का रे रोखियली नजर तू तरी वाटे मज लबाड धरु नको समाधान हरी मी तुझा काय केला गुन्हा तुझा माझा तुझा माझा सात जन्माचा जिवा भावाचा घरोबा जुना घरोबा जुना हरी...... इकडे माहेर तिकडे सासर हरी सोड सोड माझी वाट रे कस सांगू भुललिया गुणा भुललिया गुणा घागर घेऊनि पाणीयसी जाता हरी सोड सोड माझी घागर रे कस सांगू भुललिया गुणा भुललिया गुणा एका जनार्दनीं समरस झाली आणि हरिचरणी राधिका आली कस सांगू भुललिया गुणा भुललिया गुणा