आम्ही मुले साधारणतः 10 ते 12 वर्षाची होतो 1995 ते 2000 साली त्याकाळची आदरणीय अशोक पत्की साहेबांची गाण्यांची मुळे इतकी खोलवर मनात गेली आहेत की आजही जगण्याची उमेद देतात ..असे वाटते हल्ली आपण साधेपणात न राहता खोट्या मृगजळ च्या मागे का धावत आगोत..खरोखरच अप्रतीम
अगदी मनाला भिडणारे गाणं आहे हे. माझ्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारं हे अतिशय सुंदर गाणं आहे. गायक, गीतकार, संगीतकार यांचं मनापासून खूप खूप आभार 🙏🙏🙏
संगीत सुचनं म्हणजे एक प्रकारे परमेश्वरी देणगीच म्हणावी लागेल... महान संगीतकार माननीय श्री अशोकजी पत्की सर म्हणजे आपल्या मराठी मातीचं अनमोल वैभव आणि अनमोल रत्नच... Navnath Mazire
गोटया मालिका सुरु होण्या आधी मी हे गाणे ऐकण्यासाठी मी टीव्ही समोर बसत असे साधारण 33 वर्षांपूर्वीची आठवण ताजी झाली उत्कृष्ट संगीता साठी संगीतकार पं . अशोक पत्कीना शतशः धन्यवाद .
माझ्या मोबाईलची रिंगटोन सेट केलेली आहे मी या गाण्याची। कुणाचा फोन आल्यावर छान गाणं वाजत।पहिल्यानंदा मी गाणं ऐकून फोन बंद होऊ देतो व नंतर त्या, व्यक्तीला कॉल बॅक करतो।☺