जयभीम सर... अति सुंदर मार्गदर्शन, आपण जे संपूर्ण एक वर्ष खंड न पडता अगदी सुरुवातीपासून आपण जे अभ्यासपूर्ण, सर्व माहिती आम्हाला देत आहात, बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाला सुरवात करण्याआधी आपण जो ऐतिहासिक मागोवा दिला, जो जगात तथागत गौतम बुद्धां पासून ते आज पर्यंत बौद्ध धम्माचा सर्व इतिहास आपण मांडलात, सोबत डॉ बाबासाहेब आंबेडकर अभिप्रेत धम्म आपण समजवलात, त्याच बरोबर जगात जो संप्रदायात विभागलेला बुद्धिजम आहे आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर अभिप्रेत मुळ बुद्धिजम आपण सांगीतला व त्यातून एक नवी दिशा मिळवून दिली त्याच बरोबर धम्मसंहिता युट्यूब चॅनल सुरू करून आपण जे धम्मसंहिता बुद्ध विहार व्यवस्थापन कायदा जे मिशन सुरू केले आहे त्याचे प्रात्यक्षिक करून समाजामध्ये जनजागृती करत आहात, आणि आचारसंहिता म्हणजेच धम्मसंहिता हाच आपल्या समाजासाठी एकमेव उपाय व पर्याय आहे हे सुद्धा आपण स्पष्ट केले आहे, या सर्व भूमिकांना आमचे पुर्णपणे सहकार्य आहे व धम्मसंहिता या विषयासाठी आपण जे सांगाल ते आम्ही करण्यास तत्पर आहोत. आणि आता पुढे आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ समजावून सांगणार आहात त्या बद्दल आपल्याला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद
नमो बुद्धाय जयभीम . . . संपूर्ण सारांश हा भाग पाहिला. आता पर्यंत झालेल्या सर्व भागांचे आपण थोडक्यात माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. आणि आता पुढे येणाऱ्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या विश्लेषण संदर्भात आपण जे ऐतिहासिक कार्य करणार आहात त्या बद्दल आपल्याला मंगलमय सदिच्छा