मी शाळकरी मुलगी असताना सुधीर गाडगीळ यांना ऐकले होते , त्या वेळी पुण्यात गणेश उत्सवात केसरी वाड्यात खूप उत्तम कार्यक्रम होत असत. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला
सौमित्रजी, तूम्ही आज एवरेस्ट पर्वत कोणत्याही प्रकारच्या कृत्रिम प्राणवायूची मदत न घेता पदाक्रांत करण्यात यशस्वी झाला आहात!!! आजच्या भागातून तुम्ही काय मिळवलं याचं अनुभव कथन केलंत तर ऐकायला नक्की आवडेल!!! मनापासुन धन्यवाद!!!
गाडगीळ ग्रेटच. त्यांच्या २५०० व्या मुलाखतीला मी दीनानाथ नाट्यगृहात त्यांच्याशी बोलले होते. पोटेजी, तुमच्यात इतके "पोटेन्शियल " आहे की पुढच्या १० वर्षात १०००० मुलाखती नक्की होतीलच याची खात्री वाटते.
किती भारी माणूस आहेत हे! माझ्या तरुण वयात पुण्यात दिसायचे. रात्री अन्याच्या पानपट्टीवर? नीटसे आठवत नाही. ८ एक वर्षांपूर्वी सर दिनानाथ मंगेशकर हॅास्पिटल मधे दिसले होते माझे वडील तिथे उपचार घेत असताना. सरांशी बोलण्याची कधी हिम्मत झाली नाही. फार मोठा माणूस ! बहार आली हा पोडकास्ट पाहून.
मी कोल्हापूरला मंतरलेल्या चैत्रबनात हा गदिमांच्या गाण्यांवर अधारित कार्यक्रम पाहिला होता.साल साधारण 1977-78 असावे. त्यातील गदिमांच्या एका गाण्यापुर्वी तुम्ही शिवाजीराव भोसले यांची केलेली नक्कल मला आजही आठवते. गाणे होते 'त्या तिथे पलिकडे तिकडे माझीया प्रियेचे झोपडे'