व्हिडियो मधून खुप छान आणि कधीही न ऐकलेल्या गोष्टी समजल्या त्याबद्दल तुमचे खुप खुप आभार... पण सध्याची परिस्थिती लक्षात घेता लाँग टर्म साठी गुंतवणुक तोच व्यक्ती करू शकतो ज्याची महिन्याची इनकम कमीत कमी 70 हजार ते 1 लाखा पर्यंत असेल...कारण महागाई व महिन्याला लागणारा खर्च...व्ययक्तिक खर्च सोडा पण ज्यांना शाळेत जाणारी लहान मुले आहेत त्यांची शाळेची फी आज जवळपास लाखाच्या घरात गेली...माणूस लोन तरी कशा कशाचे घेणार हप्ते भरूनच मारायचा... आणि गुंतवणुकी बद्दल बोलायचं झालं तर हे जे राकेश झुनझुनवाला...बफेट आणि यांच्या सारखे मोठ मोठे गुंतवणूकदार हे यांनी अशा काळात गुंतवणूक केली तेव्हा नुकतेच मार्केट चालू झाले होते नवीन नवीन कंपन्या सुरू झाल्या तेव्हा स्टॉक च्या किंमती ही 50 पैसे...5 रुपये अशा होत्या...त्यावेळेस 10 ते 20 हजार रुपयात लाखो शेअर मिळत होते...आणि त्यात कंपन्या dividend म्हणून दुपटीने शेअर्स द्यायचे आता अस कधीतरीच झालं असेल... व आता त्यांच्या बद्दल बातम्या येतात त्यांनी XYZ कंपनीतून 250 कोटी कमवले अरे पण त्यांची गुंतवणुकच हजारो कोटींची असती ना हा कोन विचार नाही करत.....आजही मिळतात 1-2 रुपयाला शेअर्स पण ज्या कंपनीचे असतात एकतर ते फ्रॉड असतात नाहीतर कर्जबाजारी त्या कधी बंद पडतील सांगता येत नाही...मोठ्या मोठ्या बफे किंवा झुनझुनवाला यांच्या जीवनप्रवास किंवा प्रेरणादायी विचार ऐकायला चांगले वाटतात पण ते सर्व सामान्य किंवा मध्यम वर्गीय लोकांचे जीवन नाही सुधारू शकत...जरी समजा सामान्य मानासने गुंतवणूक सुरू केली तर त्याला काय त्याचा फायदा गुंतवणुकीचा परतावा मिळणार 20-30 वर्षाने...इथ उद्या जगतो की मरतो हे कोणाला माहिती नाही आणि पोटाला चिमटा काढून...स्वप्नाचा त्याग करून गुंतवणूक करायची ज्याचा तपास पण नाही तिचा फायदा होईल की नाही... बफे व त्यांच्या सारखे त्यांनी जर परत त्यांचे आयुष्य सुरू केले आणि त्यांना त्या काळात जी रक्कम दिली तेवढीच आता दिली व सांगितले गुंतवणूक करा आणि व्हा परत अब्जाधीश...साधं करोडपती होता होताच पिवळी होईल... वरील कमेंट चा सकारात्मक विचार करा किंवा नकारात्मक पण जे सत्य आहे ते कोणीच बदलू शकत नाही...
मोहनीश पबराय यांनी ज्या दक्षिणा फौंडेशन ची सुरुवात केली - त्यामध्ये माझे पण शिक्षण झाले. २००९ मध्ये ते आम्हा विद्यार्थ्यांना भेटायला आले होते आणि बराच वेळ त्यांनी आमच्यासोबत खूप उत्साहीपणे घालवला व बऱ्याच मोटिवेशनल गोष्टी सांगितल्या होत्या. माझ्यासारखे हजारो गरीब कुटुंबातील मुलं त्यांच्यामुळे आई आई टी इंजिनिर्स होऊ शकली.
खरं सांगायचं तर अश्या खूप गोष्टी आहेत. पण व्हाल्यू अनलॉकिंग त्या वेळेस शक्य होते, आता जवळपास नाही. आणि झालेच तर ते शॉर्ट टर्म साठी. त्यामुळेस केवळ प्रेरणा घेण्यासाठी हा विडिओ उपयुक्त आहे. मात्र असेच करून जर कोणी पैसे कमविण्याचा विचार करणारं असेल तर त्याच्या सारखा मूर्ख व्यक्ती नाही.
Background music is annoying, it causing disturbance in concentration. This is an educational video and not entertainment video or song. Please remove the background music.