Тёмный

Nighoj Ranjan Khalge - Kund Potholes| निघोज - आशिया खंडातील सर्वात मोठे रांजणखळगे - कुंड | 

weekendtravels.in
Подписаться 6 тыс.
Просмотров 3,1 тыс.
50% 1

रांजणखळग्यांच्या परिसरात म्हणजेच कुकडी नदीच्या पात्राच्या दोन्ही बाजूस मळगंगा देवीची दोन मंदिरे आहेत आणि या दोन मंदिरांना जोडणारा राज्य सरकारच्या वतीने बांधण्यात आलेला झूलता पूल देखील बघण्यासारखा आहे. पूलाच्या मध्यभागी उभे राहून कुकडी नदीचे दर्शन नदीच्या पात्राच्या दोन्ही बाजूस असलेल्या रांजणखळग्यांमुळे विलोभनीय दिसते. निसर्गाचा हा चमत्कार तासन् तास बघत रहावा वाटतो. निघोज गावात मळगंगा माता मंदिराबरोबरच कपिलेश्वर मंदिर, वाघजाई माता मंदिर आणि राम मंदिर बघण्यासारखी आहेत. दरवर्षी भरणाऱ्या मळगंगा मातेच्या जत्रेस लाखो संख्येने भक्तगण मोठ्या भक्तीभावाने मळगंगा मातेच्या दर्शनासाठी येत असतात.
निघोज हे गाव तेथील रांजणखळग्यांमुळे जगभरात प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्यातील शिरुर आणि अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर ह्या दोन तालुक्यांच्या सिमेवरील असलेले हे निघोज गाव. ह्या खड्डयांचा आकार रांजणा सारखाच असून ह्या कुंडातील पाणी दुष्काळातसुद्धा आटत नाही. अनेक वर्षापूर्वी या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसामुळे ह्या कुंडांची निर्मिती झाली असल्याचे काही तज्ञांचे म्हणणे आहे.
कुकडी नदीच्या पात्रात साधारण 200 मीटर लांब व 60 मीटर रुंद इतक्या भागात खडकामध्ये रांजणखळग्यांचे विविध आकार आपणास पहावयास मिळतात. या रांजणखळग्यांना स्थानिक भाषेत ‘कुंड म्हणतात. निसर्गाने बहाल केलेल्या ह्या छानशा कुंडांमुळे कुकडी नदीच्या सौंदर्यात भर पडलेली आहे. रांजणखळग्यांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील करण्यात आलेली असल्याने त्याची ख्याती संपूर्ण जगभर पसरलेली आहे. रांजणखळग्यांची निर्मिती कशी झाली, कोणत्या भौगोलिक कारणांमुळे झाली ह्या सर्व बाबींचा अभ्यास करण्याकरीता जगभरातील तज्ञमंडळी आवर्जून भेट देत आहेत. कुकडीचे रांजणखळगे देशी-विदेशी पर्यटकांना आकर्षित करीत असून भौगोलिक बदलांचा अभ्यास करण्यासाठी अभ्यासकही येथे येत असतात. रांजणखळग्यांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील करण्यात आलेली असल्याने त्याची ख्याती संपूर्ण जगभर पसरलेली आहे.
निघोजपासून साधारण 25 कि.मी.अंतरावर निसर्गरम्य चिंचोली गाव आहे. ह्या गावात आपल्याला असंख्य प्रमाणात मोर बघावयास मिळतात. हे गाव मोराची चिंचोली ह्या नावाने प्रसिद्ध आहे.
#nighoj #ranjankhalge #weekendtravels #weekendtravels.in #nearpune #nearnagar #निघोज
nighoj
nighoj Ranjan Khalge
nighoj Potholes
nighoj Kund
निघोज
निघोज रांजणखळगे
निघोज कुंड
nighoj ranjan story
nighoj ranjan wikipedia
nighoj ranjan age
nighoj ranjan in english
nighoj ranjan khalge
ranjan khalge information in marathi
nighoj ranjan khalge wikipedia
ranjan khalge in english
marathi travel vlog

Опубликовано:

 

8 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 10   
@kaverigaikwad1273
@kaverigaikwad1273 24 дня назад
खुप.छान.माहिती. दिली
@weekendtravelsin
@weekendtravelsin 24 дня назад
धन्यवाद 🙏 Keep supporting 😊
@user-tb4vc9en6d
@user-tb4vc9en6d Месяц назад
खूप छान माहिती व अप्रतिम विडिओ 👌👍
@weekendtravelsin
@weekendtravelsin Месяц назад
धन्यवाद 🙏😇😊
@jayadventures7258
@jayadventures7258 Месяц назад
निघोज हे गाव तेथील रांजणखळग्यांमुळे जगभरात प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्यातील शिरुर आणि अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर ह्या दोन तालुक्यांच्या सिमेवरील असलेले हे निघोज गाव.
@weekendtravelsin
@weekendtravelsin Месяц назад
धन्यवाद 🙏😊
@jayadventures7258
@jayadventures7258 Месяц назад
ह्या खड्डयांचा आकार रांजणा सारखाच असून ह्या कुंडातील पाणी दुष्काळातसुद्धा आटत नाही.
@weekendtravelsin
@weekendtravelsin Месяц назад
🙏
@jayadventures7258
@jayadventures7258 Месяц назад
अनेक वर्षापूर्वी या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसामुळे ह्या कुंडांची निर्मिती झाली असल्याचे काही तज्ञांचे म्हणणे आहे.
@weekendtravelsin
@weekendtravelsin Месяц назад
🙏
Далее
🎙А не СПЕТЬ ли мне ПЕСНЮ?🍂
3:04:50
🎙А не СПЕТЬ ли мне ПЕСНЮ?🍂
3:04:50