नमस्कार शेलारदादा, तुमचे बहुतेक सर्वच व्हिडिओ मी पहाते आणि तुमची ग्रामीण बाज असलेली निवेदनशैली, समाजाविषयी कळकळ मला फार आवडते. तुम्ही ज्याठिकाणी व्हिडिओ चित्रण करता त्या जागा निसर्गसौंदर्याने नटलेल्या असतात. कधी पक्ष्यांचे मधुर आवाज कानावर पडतात, तर कधी झुळझुळ वाहणारी नदी असते. ढोलणारी पिकेही दिसतात. फार छान जागा निवडलेल्या असतात.