आज तुझ्यामुळे मला इथला आस्वाद घेता आला कारण तुझ्या व्हिडिओ नंतर मला नीट पत्ता सापडला.. मी बरेच ब्लॉग पाहिलेत ... असतीलही नीट सगळे पण मला नीट पत्ता सापडत नव्हता...😊 जवळपास सहा महिन्यांपासून कमी वेळ असताना सुद्धा मी शोधत होतो पण आज जाऊन मला नीट पत्ता सापडला आणि आणि आठ महिन्यांपासून reels and vedios मधली नाश्त्याची चव आस्वाद आली.. Thank you. मराठी musketeers..
आज गेलो होतो, सापडत नव्हते, मग हा विडिओ बघून, address शोधून काढला, अर्थात गल्ली नंबर 1 मध्ये एके ठिकाणी महाप्रचंड गर्दी दिसली, ते पाहून तिथे थांबलो, मग प्रचंड energy ने पोहे हलवताना हे काका दिसले, गर्दी बघून जाऊ की नको असे वाटले, तरिही try करू असे म्हणालो, आणि त्या काका काकींनी अगदी लक्षात ठेवून दुसऱ्या round ला मला पोहे दिले,पोहे खिचडी छान आहेच पण या दोघांचा स्वभाव तर खूपच चांगला आहे, एवढ्या गर्दीत प्रत्येकाला अगदी लक्षात ठेवून देतात, शिवाय पैसे pay केले की नाही हे पण बघत नाहीत, यागोष्टी खूप चांगल्या वाटल्या...👌