श्री गुरुदेव दत्त... गुरूचरित्र परायना बद्दल मराठीतून खुप छान माहिती मिळाली.. मी नक्कीच पूर्ण माहिती ऐकून त्याचे पालन करेल.. आणि खूप खूप अभिनंदन व धन्यवाद..
धन्यवाद ताई ... श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण मांडणी कशी करावी याचा ही व्हिडीओ चॅनलवर उपलब्ध आहे अवश्य लाभ घ्यावा ... ‼️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त‼️
नैवेद सर्मपण केलेला काय करावे ,व पारायण करते वेळी किती अध्याय झाल्यावर उठता येई ल , एका दिवशी दोन वेळेला थोड थोड अध्याय वाचन केला तर चालतो का ,कृपया मार्गदर्शन करावे
तुम्ही गुरुचरित्राचे पारायण करीत आहात तर तुमच्या सर्व इच्छा लवकरच गुरुदेव दत्त पुर्ण करतील परंतु त्याचबरोबर आपण दोघांनी जोड्याने दर महिन्याच्या एकादशीला बाळ कृष्णाच्या मूर्तीवर सोळा वेळा पुरुष सुक्त च अभिषेक करणे... आणि ते तीर्थ फक्त आपण दोघांनी च पिणे...... ही सेवा मनोभावे करणे....लवकरच फलप्राप्ती होते ... दुसरा उपाय - गुरुचरित्राचे 3 वेळा पारायण करा म्हणजे 3 सप्ताह पारायणाचे झाले पाहिजेत ... आपल्याला लवकरच प्रचिती येईल ... ॥ श्री गुरुदेव दत्त ॥
श्री गुरुदेव दत्त ताई पारायण काळात कांदा लसूण शेंगदाणे डाळी हे सर्व वर्ज्य आहेत. मग उद्यापणादिवशी आपण पुरणपोळी तर डाळीची बनवतो, आमटी साठी कांदा लसूण मसाला वापरतो. मग तसे चालते का? कृपया मार्गदर्शन करावे.
Shri gurudev datta. Tai if I have to complete parayan in 3 days, on an average how much time is required to read aadhya for first ,second and third day. Thank you and regards
॥ Shree Gurudev Datta ॥ Three Day Parayan First Day - ( Gyan kanda ) Chapters 1 to 24 Second Day - ( Karma kanda) Chapters 25 to 37 Third Day - (Bhaktikanda) Chapters 38 to 53 ... Generally it takes five to six hours a day but it depends on the flow of your reading ... Yes if you have any more problems, you must ask ... Dattaguru will complete the parayan from you ... Thank you ... ॥ Shree Gurudev Datta ॥
ताई नमस्कार🙏 पारायण पूर्ण एक दिवसात पूर्ण करता येईल का? म्हणजे गुरुपौर्णिमा च्या दिवशी पहाटेपासून संध्याकाळपर्यंत म्हणता येईल का? तसे केले तर चालेल का? आणि पाळीच्या 4 त्या दिवशी पारायण केले तर चालेल का? कृपया मार्गदर्शन करा.
पारायण एक दिवसात ही पुर्ण करता येते सकाळी ब्रह्ममुहुर्तावर सुरुवात केली तर दुपार , संध्याकाळ पर्यंत पूर्ण होते पारायण ... आणि मासिक पाळीचे चार दिवस सोडुन द्यावेत पाचव्या दिवशी सकाळी केसावरून अंघोळ करून मग आपण करू शकता .. ॥ श्री गुरुदेव दत्त ॥
@@ShreeGurudevDatta धन्यवाद ताई !!! तुमच्या मार्गदर्शन मला खूप उपयोगी पडेल.. मनात बरीच शंका होत्या पण आता स्पष्ट झाले. खूप धन्यवाद... स्वामी तुमचे खूप खूप भले करो हीच प्रार्थना..
कलश किंवा सुपारी स्थापन न करता किंवा फक्त तांदुळावर अथवा नगवेलीच्या पानावर एक सुपारी स्थापन करून सप्ताह पारायण केले तर चालते का.. कृपया मार्गदर्शन करावे ❤️
पारायण कसे मांडावे हे खालील व्हिडीओ मध्ये सांगितले आहे अवश्य पहावे ... ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-AJBSimEtelk.html ॥ श्री गुरुदेव दत्त ॥
तुझ्याकडे तुमच्यासारखाच भगव्या कलरचा जाड आवरण असलेला गुरुचरित्र ग्रंथ पण तो दिंडोरी प्रणित आहे की नाही हे मला माहित नाही तो महिलांनी वाचला तर चालतो का. प्लिज मला सांगा
सुर्यास्ताच्या आधी वाचन पुर्ण करता आले तर बरे होईल ... जेवढे लवकर वाचनास बसता येईल तसे बसे ... दत्तगुरु आपल्या कडुन पारायण करून घेतील ... ॥ श्री गुरुदेव दत्त ॥
Parayanache Anekanek Niyam Sangta He Niyam koni banvile Bhakti karayla kasla Niyam Ashyane He Parayan karne Kathin houn jail Narad Bhakti Sootr madhe Niranter Breath In Breath out t Isht devteche Namsmaran karayla sangitle aahe Niranter Namsmaran la vel kal nasto Bhaktala Bhakti karayla Kontyahee Bandhan ladu naye Kote basave kase basave Kay khave Kay Khaunaye Vel Divas War Hya saglya gostila Mahtv naste Fkt Shudh Man Evdhech Pure Bhakti Sulabh Sadhy asavi Bhav tethe Dev Bhakti Mhanje Hattyog nahve Jay Jay Swmisamarth Jay Jay Swmisamarth
I wish to have the parayan but I can't adopt the rull, whatever you told, because I am a paralyzed ,can't seat on the floor, always I need a cot for sleeping, how can I manage all this, Can the parayan is possible by hearing on Mobile apps . Please guide me. Dhanyawaad. Jay Gurudev Datta. Om Nam Shivay.
@@shantaramshinde4702 Hello The important thing is that you want to pray ... You should listen to audio on apps ... Datta Maharaj will definitely accept your prayer ... Thanks ... ॥ श्री गुरुदेव दत्त ॥
श्री स्वामी समर्थ🙏 Tai navadya sakali 10 aat dhakhvaycha na ani kiti suhasini jevayala ghalaychya ani tya sakali ka ratri jevayala ghalaychya, maje udya parayanache udyapan aahe, nakki mule, jodpe, ka suhasini jevayala ghalaychi, ani kiti ghalaychya
एक दिवसीय पारायणा मध्ये आपणास संपुर्ण दिवसात ५३ अध्याय करावे लागतील त्यात आपण एक दोन वेळा मध्ये उठू शकता , पाणी वगैरे पिण्यासाठी ... तुमच्या समोर दत्त प्रतिमा , मुर्ती जे असेल ते स्थापन करा .. पुजा करा करा आणि पोथी नसेल तर मोबाईल मधून वाचले तरी चालेल ... आपली श्रद्धा महत्त्वाची आहे ... ॥ श्री गुरुदेव दत्त ॥
ताई माझी स्वामींवर खूप श्रद्धा आहे मला ईच्छा आहे गुरुचरित्र पारायण करण्याची।।पण काही प्रश्न आहेत. सर्वप्रथम मी गुरुचरित्र वाचू की स्वामी समर्थ चरित्र ते मला समजत नाहीये आणि सुरुवातीला संकल्प सोडताना तो मनातल्या मनात केलातरी चालेल का. आणि हो आता lockdown असल्यामुळे सुवासिनी भोजन शक्य नाही तर ते करणं complsry आहे का. Plz reply dya mla suruvat kraychi ahe lvkrch pudhchi date yaychya aat...Plz tai🙏,ani ajun thod detailed mdhe sanga . puja kshi mandavi kai kai asave ani rojcha naivedya kai asava...Khup help hoil srvanach.😊🙏 ।।श्री स्वामी समर्थ ।।
तुम्ही गुरुचरित्र पारायण करा आणि स्वामी चरित्र सारामृत रोजच्या नित्य पठणात ठेवावे ... संकल्प मनातल्या मनात केला तरी चालेल ... सुवासिनी भोजनाला आपल्याच घरातील नात्यातील सुवासिनी असेल तर त्यास बोलवावे किंवा ते ताट वाढुन गायीस खाऊ घालावे ... पुजा कशी मांडावी यावर व्हिडीओ बनविणार आहोत सध्या काही कारणामुळे शक्य नाही पण लवकरच अपलोड करू ... सात दिवस आपण घरात जे स्वयंपाक करतो त्याचा नैवेदय दाखवावा आणि शेवटच्या दिवशी घेवड्याची भाजी अवश्य करावी ... आपणास अजुन काही समस्या असतील तर मेल वर ही विचारू शकता ... दत्तगुरु आपल्याकडून पारायण पुर्ण करूनच घेतील आपल्या सर्व इच्छा लवकरच पुर्ण होतील ... धन्यवाद.... ॥ श्री गुरुदेव दत्त ॥🙏🙏
सकाळी ब्रह्म मुहुर्तावर पारायणास प्रारंभ करावा म्हणजे दुपार पर्यंत पारायण पुर्ण होते .. परंतु आपले वाचनाची गती आणि आपण मध्ये मध्ये किती वेळा थांबणार त्यावर अवलंबून आहे .. तरी देखील ब्रह्म मुहुर्तावर सुरु केल्यास संध्याकाळी सुर्यास्त होण्या आधी पारायण पुर्ण होते मग महाराजांची आरती करून त्यांना नैवेद्य अर्पण करून आपण स्वतः ही अन्न ग्रहण करावे ... महाराज आपल्या कडून नक्कीच पारायण पुर्ण करून घेतील 🙏🙏🙏 🌹 श्री गुरुदेव दत्त 🌹
जर मासिक पाळीमुळे पारायणाला बसता आले नाही तर जेवढे अध्याय आधी झाले आहेत त्यापासून पुढचे अध्याय घरातील इतर कोणत्याही व्यक्तीस करावयास सांगावे ... पारायणाचा सप्ताह पुर्ण करून घ्यावा .. अश्यावेळी घरामध्ये आपण स्वयपाक करणाऱ्या एकट्याच असाल तर नैवेद्यामध्ये जे पारायण करतील त्यांना फक्त खडीसाखर अर्पण करण्यास सांगावे ... मासिक धर्माचे पाच दिवस पुर्ण झाल्यानंतर आपण पुन्हा पारायण करू शकता परंतु आता जे पारायण सुरु आहे ते कोनाकडून पूर्ण करून घ्यावे ...🙏🙏 ‼️ अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त‼️
श्रावण घेवड़ा का ?माझे आता पारायण चालू आहे माझी २१ दिवस पारायण करायची इच्छा आहे ते कसे करावे याची सविस्तर माहिती सांगाल का .तसेच माझ्या कडे विष्णु नामावली नाही .ते रात्री वाचावले पाहिजे का?
घेवडा , वाल अशी अनेक नावे आहेत अनेक ठिकाणी अनेक नावांनी ओळखले जाते ... २१ दिवस पारायण म्हणजे 3 पारायणे च ना हे नेमके सांगावे की आपल्याला किती पारायणे करायची आहेत ? त्यानुसार माहिती दिली जाईल ... विष्णु सहस्त्रनामावली नसेल तर आपला Email id द्यावा त्यावर पाठविले जाईल ... ॥ श्री गुरुदेव दत्त ॥
3 divas parayan karache aslyas sadharan 5/6 tas divsache lagtil. Ashaweli madhe break ghetla tar chalel ka ?? Mhj ekaweli 5/6 tas basne shakya hot nasel tar... Parayanasathi yogya wel konti mhj sakali k sandhyakali? Krupya margadarshan karave
पारायण करताना ते सकाळी लवकर केले तर ते अतिउत्तम जर सकाळी जमत नसेल तर दुपारी १२ ते १ ची वेळ सोडुन संध्याकाळी ६ च्या आधी पुर्ण होईल असे करावे ... मध्ये आपण उठू शकता परंतु अध्याय अर्धवट सोडू नये उठताना पोथीला नमस्कार करावा ... आणि पुन्हा बसतेवेळी हातपाय धुवुन पोथीला नमस्कार करून बसावे ... ‼️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त‼️
@@pratim1096सप्ताह पारायणाला उदयापासून सुरुवात केली तरी सातवा दिवस १८ डिसेंबर ला येतो आपण करू शकता साप्ताहीक पारायण ... ‼️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त‼️
मला सुध्दा पारायण करावयाचे आहे परंतु मला मांडी घालून बसता येत नाही तशेच मला जास्त वेळ एका ठिकाणी बसता येत नाही तर मी न मांडी घालता वाचू शकतो का? किंवा मी खुर्चीवर बसून परायण करु शकतो का? तरी आपण मला योग्य मार्गदर्शन करावे अपेक्षित आहे
आपल्याला शारिरीक अडचणीमुळे खाली बसता येत नसेल तर काही हरकत नाही आपण खुर्ची वर बसुन पारायण करा ... आपल्याला पारायण करण्याची इच्छा आहे हे महत्वाचे आहे ... दत्तगुरु आपल्या सर्व इच्छा लवकरच पूर्ण करतील ... ॥ श्री गुरुदेव दत्त ॥
वाचनाचा वेग कमी केल्यास शब्द उश्चार स्पष्ट होतील .. पहिल्यांदाच पारायण करीत असल्यास एका लयीत आणि सावकाश वाचावे त्यामुळे स्पष्ट उच्चार होतील ... ‼️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ‼️