Dr. Mandar Datar is a well-known, vivid scientific writer. But listening to him unwind very complex topics for the common people in such a simplistic way was a treat. It was fascinating to know the human history and events of evolution in such a simple language. Thank you, Dr. Mandar, for highlighting the importance of microorganisms, as it is not a well-known topic among the public. Congratulations, and thank you, team Amuk-Tamuk, for bringing science to this platform. I'm waiting for more such episodes.
वैद्यक मंदार दातार भौ तुमी जसं सांगुन रायले त्याच हिसोबानं प्राथमिक शाळांत जैवविविधता साखळी अभ्यास असा प्रात्यक्षिक विषय असाले पायजत खासकरून भारतात हो ब्वाॅ ओंकार,शार्दुल तुमी दोघायनं बेज्याच गरजीचा विषय घेतला मत्ल् दोस्त हो
मंदार दातार सरांना बोलवले याबद्दल मनापासून धन्यवाद. अतिशय अवघड गोष्टी सोप्या करून सांगतात आणि खूपच इंटरेस्टिंग पद्धतीने. असे सायन्स विषयक podcast नक्की करा. दातार सरांना पण पुन्हा वेगळा विषय घेऊन बोलवा. गड किल्ल्यावरील वनस्पती. ट्रेकर्स साठी पण आवडीचा विषय आहे
खूप खूप छान 👌👌👌खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन सर्व अमुक तमुक टिमचे तुमचे सर्वच विषय छान आणि माहिती पूर्ण असतात 🙏🙏💐💐हो असे विज्ञानाचे माहिती पूर्ण व्हीडीओ नक्कीच आवश्य आवडतील 👍👍👌🙏😍😍
हा विषय खूप वेगळा आणि इंटरेस्टिंग आहे. आणखी काही भाग नक्की करा. मंदार दातार यांनी अतिशय कठीण विषय शांतपणे सोपा करून मांडला. कुठलाही बढाईखोरपणा नाही, कुठली क्लिष्ट किचकट उदाहरणे नाहीत. अमुक तमुक टीम आणि दातार यांचे मन:पूर्वक आभार 🙏 आहे
दादा लोक ...तुम्ही दोघेही भारी आहात. आज तर या डॉक्टरांना भेटल्यानंतर ज्ञानाची भूक वाढली. अरे तुम्हाला कुठून असे विषय मिळतात? त्यावर चर्चा करणारे वक्तेही ?मस्त Keep it up
अत्यंत रंजीत episode. जैवविविधता हा विषय अत्यंत मजेशीर आणि तेवढाच खोलवर जाणारा आहे. मी स्वतः biology विषयाशी निगडीत काम करतो. आणि तुम्हाला अजून असे episodes बनवायची इच्छा असेल तर मी असं सुध्दा सुचवू इच्छितो की तुम्ही immunology, म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती विषयी चालणारा शास्त्र ह्यावर एक episode बनवू शकता. Covid नंतर immunology नव्याने प्रकाश झोतात आलेला आहे. आणि त्यासाठी तुम्ही पुणे विद्यापीठात National Center for Cell Science ह्या संस्थेतून सुध्दा काही शास्त्रज्ञांना तुमच्या podcast वर आमंत्रण देऊ शकता. मला असं वाटतं की असा एखादा episode नक्कीच entertaining आणि 'wow' moments बनवणारा ठरेल.
Your best episode ever. At the same time you have tampered a very different territory, infinite possibilities to explore. Keep it up Mandar bhau … people who are science scholars like you may not be able to narrate so effectively and make it so interesting to listen. And Marathi varil prabhutv, Kamal agdi kamal
Kudos to Mandar Datar and 'Amuk Tamuk' for an enlightening podcast on Biodiversity and Humans! Your insights were interesting and incredibly informative. Thank you for shedding light on this crucial topic and raising awareness about the delicate balance between us and the natural world. Keep up the great work!
Apratim episode.. khup avadla.. Many thanks to Dr. Mandar Datar for sharing such wonderful information.. Amuk Tamuk team, child psychology var aikaylahi khup avdel
निसर्गात मानवी प्रगतीने कसकसे बदल -गवतांपासुन च अगदी या बाबतीतले उत्सुकता वाढवत नेते हि मुलाखत & शास्त्रीय परिभाषा एरवी क्लीष्ट वाटते ती मंगार सर सहज समजावुन देतात-कड्यावरील वनस्पतींचे महत्व किंवा पोटातील बॅक्टेरिया कसा तुमचा स्वभाव बदलु शकतात इतपर्यंत सर्वच ऐकावे ते फक्त नवलच नाही तर आपल्यालाही विचार प्रवृत्त करणारा संवाद-धन्यवाद
मस्त.... खूप छान मंदार सर... मज्जा आली ऐकताना... प्रत्येकालाच तुमच्यासारखे सोप्या शब्दात विज्ञान समजावता येत नाही... प्रश्न देखील खूप सुंदर... अमुकतमुक चे अभिनंदन आणि अनेक धन्यवाद...🙏
Mandar Sir we need more scientists like you. Extremely privileged to have got an opportunity to be mentored by you even if it was for a very brief time. Please find more of his videos and interviews on RU-vid channel of Agharkar research institute.
खूपच इन्स्पायरिंग व्हिडिओ . मी नक्कीच माझ्या मुलाला हा व्हिडिओ दाखवणार आणि त्याच्या शाळेतही हा व्हिडिओ सामूहिक रित्या बघितला जाईल असा एक प्रोग्रॅम अरेंज करणार. ज्यांनी मुलांना असे विषय शिकून नवनवीन प्रजातींचा अभ्यास करण्यास प्रेरणा मिळेल.
भारी!! शास्त्राशी काहीही संबंध नसलेल्या माझ्यासारखीला अगदी मनापासून ऐकावंसं वाटेल आणि रुची निर्माण होईल इतक्या रंजकपणे आणि ताकदीने तुम्ही माहिती दिली आहे!! मनापासून धन्यवाद सर!!
खुप सुंदर पॉडकास्ट करताय तुम्ही...वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होतात... जंगल आणि वाघ यावर एक चर्चा घेता येईल का? आमच्या (चंद्रपुर/गडचिरोली) भागात खुपच जिव्हाळ्याचा विषय आहे... बोलणारेही आहेत...
फारच छान....आपल्याला कळेल अश्या भाषेत थोडासा क्लिष्ट वाटणारा विषय समजावून सांगितला आणि तसेच समर्पक प्रश्न विचारले गेले. खूप अभिनंदन आणि असेच विज्ञान विषयक पॉडकास्ट करत रहा. खूप शुभेच्छा.
खुप महत्त्वाचा विषय सुरेख पद्धतीने सांगितला. मला माझ्या बालपणी शाळेत ग्रंथालय विभागाकडून 'आघारकर " यांचे चरित्र पुस्तक बक्षीस म्हणून दिले होते माझ्या आवडत्या शिक्षकांकडून. ते पुस्तक मी अख्खं सलग वाचलं होतं. पुस्तक खुप छान होतंच. पण तेव्हा हे सगळं डोक्यावरून गेलं होतं पण सरांकडून व्यवस्थित समजलं आघारकर संस्थेचं काम. आज podcast च्या निमित्ताने ही आठवण ताजी झाली. धन्यवाद TATS ❤❤ असे वैज्ञानिक podcast बघायला नक्की आवडेल. अर्थात तुमचे सगळेच भाग खास, विशेष आणि भन्नाट असतात🎉🎉
What a FANTASTIC & insightful talk. Truly appreciate the effort of the Amuk Tamuk team for featuring this topic. Mandar has laid out the concepts with such finesse and ease. Would request you'll to have sub-titles for this, so that the content can reach a larger audience. An entire episode on the role of fungi and mycelium in our life would also make a very engaging talk. Keep up the great work!!
Namaskar from Germany! Could you please list the Books Mandar Sir mentioned? Very fascinating podcast. Thank you very much and keep up the amazing work.
प्रथम तुमचे मनापासून धन्यवाद व अभिनंदन, मला विज्ञानाबध्दल फारशी आवड नाही. मी उत्सुकतेपोटी तुमचा podcast पाहिला.. बायोडायव्हर्सिटी व मानव असल्या क्लिष्ट विषयाबाबत इतक्या सोप्या भाषेत इतकी सखोलपणे माहिती मिळाली.त्याबध्दल तुमचे मनापासून आभार ..सहज सोपी भाषा वापरल्यामुळे शेवट पर्यंत उत्सुकता राहिली. असे तज्ञ वारंवार आपण बोलवावेत. बायोडायव्हर्सिटी बध्दल किंवा संबंधित वियाबध्दल ऐकायला आवडेल.. पुन:श्च धन्यवाद व शुभेच्छा💐💐