डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभिप्रेत बुद्ध धम्माच्या प्रस्थापनेसाठी ॲड. दिलीप काकडे द्वारा “धम्म संहिता" चॅनल सुरु करीत आहेत. धर्माने व कायद्याने बौद्ध होण्यासाठी दि बुद्धिस्ट पर्सनल लॉ व बुद्ध विहार व्यवस्थापन कायदा, या प्रमुख विषयाची माहिती या चॅनलद्वारे देण्यात येणार आहे. धर्मांतरित बौद्धांचा संविधानिक दर्जा अनुसूचित जात की धार्मिक अल्पसंख्यांक बौद्ध तसेच जणगणनेत फक्त बौद्ध म्हणून नोंद करावी की पूर्वाश्रमीच्या जातीचीही नोंद करावी हा जो संभ्रम आहे त्यावर योग्य ते मार्गदर्शन करण्यात येणार आहे. बोद्धांच्या सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक जीवनाबाबतीत सविस्तर मार्गदर्शन या चॅनलद्वारे करण्यात येणार आहे. बुद्ध विहार हे बौद्धांचे विकासाचे, संरक्षणाचे, कल्याणाचे केंद्र असून तिथूनच बौद्धांचा विकास होणार आहे याचे मार्गदर्शन या चॅनलद्वारे केले जाणार आहे.