हि माझी मिराशी ठाव तुझ्या पायांपाशीं ॥१॥ याचा धरीन अभिमान । करीन आपुलें जतन ॥ध्रु.॥ देऊनियां जीव। वडिली साधियेला हा ठाव ॥३॥ तुका म्हणे देवा । जुन्हाट हे माझी सेवा ॥४॥ #pandharpur #vithumauli #पंढरपूर #bhajan
देवा हे माझी मिराशी । ठाव तुझ्या पायांपाशीं ॥१॥ याचा धरीन अभिमान । करीन आपुलें जतन ॥ध्रु.॥ देऊनियां जीव । वडिलीं साधिला हा ठाव ॥२॥ तुका म्हणे देवा । जुन्हाट हे माझी सेवा ॥३॥ अर्थ देवा ही माझी वतनदारी आहे की, मी तुझ्या पायाच्या ठिकाणी नेहमी रहावे. देवा मी या वतनदारीचा अभिमान धरीन व याचे जतन करिन. या वतनदारी जागा माझ्या वडिलांनी जीव देऊन साध्य केली आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा ही माझी सेवा वंशपरंपरागत म्हणजे जुनी आहे.