Тёмный

01. इचलकरंजी संस्थानाचा इतिहास | History of Ichalkaranji State | Santaji Ghorpade | Ichalkaranji 

Kimantu Live
Подписаться 30 тыс.
Просмотров 6 тыс.
50% 1

इचलकरंजी संस्थानाचा इतिहास
संताजी घोरपडे यांना इनाम मिळालेल्या इचलकरंजी संस्थानाचा इतिहास हा अंतर्गत कलहाचा, त्यातही विशेष करून इचलकरंजी संस्थान व करवीर कोल्हापूर संस्थान यांच्यातील अंतर्गत कलहाचा इतिहास आहे. इचलकरंजी संस्थानाच्या इतिहासावर कोल्हापूरची गादी, सातारची दौलत व पुण्याची पेशवाई या तीन सत्ताकेंद्रांच्या राजकारणाचा, कलहाचा आणि अंतर्गत सत्तासंघर्षाचा परिणाम झालेला आपल्याला आढळून येतो.
वासुदेवशास्त्री खरे यांच्या 'इचलकरंजी संस्थानाचा इतिहास' या पुस्तकावर आधारित या व्हिडिओ मालिकेत आपल्या इचचलकरंजी संस्थानासोबतच महाराष्ट्राच्या तत्कालिन अंर्तकलहाबद्दल पुष्कळच तर्कशुद्ध व चिकित्सक माहिती ऐकायला व शिकायला मिळेल अशी खात्री आहे.
-------------
History of Ichalkaranji State
The history of Ichalkaranji Sansthan, which was awarded to Santaji Ghorpade, is a history of internal strife, especially between Ichalkaranji Sansthan and Karveer Kolhapur Sansthan. On the history of Ichalkaranji Sansthan, we find that the throne of Kolhapur, the wealth of Satara, and the Peshwa of Pune were affected by the politics, strife, and internal power struggle of the three centers of power.
In this video series based on the book 'History of Ichalkaranji Sansthan' by Vasudev Shastri Khare, it is certain that along with Ichalkaranji Sansthan, you will get to hear and learn a lot of logical and rational information about the then internal conflict of Maharashtra.
#KapashikarGhorpade #SantajiGhorpade #HistoryofIchalkaranji

Опубликовано:

 

29 дек 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 35   
@vibhuteprasad988
@vibhuteprasad988 4 дня назад
साहेब तुम्ही पुरवग्रहदूषित खोटा इतिहास सांगण्यापेक्षा शत प्रतिशत अभ्यासपूर्ण खरा इतिहास मांडता याबद्दल तुमचे खूप खूप आभार
@KimantuLive
@KimantuLive 3 дня назад
धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार 🙏
@rahulsadale4796
@rahulsadale4796 Год назад
सर तुम्ही ग्रेट आहात. आम्हाला संपूर्ण इतिहासाची माहिती करून दिलात. त्या बद्दल तुमचे खूप खूप आभार.. जय शिवराय जय शंभूराजे..
@KimantuLive
@KimantuLive Год назад
Thank you so much
@ravindramunde9623
@ravindramunde9623 2 года назад
वास्तव पूर्ण व अज्ञात ऐतिहासिक विश्लेषण !
@KimantuLive
@KimantuLive 2 года назад
आपले मन:पूर्वक आभार साहेब!
@abhinavdeshmukh1320
@abhinavdeshmukh1320 8 месяцев назад
Thank you for video! I am from Ichalkaranji...
@KimantuLive
@KimantuLive 7 месяцев назад
धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार.🙏
@abhinavdeshmukh1320
@abhinavdeshmukh1320 5 месяцев назад
@@KimantuLive या इचलकरंजी ला एकद. मटण करूया...
@KimantuLive
@KimantuLive 5 месяцев назад
ठाणे येथून इचलकरंजीला मटण खायला यायला परवडेल का साहेब? चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला असा प्रकार व्हायचा. नाही का? ☺
@iammmmmmmmmmm
@iammmmmmmmmmm 2 года назад
❤️🙏🚩
@KimantuLive
@KimantuLive 2 года назад
आपले मन:पूर्वक आभार!
@arunkagbatte7865
@arunkagbatte7865 2 года назад
सुरेख विवेचन केलं आहे, ऐकताना उत्सुकता वाढत जाते
@KimantuLive
@KimantuLive 2 года назад
आपले मन:पुर्वक आभार साहेब!
@rajendardesai5707
@rajendardesai5707 2 года назад
I request for give full information on Belgaum history how it is related to kolhapur and miraj particularly Bombay presidency
@KimantuLive
@KimantuLive 2 года назад
ठीक आहे साहेब!
@shivrajghorpade9595
@shivrajghorpade9595 2 года назад
तुम्ही सर्व सरदार सेनापती यांच्यावर व खास करुन सातारा गादी 1947 पर्यत सर्व माहिती द्यावी मला इतिहास ची खुप आवड आहे व तुमची माहिती अचुक असते म्हणुन छान वाटते खुप माहिती मिळते तुमच्या विडीओ मधुन धन्यवाद
@KimantuLive
@KimantuLive 5 месяцев назад
आपले मन:पूर्वक आभार साहेब
@vishal1962
@vishal1962 2 года назад
खुप छान माहीती देता आपण... एक शंका आहे... कृपया जहागीरदार,सरंजामदार, इनामदार वतनदार असे इतर व त्यांचे अर्थ व त्यांची Level कशी असते हे सांगीतलात तर खुप बरे होईल
@KimantuLive
@KimantuLive 2 года назад
हो. पुढचा व्हिडिओ आता बहुतेक तोच बनवावा लागेल. खूप मित्रांना याबद्दल शंका आहे. आपले मन:पूर्वक आभार.
@VitoGodfather1945
@VitoGodfather1945 2 года назад
Kimantu ji , please Kolhapur / Karveer sansthan badal video 🙏
@KimantuLive
@KimantuLive 2 года назад
ठीक आहे साहेब. पण ही मालिका देखिल पाहत राहावी ही विनंती. कारण या मालिकेमध्ये पण कोल्हापूर संस्थानाचा काही इतिहास अपरिहार्यपणे येणारच आहे.
@rupeshjadhav4869
@rupeshjadhav4869 2 года назад
sir santaji ghorpade video banava
@KimantuLive
@KimantuLive 2 года назад
हो साहेब. बनवायचा आहे. पण मला या विषयाच्या संदर्भाने अजून थोडी माहिती हवी आहे. माहिती मिळाली की मग बनवुयात.
@vishal1962
@vishal1962 2 года назад
हे घोरपडे ब्राह्मण कसे काय आहेत? व अशा घराण्यामधे तीच तीच नावे कशीकाय दिली जातात?
@KimantuLive
@KimantuLive 2 года назад
पहिला मुद्दा. नारो महादेव जोशी म्हणून चित्पावन कुलोत्पन ब्राह्मण मुलास संतांजी घोरपडे यांनी आपले मानसपुत्र मानले होते. नारो महादेव यांनी देखिल संताजी घोरपडे यांना पितृत्तुल्य मानून स्वामीकार्यात कोणती कसर सोडली नाही. आणि आपल्या स्वामींच्या ऋणाचे सदैव स्मरण रहावे म्हणून स्वत:चे आडनाव बदलून स्वामींचे आडनाव घोरपडे लावण्यास सुरुवात केली. दुसरा मुद्दा. कोणती तीच तीच नावे परत येत आहेत?
@vishal1962
@vishal1962 2 года назад
@@KimantuLive नारायणराव चा मुलगा व्य॓कटराव परत व्य॓कटराव च्या मुलाचे नाव नारायणराव पुन्हा तसेच
@KimantuLive
@KimantuLive 2 года назад
हे सर्व नारो महादेव यांचे वंशज आहेत
@Abhishek-cy8qp
@Abhishek-cy8qp 6 месяцев назад
सर इचलकरंजी हे नाव कस मिळालं ह्याची थोडी हिस्टरी सांगा
@darshanchavan1854
@darshanchavan1854 2 года назад
साहेब ,पुढील भाग येणार ?
@KimantuLive
@KimantuLive 2 года назад
प्रयत्न करतो आहे लवकरच बनवायचा साहेब. थोडं बिझनेसकडे पण लक्ष द्यावं लागतं. आपल्या चॅनेलला कोणी स्पॉन्सर नाही आणि मेंबरशीप पण जास्त नाही. त्यामुळे इच्छा असून पण पूर्णवेळ इकडे देता येणे शक्य होत नाही आहे. तरीही विलंबाबद्दल क्षमस्व.
@sharadghatge1603
@sharadghatge1603 Год назад
Am dr sharad ghatge associate professor JJ hospital Can you me history of ghatge family if possible
@KimantuLive
@KimantuLive Год назад
I know brief history. Need to study if have to make video
@baburaonikam7624
@baburaonikam7624 2 года назад
Ichalkaranji was never a state. It was a jagir of the State of Kolhapur
@KimantuLive
@KimantuLive 2 года назад
पहिली गोष्ट. वासुदेवशास्त्री खरे हे एवढ्या तोलामोलाचे इतिहासकार होते की त्यांनी संस्थान हा शब्द वापरला असेल, तर इचलकरंजी हे संस्थान मानायला तेवढेही पुरेसे आहे. दुसरी गोष्ट 'इचलकरंजी संस्थानाचा इतिहास' या नावाचे पुस्तकच वासुदेवशास्त्री खरे यांनी लिहले आहे. जर का इचलकरंजी संस्थान नसेल, तर वासुदेवशास्त्री खरे यांचासारखा जगदमान्य इतिहासकार असे नाव देण्याची चूक करणार नाही. तिसरी गोष्ट. याबाबतीत गोंधळ होऊ नये म्हणून संस्थान आणि जहागीर यातला फरक पुस्तकाच्या प्रस्तावनेतच वासुदेवशास्त्री खरे यांनी स्पष्ट करून सांगितला आहे. चौथी गोष्ट. नंतर दत्तकप्रकरणावरून इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनी ते नंतर इंग्रज सरकार यांच्याबरोबर इचलकरंजी संस्थानाची जी कायदेशीर लढाई झाली. त्यात शेवटी इचलकरंजीला संस्थान म्हणूनच मान्यता मिळालेली दिसून येते. पाचवी गोष्ट. जर का इचलकरंजी ही कोल्हापूर संस्थानाची जहागीर असती, तर कोल्हापूरच्या छत्रपतींना कलमाच्या एका फटकाऱ्यासरशी ती काढून घेता आली असती. सारख्या सारख्या चार पिढ्या इचलकरंजी संस्थानावर आक्रमण करून पराभूत होऊन माघार घ्यावी लागली नसती. सहावी गोष्ट. कोल्हापूर संस्थानाच्या अख्यात्यारीत असता तर मग हा विषय पण ब्रिटिश सरकारच्या अख्यात्यारीत सोडवण्यासाठी गेला नसता. सातवी गोष्ट. कापशीकर घराण्याला देशमुखीचे हक्क कोल्हापूरची गादी किंवा शिवरायांचे स्वराज्य देखिल अस्तित्वात येण्याच्या आधी विजापूरच्या बादशहाकडून कधी काळी मिळाले असल्याचे पुरावे आहेत. या गावांच्या देशमुखीच्या वतनावरूनच नंतरच्या काळात कोल्हापूरचे करवीरकर व इचलकरंजी घोरपडे यांच्यामध्ये ठणली होती आणि चार पिढ्या या लढाया चालूच होत्या. या संघर्षाचा अंत शेवटी दोन बोक्यांच्या लढाईत कोल्हापूरचे राज्य ब्रिटिशांनी आपल्या स्वत:च्या घशात घालण्यात झाले. आठवी गोष्ट. या सगळ्या गोष्टी सप्रमाण या मालिकेत येतीलच. कृपया मालिका पाहत राहावी ही विनंती.
Далее
Копия iPhone с WildBerries
01:00
Просмотров 486 тыс.