुक्ताईचे ताटीचे अभंग, ज्ञानेश्वर महाराजानी चालवलेली भिंत, ज्ञानेश्वरीचा अभ्यास.
सिद्धाबेटाचे महत्व पुराण काळापासून आहे.
सिद्धाबेटाचे वर्णन करताना संत नामदेव महाराज यांचा अभंग आहे..
आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव । दैवताचे नाव सिद्धेश्‍वर ॥१॥
चौर्‍यांशी सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा । तो सुख सोहळा काय वर्णू ॥२॥
विमानांची दाटी पुण्यांचा वर्षाव | स्वर्गीहूनी देव करीताती ॥३॥
नामा म्हणे देवा चला तया ठाया | विश्रांती घ्यावया कल्पवरी ॥४॥
Aalandi he gaav Punya bhaumi thav | Daivatache naav Sidhheshwar ॥१॥
Chauryashi sidhhacha sidhhabheti mela | To sukh sohala Kaay Vaanu ॥2॥
Vimanachi daati Pushpacha Varshav | Swargahuni dev Karitati ॥3॥
Naamamhane Devaa Chala taya Thaya | Vishranti ghyavaya Kalpavari ॥4॥
परंतु सिद्धाबेटाची आत्ताची परिस्थिती विदारक आहे. जागोजागी कचऱ्याचे साम्राज्य, दारुड्याचा हक्काचा अड्डा, लफडेबाज जोडप्यांसाठी आडोश्याची जागा, जनावरांचे चरण्याचे कुरण, विकास कामांचा अभाव, इंद्रायणीतल जलपर्णी आणि तिचा पसरणारा दुर्गंध... हे सर्व काही असह्य आणि अक्षम्य आहे.
ही परिस्थीती बदलली पाहिजे. आता आपली जबाबदारी आहे ही गोष्ट प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याची. त्यासाठी एक जबाबदारी म्हणून हा व्हिडिओ शक्य होईल तेवढा शेअर करा..
जय हरी माऊली
संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या जीवन चरित्रावर आधारित सुंदर मराठी मालीका 👇👇 ज्ञानेश्वर माऊली
• Dnyaneshwar Mauli | Te...
विशेष आभार
‪@UdyogamOfficial‬
Instagram 👇👇
hindfiraa?igshi...
पाऊलवाट अजुन या ठिकाणी सुद्धा आहे..👇
Instagram
paulvata_?igshi...
Facebook 👇
/ mahitip05
या व्हिडिओ मधील कोणताही भाग पुन्हा पाहायचा असेल तर खालील निळ्या अंकावर क्लिक करा.👇👇
00:01- सिद्धबेट / Siddhabet
01:53 - श्री विठ्ठल मंदिर सिद्धबेट
02:14 - देहांत प्रायश्चित्त प्रसंग
03:27 - अपरिचित समाधी
03:43 - सिद्धबेटातील तत्कालीन मंदिर
04:08 - सिद्धबेट इतिहास
04:43 - मुक्ताईचे ताटीचे अभंग
06:03 - श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पाठीवर भाजलेले मांडे प्रसंग
07:32 - अजाण वृक्षांचे बन
08:36 - पूर्वीचे सिद्धबेट
08:57 - आत्ताचे कटु सत्य
#सिद्धबेट
#आळंदी
#ज्ञानेश्वरमाऊली
#Siddhabet
#Alandi
#सिद्धबेत
#पाऊलवाटा
#Paulwata
#Aalandi
#Alandi2022
#AlandiStatus
Alandi kalash movement
Alandi live
Aalandi live
Alandi live darshan today
Alandi darshan
Dehu alandi
Alandi News
Alandi mandir kalash
Alandi status
Devachi Alandi
Dnyaneshwar Mauli serial
Sant Dnyaneshwar movie
Dnyaneshwar Mauli
Dnyaneshwar Maharaj
Dnyaneshwar mauli song
Dnyaneshwar mauli serial episode 1
Dnyaneshwar Mauli serial latest episode
Sant Dnyaneshwar Maharaj
Dnyaneshwar Mauli status
Dnyaneshwar Maharaj serial title song
Sant Dnyaneshwar Maharaj Marathi movie
Alandi History
Sanjivan samadhi sohala 2024
indrayani kathi devachi alandi
sant Dnyaneshwar maharaj sanjivan samadhi sohala 2024
samadhi sohala 2024
Alandi Yatra 2024
kartiki Yatra 2024
Mauli samadhi sohala 2024
aalandi yatra 2024
alandi yatra
आळंदी पालखी सोहळा 2024
इंद्रायणी काठी देवाची आळंदी
समाधी घेतली आळंदी
सोडुन आळंदी पुणे पालखी आली जेजुरीला
ज्ञानेश्वर माऊली मालिका
संत ज्ञानेश्वर महाराज जीवन चरित्र
मांडे कसे बनवतात
मांडे रेसिपी
मांडे मराठी रेसिपी
संत मुक्ताबाई
संत सोपान महाराज
आळंदी मधील ठिकाणे
आळंदी लाईव्ह
आळंदी मंदीर दाखवा
आळंदीचे मंदीर
देहू आळंदी मंदीर
आळंदी इतिहास
आळंदी माहिती
इंद्रायणी नदी
भागीरथी कुंड आळंदी
संत ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळा 2024
ज्ञानेश्वर माऊली समाधी सोहळा
संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा 2024
आळंदी यात्रा 2024
कार्तिकी यात्रा आळंदी 2024
माऊली समाधी सोहळा 2024
माऊली समाधी सोहळा आळंदी 2024
आळंदी 2024
आळंदी लाईव्ह दर्शन

Опубликовано:

 

8 июл 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,4 тыс.   
@rageshreeshastri138
@rageshreeshastri138 Год назад
माऊलीचें निवास स्थान..सिध्दबेेट ..मी गेलेय..इतकं मन शांत, मानसिक शांती मिळाली होती..पण आज अशी सिध्दबेटाची अवस्था पाहूनच ह्रदयात कळ आली. मन आक्रंदन करु लागले.😢😭 सिध्दांच्या निवासाची अशी अवस्था करणारे मोठी माणसंच आहेत जे आळंदीचे रहिवासी आहेत. आळंदीच्या रहिवाशांंकडूून ही अपेक्षाच नाही..🥺😢 स्थानिक पातळीवर सिध्दबेटाचं महात्म्य जाणणारे आळंदीकर आक्षेप घेत नाहीत का? महात्म्य माहित नाही असा पोर आळंदीत सापडणार नाही. शासकीय यंत्रणा सज्ज करुन सिध्दबेटाची व्यवस्थित व्यवस्था निर्माण करुनच महात्म्य वाढवावेत. बाधा आणून क्षेत्र महात्म्यास कलंक लागेल असं वर्तन, दुराचार, होऊ नये कठोर निर्णय घेण्यात यावेत.. 🚩जय जय राम कृष्ण हरी!🚩माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय!🚩🙏🪔🌹 स्थानमहात्म्य जाणून त्या पांडुरंगला तरी घाबरावे . ज्ञानेश्वर माऊली , पांडुरंग माऊली मवाळ, प्रेमळ आहेत म्हणून काहीही वर्तन करु नये. शासनाने लक्ष घालावे . हीच एक विनंती. माणूस स्वतः स्थान महात्म्य जाणूनच शिस्तीत, शिस्तबद्ध आचरण करेल तर फार छान होईल, शासनाकडून मदत होणार, शासनास वेठीस धरून सन्मार्गावर चालण्यास सवय लावुन घेणं किती दुर्दैव..😢॥ ॐ सिध्देश्वराय नमः॥ जय जय राम कृष्ण कृष्ण हरी!🙏🪔🌹
@Paulvata
@Paulvata Год назад
माऊली.. सिद्ध बेट अतिशय पवित्र स्थळ आहे. त्याचे महत्त्व या व्हिडीओ मध्ये सांगण्यात आलेलं आहे. येथील वास्तव समोर आणल्यामुळे किमान सिद्ध बेट प्रकाश झोतात आले आहे आहे. आता बरेच स्वयंसेवक येथे लक्ष घालत आहेत. स्वच्छ्ता होत आहे. नक्कीच प्रशासन येथे लक्ष घालुन विकास कामे करेल. राहिला प्रश्न स्थानिकांचा. यासाठी स्वयंशिस्त गरजेची आहे. माऊली.. तुमचं मत मांडल्या मुळे तुमचे आभार.. शक्य असल्यास हा व्हिडिओ तुमच्या WhatsApp ग्रुप मध्ये शेअर करा. कारण तुमचा एक एक शेअर खुप महत्वाचा आहे 🙏🙏
@SunandaGund
@SunandaGund Год назад
फडफडफफफडफफ डषफडठपघःठठठडघ्फफफघफडफ्घफठफडडफडघ्डघठघफघफघडःफघडःघजडघडघफडडफघ्ठषफडडडडडडडफडडडफफठफघफघफडडःडड्डफडघजःडडघड फफड्अःफघडडफफफ
@akshayachavan8694
@akshayachavan8694 Год назад
. ,zaa1ď
@rageshreeshastri138
@rageshreeshastri138 9 месяцев назад
@@akshayachavan8694 what is the longform &meaning of your reply? Where do you live?
@ChandrakalaComedy
@ChandrakalaComedy Месяц назад
हजारो लोक आळंदीला येतात त्यांना स्वच्छता दिसली तर त्यांचे मन किती, प्रसन्न होईल म्हणून शासनाने आणि ग्रामीण लोकांनी फार जागरूक रहावे कारण देहू आळंदी ही फारफार पवित्र अशी ठिकाणे आहेत याची सामान्य जिवांना कल्पनाही नसते म्हणून कळकळीची विनंती आहे की उगीच पापाचे धनी होऊ नका
@savitajade9824
@savitajade9824 Год назад
आ भा र माऊली. माऊली महावैष्णव श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सिद्धबेटाचं दर्शन आम्हाला घडविल्याबद्दल. धन्य धन्य धन्य. ........ तसेच आत्ताची अशी दुरावस्था झालेली पाहून मन विषण्ण झाले. ....ज्ञानोबा माऊली , आम्हाला क्षमा करा. आम्ही अजूनही रेडेच राहीलोत माऊली... रेडे. तरीही आम्हाला क्षमा करा. पाहु, शासन प्रशासन काय करतंय का ते.अन्यथा आम्ही स्वत: तेथे येऊन करू कांहीं स्वच्छता. आळंदीकरांनो, पहा , पहा डोळे उघडून !! महाराष्ट्रा....पहा उघड्या डोळ्यांनी ................. .......जय हरी , जय हरी , जय हरी .
@Paulvata
@Paulvata Год назад
काही निष्काळजी लोक, विघ्नसंतोषी माणसे आणि शासनाचे दुर्लक्ष या सर्व गोष्टींचं परिपाक म्हणजे आताची परिस्थिती. वेळीच सिध्द बेट कडे लक्ष देण्याची गरज. माऊली.. शक्य झाल्यास हा व्हिडीओ आपल्या मित्रांना आणि नातलगांना पाठवा. कदाचीत तुमच्या एका शेअर मुळे हा व्हिडिओ प्रशासना पर्यंत पोहचेल. 🙏
@sidworldofficial
@sidworldofficial 2 года назад
संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यभूमीचे दर्शन घडवल्याबद्दल मनापासून आभार🙏. आपले कौतुक करावे तेवढे कमीच, .....काय ती अभ्यासपूर्ण माहिती, काय ती वाक्यरचना, काय ते विनम्रपणे सखोल ज्ञान मांडले. वाह दादा...👌सिद्धबेटाचा इतिहास सांगितला सोबतच आजचे धगधगते वास्तव दर्शन घडवले. मान्यच आहे माई इंद्रायणी नदीला आपणच दुषित केले आहे, सिद्धबेटासारखी धार्मिक स्थळे पुढील पिढीला पाहता यावी असा लोकजागर होण्यासाठी प्रभावी प्रयत्न व न्याय देणारा व्हिडिओ ✌😇👌पुन्हा एकदा मनपुर्वक शुभेच्छा अन् आभार🙏
@Paulvata
@Paulvata 2 года назад
#SidWorld सर.. तुम्ही नेहमीच पाऊलवाटाचे तटस्थ आणि दर्जेदार दर्शक आहात. काही चुका असतील तर नक्कीच लक्षात आणुन द्या.
@sundardaspathade9961
@sundardaspathade9961 Год назад
माऊली 🙏 सिद्धबेटाबद्दल ऐकले होते परंतु महाराज आपले मुले ते पहावयास मिलाले धन्यवाद 🙏🚩
@Paulvata
@Paulvata Год назад
माऊली.. सिद्ध बेट अजुन दुर्लक्षितच आहे. आता गरज आहे ती जनजागृतीची.. शक्य तितका हा व्हिडिओ शेअर करा.. जय हरी माऊली 🚩🙏🚩
@smitachandratreya3043
@smitachandratreya3043 Год назад
खुप छान माहिती मिळाली सिद्ध बेटाची - धन्यवाद माऊली !🙏🙏🙏🙏
@Paulvata
@Paulvata Год назад
खुप खुप आभारी आहे ताईसाहेब.👏 शक्य झाल्यास हा व्हिडीओ आपल्या मित्रांना आणि नातलगांना पाठवा. तुमचा एक शेअर खुप महत्वाचा आहे. कदाचीत तुमच्या एका शेअर मुळे हा व्हिडिओ प्रशासना पर्यंत पोहचेल 🙏
@sairajmirajkar4974
@sairajmirajkar4974 Год назад
🌴🌴माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय🌻🌻🌹🌹🌴🌴 की
@Paulvata
@Paulvata Год назад
जय हरी माऊली 👏 शक्य झाल्यास हा व्हिडीओ आपल्या मित्रांना आणि नातलगांना पाठवा. तुमचा एक शेअर खुप महत्वाचा आहे. कदाचीत तुमच्या एका शेअर मुळे हा व्हिडीओ प्रशासना पर्यंत पोहचेल.🙏
@sangitashinde2498
@sangitashinde2498 Год назад
खूप छान माहिती दिली..... नक्की जावेसे वाटले
@Paulvata
@Paulvata Год назад
एकदा नक्की भेट द्या.. अपेक्षा आहे की परिस्थिती कदाचीत बदललेली असेल.. आणि हो हा व्हिडिओ शक्य तेवढा शेअर करा.. तुमचा एक शेअर खुप महत्वाचा आहे.. जय हरी माऊली 🚩👏🚩
@user-sx9pu2vw4n
@user-sx9pu2vw4n Год назад
अप्रतिम फारच छान मन हेलावून गेले अशा कामांसाठी तुम्हाला माऊलींचा आशिर्वाद तुम्हाला मिळो
@Paulvata
@Paulvata Год назад
तुमच्या करवी माऊलींचा आशीर्वाद आहेच की.. असेच प्रोत्साहन कायम देत चला 😊 खुप खुप आभारी आहे सर 😊🙏
@adarshsirsat3165
@adarshsirsat3165 6 месяцев назад
माऊलीचे निवास स्थान बघून डोळ्यात पाणी आले
@suvarnaranjale7253
@suvarnaranjale7253 Год назад
माऊली राम कृष्ण हरी तुम्ही हा व्हिडिओ बनवल्याबद्दल तुमचे कोटी कोटी आभार अशाच व्हिडिओच्या आपल्याला गरज आहे आपल्या साधू संतांचे पावित्र्य आणि त्यांच्या राहत्या वास्तूंचा पावित्र्य राखण ही काळाची गरज आहे धन्यवाद माऊली धन्यवाद
@Paulvata
@Paulvata Год назад
सुवर्णा ताई.. प्रथमः आपले खुप खुप धन्यवाद या सुंदर कमेंट साठी.. सध्याचे वास्तव खूपच भयानक आहे. मला वाटतं प्रशासन याची नक्कीच दखल घेईल.. तुम्हाला जर शक्य झाले तर हा व्हिडीओ आपल्या नातलगांना शेअर करा. तुमचा एक शेअर खुप महत्वाचा आहे.. जय हरी माऊली 🙏🚩🙏
@chintamanidesai7311
@chintamanidesai7311 Год назад
जय जय रघुवीर समर्थ . अचाट अध्यत्मिक आणि गौरवपूर्ण संस्कृती लाभलेलं आणि शिवरायांच्या पराक्रमाने उकळून निघालेल हे महाराष्ट्र आपण सर्वांनीच जपलं पाहिजे
@manishamalgundkar2358
@manishamalgundkar2358 Год назад
माऊली खूपछान माहिती मिळाली 🙏🙏🌹
@Paulvata
@Paulvata Год назад
जय हरी माऊली.. 🚩🙏🚩
@sanjayshinde6361
@sanjayshinde6361 Год назад
माऊली खुप पवित्र अशा आळंदी देवाची चांगली माहिती दिली 🎉
@Paulvata
@Paulvata Год назад
खुप खुप आभारी आहे माऊली 🌹🙏🌹
@shakuntalakhadamkar6268
@shakuntalakhadamkar6268 Год назад
सरकारने खरोखर यात लक्ष चालून सिद्धबेट समृद्ध करावे 🙏🚩🚩🚩
@Paulvata
@Paulvata 9 месяцев назад
नक्कीचं माऊली.. आता याची गरज आहे 🙏🙏
@sulbhakalambarkar8573
@sulbhakalambarkar8573 Год назад
या पवित्र स्थळाकडे शासनाचे लक्षजावो हेच विठ्ठल चरणी प्रार्थना
@Paulvata
@Paulvata Год назад
सर्वांची हिच ईछा आहे माऊली 🙏🙏 #siddhabet
@laxmikantberad7960
@laxmikantberad7960 Год назад
रामकृष्णहरि रामकृष्णहरि माऊली. खुप छान माहिती दिली. धन्यवाद.
@Paulvata
@Paulvata Год назад
खुप खुप आभारी आहे माऊली.. शक्य झाल्यास हा व्हिडीओ आपल्या मित्रांना शेअर करा.. जय हरी माऊली 🚩🙏🚩
@madhukarborade2557
@madhukarborade2557 Год назад
आपण सिद्धबेटा संबंधित हळूवार पणे सांगितलेली माहिती खूप चांगली वाटली. आम्ही अनेकवेळा श्री माऊलींच्या दर्शनासाठी आनंदीस जातो परंतु सिद्धबेटासंबंधी माहिती नसल्याने तेथील दर्शन घेण्याचा योग आला ना नाही. परंतु श्री माऊलींनी आम्हाला तेथे येऊन जाणे संबंधी पुढील आदेश दिले तर तिथे नक्कीच जाणेचा मानस आहे. फक्त श्री माऊलींच्या कृपेची वाट पहात आहोत. या महत्वाच्या जागेवर घाण टाकणारे फारच पापी असावेत. परंतु स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायत वगैरेंनी सुध्दा दुर्लक्ष करणे ही दुर्दैवी बाब आहे.
@marutiraut6220
@marutiraut6220 Год назад
माऊली, फार सुंदर माहिती दिली. मात्र या सिद्धबेटाच्या सध्याची अवस्था जी दाखविली आहे त्याचे वर्णन ऐकून मनाला वाईट वाटले, आणि सिद्धबेटाची अशी अवस्था करणाऱ्या नालायक मंडळींना देवा काही शिक्षा कां करीत नाही? असे म्हणावे वाटते. त्याच या पवित्र स्थळाकडे स्थानिक स्वराज्य संस्थेचे आणि आळंदी देवस्थान ट्रस्टचे दुर्लक्ष असल्या बद्दलही खेद वाटतो. आपण माहिती दिल्या बद्दल आपले धन्यवाद. 🙏🙏
@anitapote5248
@anitapote5248 Год назад
ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली 🙏
@Paulvata
@Paulvata Год назад
जय हरी माऊली 🙏🚩🙏 #DnyaneshwarMaharaj
@shailasarode5733
@shailasarode5733 Год назад
🙏🏻खूप सुंदर माहीती मिळाली दादा या व्हिडिओ मुळे, श्री ज्ञानेश्वर माऊलींचे राहण्याचे ठिकाण, सिद्धेबेटाची माहीती, अजानवृक्ष, व बरेच काही जे माहीत नव्हते, खूप धन्यवाद!! पण शेवट बघून मात्र मन विषन्न झाले. 🌹🙏🏻श्री ज्ञानेश्वर माऊली 🙏🏻🌹
@Paulvata
@Paulvata Год назад
ताईसाहेब.. तुमच्या सहकार्यामुळे आमचे मनोबल वाढते. असेच सहकार्य कायम असु द्या. हा व्हिडिओ शेअर केल्या बद्दल तुमचे खुप खुप आभार. .
@ambadasparve7440
@ambadasparve7440 Год назад
खुप छान माहिती दिली माऊली💐🙏💐
@Paulvata
@Paulvata Год назад
खुप खुप आभारी आहे माऊली 🚩🙏🚩 #आळंदी
@sunitashewale8386
@sunitashewale8386 Год назад
🚩🚩🚩🚩👋👋👋👋 खूपच छान माहिती.. मन तल्लीन झाले.. 👋👋👋👋
@Paulvata
@Paulvata Год назад
खुप खुप आभारी आहे ताईसाहेब.. शक्य झाल्यास हा व्हिडीओ आपल्या नातलगांना शेअर करा.. तुमचा एक शेअर सिद्ध बेट साठी खुप महत्वाचा आहे..🙏🚩🙏
@surekhaekatpure3101
@surekhaekatpure3101 Год назад
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
@Paulvata
@Paulvata Год назад
खुप खुप आभारी आहे ताईसाहेब 🙏😊🙏 #पाऊलवाट
@varsharanijadhav4533
@varsharanijadhav4533 Год назад
माझी आई आता माऊलींच्या समाधी सोहळा सप्ताह झाला त्यासाठी आठ दिवस आली तर समाधी सोहळा संपन्न झाल्यावर आईच्या भजनी मंडळाच्या मैत्रिणी सोबत जावून आली तेव्हा आम्हाला घरी आल्यावर सिद्धबेटाबद्दल सर्व माहिती सांगितली तेव्हा त्या तिर्थ क्षेत्राबद्दल कळाले नाहीतर आम्हाला काहीच माहिती नव्हती पण आज आपला व्हिडिओ पाहिला तर अजूनही माहिती मिळाली आणि ज्ञानात भर पडली. धन्यवाद 🙏🏻
@Paulvata
@Paulvata Год назад
वर्षा ताई.. खुप खुप आभारी आहे या सुंदर अनुभवासाठी.. खंत एकच आहे की.. सिद्ध बेट अजुनही दुर्लक्षित आहे. आमचा हाच प्रयत्न आहे की सिद्धबेट हे पवित्र स्थळ सर्वापर्यंत पोहचवणे.. जर तुम्हाला शक्य झाले तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना आणि नातलगांना पाठवा.. त्यामुळे हे ठिकाण खुप लोकांपर्यंत पोहोचेल..
@sayajijadhav.3578
@sayajijadhav.3578 Год назад
शासनाने लवकर लक्ष घालून सुधारणा करून घ्यावी. राम कृष्ण हरी माऊली
@Paulvata
@Paulvata 11 месяцев назад
राम कृष्ण हरी माऊली 🙏🌹🙏
@krishnabaravkar1564
@krishnabaravkar1564 Год назад
राम कृष्ण हरि ही सुद्धा एक भक्तीच आहे.माऊलींच महत्व नक्कीच वाढल्याशिवाय राहणार नाही.कारण आपल्याला माऊलींची प्रेरणा हे करायला भाग पाडत आहे. धन्यवाद साहेब राम कृष्ण हरि
@Paulvata
@Paulvata Год назад
माऊली.. शक्य तेवढे प्रयत्न सुरू आहेत. आता आपल्या पाठबळाची गरज आहे. शक्य झाल्यास हा व्हिडीओ शेअर करा. तुमचा एक शेअर खुप महत्वाचा आहे 🙏🙏
@sanjaypaithankar8362
@sanjaypaithankar8362 Год назад
खुप छान माहिती. मन प्रसन्न होते.
@Paulvata
@Paulvata Год назад
खुप खुप आभारी आहे माऊली.. पण व्हिडिओचा शेवट पाहिला का?
@santoshkavade7045
@santoshkavade7045 Год назад
महाराषट्रातील तमाम वारकरी बंधूंना व तसेच सर्व वारकरी संघटना यांना माझी हात जोडून विनंती आहे आपण सर्व मिळून एकदा या सिध्द बेटाची पवित्र राखण्यासाठी आंदोलन केले पाहिजे ..🙏.. राम कृष्ण हरी..🙏
@Paulvata
@Paulvata Год назад
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या वास्तव्याने पावन झालेली भुमी पुन्हा एकदा उजळुन निघावी एवढीच माफक अपेक्षा आहे.. सर्वच प्रश्न आंदोलनाने सुटत नाहीत माऊली..
@balajipatange1071
@balajipatange1071 Год назад
खरच दादा जगाने शिकवण घ्यावी आशी आपली माऊली आणी त्या माऊलीच्या माय भूमीत कोणचेच लक्ष्य नाही हे चुकीचे आहे दादा तुम्ही एक संगठना करा आणी त्या मार्फत प्रयत्न करू जय हरी दादा.
@Paulvata
@Paulvata 9 месяцев назад
नक्कीचं माऊली.. असेच सहकार्य कायम असु द्या 🙏
@user-dv3ju9ys4q
@user-dv3ju9ys4q 7 месяцев назад
माऊलीची ज्या लोकांना कदर नाही.तेच लोक मुद्दाम आळंदीत ठिक ठिकाणी घाण करतात.माऊलीच्या चरणी शिरसाष्टांग दंडवत. राम कृष्ण हरी. विठ्ठल रुक्मिणी माय बापाची कृपा.
@Paulvata
@Paulvata 7 месяцев назад
राम कृष्ण हरी माऊली 🌹🙏🌹
@indumatipawar9532
@indumatipawar9532 Год назад
धन्यवाद माऊली, जय हरी. 🙏 अमूल्य अशी माहिती सांगितल्याबद्दल खूप खूप आनंद झाला. सिद्धटेक बद्दल ऐकूनच होतो पण प्रत्यक्ष दर्शन झाले. जय हरी माऊली. 🙏🙏🙏
@Paulvata
@Paulvata Год назад
ताईसाहेब अजुन सिद्धबेटला भेट दिली नसेल तर यापुढे कधी आळंदीला आलात तर नक्की भेट द्या. आताचे वास्तव काय आहे हे तुमच्या लक्षात येईल. आणि विनंती आहे की हा व्हिडिओ शक्य तेवढा शेअर करा. तुमचा एक शेअर खुप महत्वाचा आहे 🙏
@navnathgorave8455
@navnathgorave8455 Год назад
माऊलीचे दर्शन झाले की मन भरून जाते माणूस पोट भरुन जेवला की नतंर काही खाण्या पिण्याची ईचच्छा होत नाही तस माऊलीच्या समाधी वर नतमस्तकी झाली की धनन्य होतो
@Paulvata
@Paulvata Год назад
अगदी बरोबर आहे.. हीच ताकत आहे माऊली दर्शनाची.. जय हरी माऊली 🙏🙏
@saudagarnakate1431
@saudagarnakate1431 Год назад
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🙏🙏
@Paulvata
@Paulvata Год назад
@@saudagarnakate1431 माऊली 🙏🙏
@arvind2556
@arvind2556 Год назад
आणि आपण घेतलेल्या एकूणच भक्तीमय तीर्थक्षेत्रा केलेले महिती युक्त चित्रण प्रशवसनीय उलेखनिय वाखडण्यास पात्र व खरच ह्या सर्व आजच्या विदारक वास्तव परिस्थिती चा सर्व समाज बांधवांनी व शासनपातळीवर घेतली जावी हीच प्रार्थना 🙏🚩🚩🚩🚩🚩
@Paulvata
@Paulvata Год назад
अरविंद सर.. आपल्या सारख्या सुजाण नागरिकांनी याची दखल घेतली ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. माऊली शक्य झाल्यास हा व्हिडीओ आपल्या मित्रांना आणि नातलगांना पाठवा तुमच्या एका शेअर मुळे कदाचीत हा व्हिडिओ अजुन लोकांपर्यंत पोहोचेल. जय हरी माऊली 🚩🙏🚩
@arvind2556
@arvind2556 Год назад
अक्षम्य दुर्लक्ष 😠, खरच इतका दुर्मिळ भक्ती चा वारसा , जेव्हा तेव्हा ज्याप्रमाणे प्रथम दर्शनी अत्यंत भाविक , भाऊक झालेले मन व्हिडिओच्या शेवट च्या भागातील चित्रण बघून अत्यंत मन विषण्ण व उदविग्न करणारे असे आणि एकूणच आपलेच लोक असे वागतात बघून हे दुःख दायक आहे
@Paulvata
@Paulvata Год назад
अरविंद सर. हे आजचे विदारक वास्तव आहे. तुमची प्रतिक्रिया खुप मोलाची आहे. या पुढेही असेच सहकार्य कायम असु द्या.. हा व्हिडिओ शेअर केल्याबद्दल खुप खुप आभारी आहे.. जय हरी माऊली 🚩🙏🚩
@deepakkudtarkar9550
@deepakkudtarkar9550 Год назад
🙏🌹 रामकृष्ण हरी माऊली 🌹🙏 ज्ञानेश्वर माऊली महाराज 🌹🌹🙏🙏
@Paulvata
@Paulvata Год назад
Ram krushna Hari Mauli 😊 #AlandiYatra
@rohiniwakshe815
@rohiniwakshe815 Год назад
प्रशासनाला टाईम कुठे आहे असल्या धार्मिक स्थळाकडे ध्यान द्यायला त्यांचा फक्त ध्यान आहे खुर्ची वरती त्यांना काहीही पडले नाही हे आपण सगळे वारकरी मिळून काम केलं पाहिजे आपल्या माऊलीचा सिद्ध भेट आपणच स्वच्छ करायला हवं तळीरामांचा होणार अतिक्रमण त्यांच्यावर कुठेतरी लगाम बसवला पाहिजे प्रशासनाचे डोळे उघडत नसतात आपण सगळ्यांनी मिळून पुढे यायला हवं
@Paulvata
@Paulvata Год назад
माऊली.. प्रशासनाला लक्ष द्यावचं लागेल. अशीच अवस्था कित्तेक धर्मीक स्थळांची आणि गड किल्ल्यांची झाली आहे. प्रशासनाच्या लक्षात आणुन देण्याचा हा व्हिडिओ म्हणजे एक प्रयत्न आहे . तुम्हाला विनंती आहे की हा व्हिडिओ शक्य होईल तेवढा शेअर करा. कारण तुमचा एक एक शेअर खुप महत्वाचा आहे 🙏🙏
@sunitanalawade9109
@sunitanalawade9109 Год назад
अतिशय महत्वपूर्ण माहिती दिली धन्यवाद. प्र शासनापेक्षा प्रत्येक व्यक्ति ने आपल्या धार्मिक स्थळांचि स्वच्छता ठेवली पाहिजे छत्रपति शिवाजी महाराज कि जय राम कृष्ण हरि
@Paulvata
@Paulvata Год назад
खुप खुप आभारी आहे माऊली.. शक्य झाल्यास हा व्हिडीओ आपल्या मित्रांना आणि नातलगांना पाठवा. तुमचा एक शेअर खुप महत्वाचा आहे.
@madhavkendre1323
@madhavkendre1323 7 месяцев назад
माऊली यांचे चरित्र खूप अनमोल आहे सिद्ध बेटाचा आराखडा तयार करून त्या ठिकाणी भव्य असे मंदिर उभारले पाहिजे.
@Paulvata
@Paulvata 7 месяцев назад
जय हरी माऊली 🌹🙏🌹
@Paulvata
@Paulvata 7 месяцев назад
जय हरी माऊली 🌹🙏🌹
@shodhvarta
@shodhvarta 2 года назад
अप्रतिम वर्णन, सिद्धबेटला जेंव्हा आपण भेट देतो तेंव्हा काहीतरी वेगळं पाहायला मिळतं... पण आपण आपल्या कौशल्याने अवर्णनीय व्हिडीओ बनवला आहे. आणि विशेष म्हणजे वर्तमान अवस्था दाखवून ट्रस्टला सणसणीत चपराक सुद्धा लावली आहे...
@Paulvata
@Paulvata 2 года назад
#शोधवार्ता सिद्धबेट पाहायला जाताना अपेक्षा खुप वाढलेल्या असतात. पण बऱ्याच वेळा त्या पुर्ण होत नाहीत. खुप खुप आभारी आहे या सुंदर कमेंट साठी.. जय हरी माऊली 🚩🙏🚩
@mohinipatil8808
@mohinipatil8808 Год назад
माऊली चरणी कोटी कोटी प्रणाम जय जय रामकृष्ण हरी
@Paulvata
@Paulvata Год назад
जय हरी माऊली 🙏🌹🙏
@dagadutilekar2526
@dagadutilekar2526 Год назад
सर्व राजकीय नेते पुढारी मंत्री सरकार आणि महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांना व मराठी माणसांना खरोखर लाज वाटायला पाहिजे आपण जे दाखवले ते अगदी सत्य आहे आपले खूप खूप आभार
@Paulvata
@Paulvata Год назад
माऊली.. आपल्या सारख्या जागृत व्यक्तींचे पाठबळ असले की सत्य मांडण्याची हिंमत होते. तुम्हाला शक्य झाल्यास हा व्हिडीओ तुमच्या WhatsApp ग्रुप मध्ये शेअर करा. कदाचीत तुमच्या एका शेअर मुळे हा व्हिडिओ योग्य व्यक्ती पर्यंत पोहचेल. तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे. 🙏🙏
@meghabhojane1447
@meghabhojane1447 8 месяцев назад
जुन्या पुराण्या वस्तू व्यवस्थित ठेवणे हेच योग्य आहे ज्ञानेश्वर महाराजांची कृपा त्यांच्यावर असू द्यावे
@Paulvata
@Paulvata 8 месяцев назад
जय हरी माऊली 🌹🙏🌹
@dnyaneshwarjaybhaye2862
@dnyaneshwarjaybhaye2862 Год назад
खूपच सुंदर माहिती दिली माऊली सिध्द बेटाबद्दल अशा पवित्र मातीला तिथल्या नागरिकांनी घाण करू नये हिच पांडुरंग चरणी प्रार्थना🙏🙏🙏
@Paulvata
@Paulvata Год назад
हिच वस्तुस्थिती आहे माऊली
@savitajade9824
@savitajade9824 Год назад
साष्टांग दंडवत माऊली................... """""""""""""""""""""""""""""""""""""""""""""" आता आळंदीला आल्यावर सिद्धबेटाचं दर्शन निश्चितच घेऊ. मन:पूर्वक आभार माऊली 🙏🙏🙏
@Paulvata
@Paulvata Год назад
खुप खुप आभारी आहे माऊली. शक्य झाल्यास हा व्हिडीओ आपल्या मित्रांना आणि नातलगांना पाठवा. तुमचा एक शेअर खुप महत्वाचा आहे माऊली 🚩🙏🚩
@dnyaneshwarpawar1671
@dnyaneshwarpawar1671 11 месяцев назад
अतिशय सुरेख माहिती दिली जय हरी
@Paulvata
@Paulvata 11 месяцев назад
जय हरी माऊली 🙏🌹🙏
@PaditKubar-ri4fn
@PaditKubar-ri4fn Год назад
खूप छान माहिती समोर आली धन्यवाद
@Paulvata
@Paulvata Год назад
खुप खुप आभारी आहे माऊली.. शक्य झाल्यास हा व्हिडीओ तुमच्या WhatsApp ग्रुप मध्ये शेअर करा. कदाचीत तुमच्या एका शेअर मुळे हा व्हिडिओ योग्य व्यक्ती पर्यंत पोहचेल.
@pujajadhav8864
@pujajadhav8864 11 месяцев назад
राम कृष्ण हरी माऊली जय हरी माऊली धने धने माऊली 😭💔💔💔💔💔👏👏👏👏👏👏👏👏
@Paulvata
@Paulvata 11 месяцев назад
राम कृष्ण हरी माऊली 🙏🌹🙏
@mangaladatir9570
@mangaladatir9570 Год назад
मुक्ताई गुरु बरोबर
@Paulvata
@Paulvata Год назад
या साठी एखादे प्रमाण असेल तर नक्की सांगा माऊली 🙏🌷🙏
@pramilahendre2693
@pramilahendre2693 Год назад
रामकृष्ण हरी ज्ञानेश्वर महाराज की जय
@Paulvata
@Paulvata Год назад
प्रमिला ताई खुप खुप आभारी आहे.. शक्य झाल्यास हा व्हिडीओ आपल्या नातलगांना शेअर करा. कदाचीत आपल्या एका शेअर मुळे सिद्धबेट मध्ये सुधारणा घडून येईल.🙏🚩🙏
@s-craftdrawing4375
@s-craftdrawing4375 Год назад
नीरुती नाथ ज्ञानेश्वर माऊली देहु सोपानदेव मुक्ताबाई पीता वीठ्ठल पंत माता रुक्मीणी या सर्व संता चे दर्शन आपन सर्व भक्ता ना भाव भक भक्ती ने घडवुन दीले सर्व भक्ता वर मावली आशीर्वाद देत आहे सर्व भक्त आनंद उत्सवात तल्लीन आहे मी आपले अभी नंदन वंदन करतो माउली सदव तुमच्या वर कुरपा करीत राहो तुमचे काम सफल होत राहो राम कृष्ण हरी 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏
@Paulvata
@Paulvata Год назад
खुप खुप आभारी आहे माऊली.. असेच सहकार्य आणि प्रेम कायम असु द्या..🙏🚩🙏
@sandeeprakshe6565
@sandeeprakshe6565 Год назад
आभारी आहे दादा सिद्धबेट हे ज्ञानपीठ होण गरजेचे आहे.. जिथे ज्ञानयोगी संत ज्ञानेश्वर महाराजांचे वास्तव्य होते ती भूमी किती पवित्र असणार पण लोकांना या भूमीचे काहीच देणघेण दिसत नाही
@Paulvata
@Paulvata Год назад
संदीप सर.. सिद्धबेट हे ज्ञानपीठ होण गरजेचंच आहे पण त्याहून महत्वाचं आहे की.. अगोदर हे ठिकाण पवित्र असणं गरजेचं आहे.. सर शक्य झाल्यास हा व्हिडीओ आपल्या मित्रांना आणि नातलगांना पाठवा तुमच्या एका शेअर मुळे कदाचीत हा व्हिडिओ प्रशासना पर्यंत पोहचेल.🙏🚩🙏
@dhanyakumarpatwa5691
@dhanyakumarpatwa5691 Год назад
आवश्यक माहीती आहे याचे चिंतन करुन सर्वांना ही माहिती झाली पाहिजे कायमसाठी याचे स्मरण राहिले माहिती दिल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा
@Paulvata
@Paulvata Год назад
खुप खुप आभारी आहे माऊली. असेच पाठबळ असु द्या. शक्य असल्यास हा व्हिडिओ तुमच्या WhatsApp ग्रुप मध्ये शेअर करा.🙏🙏
@dhanashree8499
@dhanashree8499 10 месяцев назад
खरंच सरकारने याकडे लक्ष दिले पाहिजे कारण आम्हाला सुद्धा या बाबतीत खूप कळकळ वाटते की सुधारणा व्हावी कारण आम्ही स्वतः आळंदीत राहतो पण काही करू शकत नाही हा व्हिडिओ सरकार पर्यंत पोहोचला
@Paulvata
@Paulvata 9 месяцев назад
माऊली.. सिध्दबेटात आता सुधारणा होत आहेत. चांगल्या गोष्टी साठी वेळ लागतो. शक्य झाल्यास हा व्हिडिओ शेअर करा 🙏
@Abhishek-og2hp
@Abhishek-og2hp Год назад
खूप वाईट वाटल माऊली च्या ठिकाणी अशी वाईट कृत्य लोक करतात...😢
@Paulvata
@Paulvata Год назад
माऊली.. जनजागृती झाली की तेथील स्थानिकच या गोष्टींचा विरोध करतील. तुम्हाला शक्य झाल्यास हा व्हिडीओ जास्तीत जास्त शेयर करा. तुमचा एक शेअर खुप महत्वाचा आहे 🙏🙏
@gajadhav
@gajadhav Год назад
सिध्दबेटाचा व्हीडीओ नक्कीच विकास घडवेल आपला हा प्रयत्न निश्चीत कौतुकास्पद आहे...
@Paulvata
@Paulvata Год назад
खुप खुप आभारी आहे माऊली 🙏 तुमच्या कौतुकाच्या शब्दांनी आमचे मनोबल वाढते. असेच सहकार्य कायम असु द्या. सर.. आता सिद्धबेट मध्ये बऱ्याच सुधारणा दिसून येत आहेत. आणि भविष्यातही या वाढत राहतील.🙏
@shrivardigital6463
@shrivardigital6463 Год назад
🙏🙏 नमस्कार माऊली आपण एवढी छान माहिती दिली आहे की जे ठिकाण पाहीले नाही ते पाहण्यात मिळाले व थोड्या वेळात च आळंदी दर्शन झाले पण शेवटची आळंदी ची स्थिती पाहून खूप वाईट वाटले आज अशी स्थिती आहे तर पुढच्या पिढीला कसें समजणार ज्ञानेश्वर महाराजांच्या बद्दल शासनाने याकडे लक्ष द्या यलाच पाहिजे माहिती दिली जाते त्या चे खुप खुप धन्यवाद माऊली जय जय हरी ज्ञानोबा माऊली 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@Paulvata
@Paulvata Год назад
Shrivar Digital.. माऊली.. आपला इतिहास दैदिप्यमान आहे. पण आता मात्र याच इतिहासाकडे दुर्लक्ष होत आहे. येथे विकास कामे जरी मर्यादित असली तरी आहे ती स्थळे तरी पवित्र असावीत मोकाट नसावीत. खरचं आताची परिस्थिती विदारक आहे.. आणि ही गोष्ट प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याची गरज आहे..
@kesarinathmhatre1075
@kesarinathmhatre1075 Год назад
खुप छान माहिती दिली माऊली धन्यवाद जय श्री हरी विठ्ठल माऊली रामकृष्ण हरी
@Paulvata
@Paulvata Год назад
खुप खुप आभारी आहे माऊली 🙏🌹🙏
@amrutawankhede2423
@amrutawankhede2423 Год назад
तुम्ही दिलेली संपूर्ण माहिती खूप छान होती पण जे शेवटला तुम्ही सांगितलं ते ऐकून खूप वाईट वाटले 😢😮
@Paulvata
@Paulvata Год назад
काय करणार माऊली... सत्य परिस्थिती आहे आणि खरं नेहमी कटूच असतं..
@bhagwantpagdhune5348
@bhagwantpagdhune5348 Год назад
ओम नमो श्री सद्गुरू सिध्देश्वर माऊली नमः राम कृष्ण हरि ओम.
@Paulvata
@Paulvata Год назад
जय हरी माऊली 🚩🙏🚩
@meenavaidya9026
@meenavaidya9026 Год назад
खरेच ,शासन झोपलेले दिसते,जय हरी विठ्ठल
@Paulvata
@Paulvata Год назад
आपल्या सारखे जागरूक भाविक असतील तर शासनाला सुद्धा याची दखल घ्यावी लागेल. शक्य झाल्यास हा व्हिडीओ आपल्या मित्रांना आणि नातलगांना पाठवा तुमच्या एका शेअर मुळे कदाचीत हा व्हिडिओ शासना पर्यंत पोहचेल.
@ashwinipande2491
@ashwinipande2491 Год назад
Bhau tumhi khup chan sandesh dila ahe ya videochya madhyamatoon dhanyvad
@Paulvata
@Paulvata Год назад
अश्विनी ताई.. काय करावं आताची स्थिती खुप भयंकर आहे आणि यामध्ये बदल अपेक्षित आहे. आणि आता आपली जबाबदारी आहे की ही गोष्ट प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याची.. त्यामुळे शक्य झाल्यास हा व्हिडीओ खुप शेअर करा..🙏🙏
@ramchandrapatil6356
@ramchandrapatil6356 Год назад
सिद्धबेट व आळंदीचे अतिशय सुंदर दर्शन आम्हाला प्रदर्शित केल्याबद्दल मी आपले आभार मानतो पण सुरुवात चांगली होऊन शेवट फार वाईट वाटला याचे मनाला फार दुःख झाले. लोकांनी स्वछता राखली पाहिजे, धन्यवाद! 🙏🏻🌹
@Paulvata
@Paulvata Год назад
माऊली.. पण ही वस्तुस्थिती आहे. आणि खरं नेहमी कडूच असतं.. जमल तर हा व्हिडीओ शेअर करा. तुमचा एक शेअर खुप महत्वाचा आहे 🙏🙏
@narayansolankar1651
@narayansolankar1651 Год назад
सध्यस्थितीत भंडारा डोंगर देहूचं जसं परिवर्तन होत आहे हे पाहून आनंद होत आहे तद्वतच माऊलींच्या सिद्धबेटची देखील सुधारणा व्हावी अशी विनंती प्रशासनाला आहे राम कृष्ण हरी🙏🙏🙏
@jpggadekar2040
@jpggadekar2040 Год назад
नोटबुक ऑफ शाई फड आहे बघू या पानावरून आणि त्या अनुषंगाने उपंजाबराव पंजाबराव हवामान पंजाबराव हवामान खात्या आहे ने आहे
@narayansolankar1651
@narayansolankar1651 Год назад
@@jpggadekar2040 काय समजले नाही दादा🙏🙏 समजून सांगाल का? 🙏
@Paulvata
@Paulvata Год назад
जय हरी माऊली 🙏🌹🙏
@bhagyashri2000
@bhagyashri2000 Год назад
तुमचा आवाज ऐकून आणि चित्रिकरण करण्याची पद्धत बघून बालचित्रवाणी पहिल्या सारखं वाटलं 👍👌
@Paulvata
@Paulvata Год назад
नेमकं हे चांगलं आहे की यात सुधारणा करावी?
@bhagyashri2000
@bhagyashri2000 Год назад
@@Paulvata चांगलं आहे ...फक्त लहानपणी पाहिलेलं आठवलं
@UdyogamOfficial
@UdyogamOfficial 2 года назад
माऊली आपल्यामुळे संत ज्ञानेश्वर महाराजांचे राहण्याचे ठिकाण पहावयास मिळाले. आपल्या सादरीकरणास तोड नाही. सिद्धबेटाची खरी महती सांगतानाच आपण आजचं धगधगतं वास्तव दाखवलं आहे.
@Paulvata
@Paulvata 2 года назад
महेश राव.. खुप खुप आभारी आहे.. #MaheshManeOfficial
@anjanabaipise9187
@anjanabaipise9187 2 года назад
@@Paulvata hu
@vishnuji8530
@vishnuji8530 Год назад
याच सिध्दबेटात आळंदी निवासी,,ह,भ,प, जयराम महाराज भोसले यांनी संपूर्ण आयुष्यभर तप केले,,,हजारो साधकाना ज्ञानेश्वरीचे शिक्षण दिले आहे
@Paulvata
@Paulvata Год назад
माऊली ह. भ. प. जयराम महाराज भोसले यांच्या बद्दल माहिती दिल्या बद्दल खुप खुप आभारी आहे.😊🙏😊
@ashokbobade968
@ashokbobade968 Год назад
@@anjanabaipise9187 vu
@user-qd4hn7zy2b
@user-qd4hn7zy2b 8 месяцев назад
खूप अनमोल अशी माहिती मिळाली धन्यवाद❤🙏❤🚩🔔❣️💐
@Paulvata
@Paulvata 7 месяцев назад
धन्यवाद माऊली 🙏🌹🙏
@uddhyogvarta
@uddhyogvarta Год назад
#संतज्ञानेश्वर महाराज यांची कर्मभूमी असलेल्या #सिद्दबेट बद्दल माहिती नसलेली माहिती आपण आम्हाला माहिती करून दिली त्याबद्दल आपले खूप खूप आभार...
@Paulvata
@Paulvata Год назад
उद्योग वार्ता.. आपण नेहमीच आमचे मार्गदर्शक राहिला आहात.. पुढेही असेच प्रेम कायम राहील हा विश्वास आहे. जय हरी माऊली 🥰🙏🥰
@vidyadharjoshi577
@vidyadharjoshi577 Год назад
माऊली आम्ही आपल्या मताशी सहमत आहोत जय ज्ञानेश्वर.
@Paulvata
@Paulvata Год назад
खुप खुप आभारी आहे माऊली 🙏🙏 शक्य झाल्यास हा व्हिडीओ आपल्या मित्रांना आणि नातलगांना शेअर करा. किंव्हा WhatsApp ग्रुप मध्ये शेअर करा. तुमचा एक शेअर खुप महत्वाचा आहे.
@madhavideolekar5665
@madhavideolekar5665 Год назад
Khup sunder mahiti sangitli end pahun waiet watle shharmechi gost aahe
@Paulvata
@Paulvata Год назад
खरचं ही शरमेची बाब आहे. आणि या मधे बदल अपेक्षित आहे. शक्य झाल्यास हा व्हिडीओ आपल्या मित्रांना आणि नातलगांना पाठवा. तुमचा एक शेअर खुप महत्वाचा आहे.. जय हरी माऊली 🚩🙏🚩
@stranger2486
@stranger2486 Год назад
श्री गुरुदेव माऊली कोटी कोटी प्रमाण 👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏👏👏👏👏👏
@Paulvata
@Paulvata Год назад
जय गुरुदेव.. #alandi
@vandanakulkarni4298
@vandanakulkarni4298 Год назад
माऊली माझी आई मुक्ताई ज्ञानोबा यांचे इतके यथोचित वर्णन केले खुप छान आभार
@Paulvata
@Paulvata Год назад
आपल्या कौतूकांच्या शब्दाने प्रेरणा मिळते.. खुप खुप आभारी आहे वंदना ताई 🙏😊🙏
@balirampotdar9672
@balirampotdar9672 Год назад
सुंदर विडिओ केला आहे. छानच. धन्यवाद !!
@Paulvata
@Paulvata Год назад
खुप खुप आभारी आहे बळीराम सर 🙏 शक्य झाल्यास हा व्हिडीओ आपल्या मित्रांना आणि नातलगांना पाठवा. तुमचा एक शेअर खुप महत्वाचा आहे 🙏
@govindborkar9191
@govindborkar9191 Год назад
जगाला ज्ञान देणारे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पावन भूमी बद्दल चांगली माहिती दिली आहे त्याबद्दल आपले धन्यवाद.
@Paulvata
@Paulvata Год назад
खुप खुप आभारी आहे माऊली.. 🚩🙏🚩
@vasantichikane3006
@vasantichikane3006 Год назад
श्री माऊली भाऊ आपण या जागेची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद, माझ्या सासरे दरवर्षी आळंदी यात्रा करत असत कारण त्यांना दरवर्षी पंढरपूर यात्रेला जायला जमत नसे ,पण आळंदी यात्रा ते दरवर्षी करत ते माळकरी होते आणी आमच्या समाजातील बहुतेक मंडळी पुरुष ,महिला माळकरी आहेत पण त्यांची पोहोच ह्या स्थळापर्यंत झाली नसेल.माझे सासरे पाच वर्षापुर्वी आषाढीएकादशीला वारले.तुम्ही जे शेवटी सांगितलं ती गोष्ट खरच प्रशासनाने व तेथील संस्थान यांनी खरच जाग्रुत व्हायला हव,काही लोक कुठे महिलांना प्रवेश नाही म्हणून शिर्डी संस्थानाने महिलांना अंगभर कपडे घालून येण्यास सांगितलं म्हणून भांडण करतात पण देवस्थान कस सुरक्षित राहील तेथे अश्र्लील चाळे,मद्यपी येऊ नये ह्या प्रकरणात लश्र घालत नाही हे आपल्या महाराष्ट्राचे फार मोठे दुर्दैव आहे, सगळ्या सस्थांनानी पण ह्यांना विरोध केला पाहिजे आणी ही सर्व देवस्थान सुरक्षीत ठेवून आपला महाराष्ट्रातील ईतिहास सुरक्षीत ठेवला पाहीजे तरच पुढच्या पिढीला हा ईतिहास माहित पडेल .🙏🙏
@Paulvata
@Paulvata Год назад
वासंती ताई.. तुमच्या सासऱ्या बद्दल वाचले.. मृत्यु हे अंतिम सत्य आहे आणि त्याला कोणी टाळु शकत नाही.. तुम्हीं तुमचा अनुभव आम्हाला शेअर केला या बद्दल तुमचे आभार.. कधी आळंदीला आलात तर सिध्दबेटला नक्की भेट द्या. कदाचीत हीच तुमच्या सासरेबुवाची ईच्छा असेल.🙏
@vasantichikane3006
@vasantichikane3006 Год назад
@@Paulvata होय भाऊ नक्की येऊ आम्ही माळकरी नसलो तरी आम्ही नवरा बायको व मुलगा परमार्थ ,उपासना करतो,बैठकीला जातो.🙏जय सद्गुरू🙏
@Paulvata
@Paulvata Год назад
सद्गुरू..आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतील..🙏
@dannysnotes9069
@dannysnotes9069 Год назад
आळंदी च्या राष्ट्रीय सवयंसेवक संघाने पुढे येवुन श्रमदानाने सफाई चे व्रत हाती घेतले पाहिजे. त्यांच्याशिवाय दुसऱ्या कोणाच्यात सामर्थ्य नाही. माऊलींची कृपा होवो आणि मलाच निमित्त बनवून तिथे येवुन तिथल्या शाखेला भेट देवून ही सेवा करण्याची कृपा होवो. 🙏🏻😭 कृपा करी पंढरीनाथा||🙏🏻
@Paulvata
@Paulvata Год назад
जर स्वयंसेवक संघ हे काम करत असेल तर आनंदच आहे. नक्कीच माऊली तुमच्याकडून हे काम करून घेतील. जय हरी माऊली 🙏🙏
@sambhajithite-4320
@sambhajithite-4320 Год назад
अतिशय पवित्र असलेली ही भूमी स्वच्छ राहो अशीच भावना राहिली पाहिजे . ही माऊलींच्या चरणी प्रार्थना🙏🌹💐🙏
@saishraddhaband1907
@saishraddhaband1907 Год назад
खुप छान सर....आपला आवाज, बोलण्याची अचूक पद्धत मनाला भारावून टाकते आणि घरातले सर्व जण एकाच वेळी आपले व्हिडिओ बघतात खुप छान वाटत
@Paulvata
@Paulvata Год назад
खुप खुप आभारी आहे माऊली 😊😊 आपल्या अश्या प्रेरणादायी कमेंट मुळे आमचे आत्मबळ वाढते. असेच प्रेम कायम असु द्या 🙏🙏
@mangaladatir9570
@mangaladatir9570 Год назад
अप्रतिम‌ माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@Paulvata
@Paulvata Год назад
खुप खुप आभारी आहे ताईसाहेब.. शक्य झाल्यास हा व्हिडीओ आपल्या नातलगांना शेअर करा..🙏🌷🙏
@nanduhandge1467
@nanduhandge1467 Год назад
खुपच सुंदर, आपल्यामुळे माऊलींच्या सिध्दबेटाविषयी माहिती मिळाली, राम कृष्ण हरी.
@Paulvata
@Paulvata Год назад
सर.. अजुन सिद्ध बेट दुर्लक्षित राहिले आहे. हा छोटासा प्रयत्न आहे की यामुळे तरी सिध्द बेटा कडे लक्ष वेधले जाईल.. माऊली शक्य झाल्यास हा व्हिडीओ आपल्या मित्रांना पाठवा. तुमचा एक शेअर खुप महत्वाचा आहे. 🙏🌷🙏
@user-cb1ft3ek4v
@user-cb1ft3ek4v Год назад
श्री संत विश्वमाऊली ज्ञानोबाराया महाराज किजय पाऊलवाटा चँनलचे मनःपुर्वक धन्यवाद छान माहीती दिली
@Paulvata
@Paulvata Год назад
खुप खुप आभारी आहे माऊली 🙏🙏 #alandi
@eknathgunjal3282
@eknathgunjal3282 Год назад
महीती आणि मागील वुरूतांत सर्व गोष्टी आपल्या लासमजलया आहे अशीच माहिती पुरवावी आभारी आहोत जयहरी
@Paulvata
@Paulvata Год назад
खुप खुप आभारी आहे माऊली.. असेच प्रेम आणि सहकार्य कायम असु द्या.🌹🙏🙏
@user-rn9jb2pb5e
@user-rn9jb2pb5e Год назад
खूपच छान माहिती दिली माऊली तुम्ही
@Paulvata
@Paulvata Год назад
खुप खुप आभारी आहे माऊली 🙏🌹🙏
@chandraharyadav4629
@chandraharyadav4629 Год назад
खुप खुप छान आणि सुंदर माहिती दिली आहे 🙏🏻 जयहरी 🙏🏻 माऊली 🙏🏻
@Paulvata
@Paulvata Год назад
खुप खुप आभारी आहे माऊली 🙏🌹🙏🌹
@indiankitchen1478
@indiankitchen1478 Год назад
फार सुंदर व्हिडिओ. आणि माहिती पण फार छान सांगितली
@Paulvata
@Paulvata Год назад
खुप खुप आभारी आहे माऊली 😊🙏😊 #पाऊलवाटा
@swatizambrezambre1835
@swatizambrezambre1835 Год назад
राम कृष्ण हरी
@vaishalikhambete8889
@vaishalikhambete8889 Год назад
खरच खुप छान माहिती आहे या वास्तुचे पावित्र टिकवा
@kj2010
@kj2010 Год назад
खरच हा विडियो बघुन आज पर्यंत च्या सर्व सरकारांची लाज वाटते, ऐवढे मोठे भाग्य महाराष्ट्राला लाभलेले असून याची हि अवस्था लाज वाटते
@Paulvata
@Paulvata 9 месяцев назад
शक्य असल्यास हा व्हिडिओ शेअर करा. कारण तुमचा एक शेअर खुप महत्वाचा आहे माऊली 🙏
@TECHNO63257
@TECHNO63257 Год назад
खरंच आम्हाला इतकं सहज घरात बसून दर्शन झाले खूप खूप लाख करोड धंन्यवाद समर्पित 🙏🌹ज्ञानेश्वर माऊली 🌹🙏
@Paulvata
@Paulvata Год назад
खुप खुप आभारी आहे माऊली 🙏 असेच सहकार्य आणि प्रेम कायम असु द्या.. #पाऊलवाटा
@rajeshpharande5585
@rajeshpharande5585 Год назад
!! जय जय राम कृष्ण हरी !! 👏👏👏👏👏🌹🌹🌹🌹🌹
@Paulvata
@Paulvata Год назад
राम कृष्ण हरी माऊली 🙏🌹🙏
@vidyashukla7516
@vidyashukla7516 Год назад
Khup khup samadhan dilet.dhanyawad🙏🙏🙏🌷
@Paulvata
@Paulvata Год назад
खुप खुप आभारी आहे ताईसाहेब 🙏🙏
@rameshpatil1928
@rameshpatil1928 Год назад
ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 🙏🌺🌹🌺🌹
@Paulvata
@Paulvata Год назад
जय हरी माऊली 🌹🙏🌹
@annanikam7662
@annanikam7662 Год назад
व्वा माऊली खूपच छान, अतिशय मौलिक माहिती सादर केलीत आपण, धन्यवाद!💐
@Paulvata
@Paulvata Год назад
खुप खुप आभारी आहे माऊली 😊😊 शक्य झाल्यास हा व्हिडीओ आपल्या मित्रांना आणि नातलगांना पाठवा. तुमचा एक शेअर खुप महत्वाचा आहे 🙏🙏
@savita8894
@savita8894 Год назад
माऊली खरच खूप छान महिती सांगितल 🙏पण आताची त्या स्थानाची अवस्था पाहून खूप वाईट वाटले, प्रत्येक व्यक्तींची जबाबदारी आहे सामाजिक स्वच्छता राखण्याची.
@Paulvata
@Paulvata Год назад
आपल्या सारख्या सुजाण भाविकांनी या गोष्टीची दखल घेतली आणि हा व्हिडिओ खुप शेअर केला. त्यामुळे प्रशासन आणि स्वयंसेवक यांच्या माध्यमातून आता सिद्धबेट स्वच्छ होत आहे. माऊली अजुन सुद्धा हा व्हिडिओ खुप भाविकां पर्यंत पोहचणे गरजेचे आहे. म्हणून शक्य होईल तेवढा हा व्हिडीओ शेअर करा.
@komalmohite7711
@komalmohite7711 Год назад
बरो्बर आहे 🙏
@dattalambe3940
@dattalambe3940 Год назад
❤ मला वाटते पूर्वी मानस नव्हते,❤आणि त्यांना कवडीची ही ,अक्कल नव्हती,❤ चार मुलांची हाल हाल करन,आणि त्यांच्या वडिलांना , मरण्यास मजबूर करणे,❤ माणसा पासून माणूस दूर करणे,❤ खूप दुःखाची बाब आहे,,❤जर संताची अशी परिस्थिती होती तर सामान्य माणसाची काय अवस्था असेल,❤
@Paulvata
@Paulvata 9 месяцев назад
परिस्थिती माणसाला खंबीर बनवते. माऊली या गोष्टी मधूनही बाहेर आले आणि त्यांची योग्यता संपुर्ण जगाने अनुभवली.. शक्य झाल्यास हा व्हिडिओ शेअर करा. कारण तुमचा एक शेअर खुप महत्वाचा आहे 🙏
@rajkumarpatil2357
@rajkumarpatil2357 Год назад
सिद्धबेटाची माहिती देता देता जेथे माऊलींच वास्तव्य आहे अशा पवित्र ठिकाणीची दुरावस्था दाखवून दिलात.
@Paulvata
@Paulvata Год назад
पाटील सर.. आता सिद्ध बेटाची वास्तव स्थिती दाखवणं गरजेचं आहे. कारण भविष्यात हे ठिकाणं विस्मरणात जाऊ नये..
@rajabhaubobde9775
@rajabhaubobde9775 Год назад
माऊलीच्या नावावर आणि त्यांच्या कार्यामुळे आळंदीला आलेले वैभव कोणीच विसरू शकत नाही त्याप्रमाणे माऊलींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीचा विकास करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे आणि शासन दरबारा पर्यंत या गोष्टी नेल्या पाहिजे आणि इमानदारीने ही कामं झाली पाहिजे एवढीच इच्छा सत्यमेव जयते जय हरी
@Paulvata
@Paulvata Год назад
माऊली.. अगदी रास्त मुद्दा आहे. माऊलींमुळे आळंदीला आलेले महत्व कोणीच विसरु शकत नाही. आपल्या सारखे जागृत भाविक असतील तर सिद्धबेटाचा विकास नक्कीच होईल. माऊली.. शक्य झाल्यास हा व्हिडीओ तुमच्या WhatsApp ग्रुप मध्ये शेअर करा. कदाचीत तुमच्या एका शेअर मुळे हा व्हिडिओ योग्य व्यक्ती पर्यंत पोहचेल 🙏🙏
@viveksale3335
@viveksale3335 Год назад
मी भोसरी मध्ये राहतो आळंदीला सारखे जातो पण सिद्धबेट बदल माहीती नव्हती आपल्या व्हिडीयो च्या माध्यमातुन मिळाली धन्यवाद। जय हरी.🙏🏻🙏🏻
@Paulvata
@Paulvata Год назад
विवेक सर.. जाऊन आले का सिध्दबेटला?
@viveksale3335
@viveksale3335 Год назад
@@Paulvata नाही भाऊ अजून
@Paulvata
@Paulvata Год назад
😊😊
@surekhashinde6899
@surekhashinde6899 Год назад
खूप छान माऊली जय जय राम कृष्ण हरी
@Paulvata
@Paulvata Год назад
खुप खुप आभारी आहे माऊली 🌹🙏🌹
@sukhadanaik2195
@sukhadanaik2195 Год назад
Apratim video, Maulinchi khup chhan mahiti milali, khup khup dhayawad. Ramkrushna Hari .
@Paulvata
@Paulvata Год назад
खुप खुप आभारी आहे ताईसाहेब.. जय हरी माऊली 🙏🌷🙏
@malini7639
@malini7639 Год назад
धन्यवाद सिध्दबेट दाखवले . मन अगदी भारावून गेले समाजातील चांगल्या लोकांना च असुरीबुध्दीचे लोक त्रास देतात व ईतर लोक सत्यपरिस्थीती माहीत असून त्यांना साथ देतात . किती त्रास सहन केला कुटुंबातील सर्वानी अखेर प्रत्येकानेच समाधी घेतली आज आपण त्यांना देव मानतो .खरचं आताच्या काळात पण असुरी बुद्धी चे लोक चांगल्या लोकांना खुप त्रास देतात .
@Paulvata
@Paulvata Год назад
अगदी बरोबर आहे माऊली. आयुष्यात चांगल्या माणसांणा नेहमीच त्रास भोगावा लागला आहे 🌹🙏🌹
@shantilalkolekar9032
@shantilalkolekar9032 Год назад
खरचं खूपचं छान खरी माहिती सांगितली धन्यवाद 🙏🙏
@Paulvata
@Paulvata Год назад
खुप खुप आभारी आहे माऊली. शक्य असल्यास हा व्हिडिओ तुमच्या WhatsApp ग्रुप मध्ये शेअर करा. कारण तुमचा एक शेअर खुप महत्वाचा आहे.
@nirmaladeore2227
@nirmaladeore2227 Год назад
खुप छान माहिती सागितली
@Paulvata
@Paulvata Год назад
खुप खुप आभारी आहे माऊली 🚩🙏🚩
@shodhvarta
@shodhvarta 2 года назад
या अभूतपूर्व पर्वणीबद्दल पाऊलवाटा टिमचे आभार...
@Paulvata
@Paulvata 2 года назад
सर... आपले सहकार्य कायम आहे या मुळेच तर आम्हाला बळ मिळते.. खुप खुप आभारी आहे.. शोध वार्ता टीम.🚩👏🚩
Далее
ТЫ С ДРУГОМ В ДЕТСТВЕ😂#shorts
01:00
ТЫ С ДРУГОМ В ДЕТСТВЕ😂#shorts
01:00