पंडित रामदास कामत हे माझे अत्यंत आवडते गायक होते ! हे आदिमा हे अंतिमा, पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव, निर्गुणाचे भेटी आलो सद्गुणा संगे, प्रथम तुज पाहता, मयूरा रे फुलवित ये रे पिसारा, हरी ओम प्रणव ओंकार शिवा, आकाशी फुलला चांदण्यांचा मळा, देवाघरचे ज्ञात कुणाला, देवा तुझा मी सोनार, राधाधर मधुमिलिंद जय जय आणि शिवतांडव स्त्रोत ... त्यांच्या सुरेल आवाजातील हि सर्व गीते मी आजही ऐकते! मी चंदूमामाकडे ठाणे येथे इयत्ता ६वी, ७ वी ला शिकायला होते तेव्हा माझी प्रेमळ आजी, मी आणि चंदूमामा असे आम्ही राहत असू! त्यावेळी पंडित रामदास कामत यांच्या सुरेल आवाजातील हि सर्व गीते पहाटेच्या "प्रभात वंदन" या कार्यक्रमात रोज लागायची! नि याचा आवर्जून उल्लेख मी "आजी - आजोबां" वर लिहिलेल्या लेखामध्ये केला होता! 🙏🙏🙏 आयुष्यात एकदा तरी त्यांची भेट घडून यावी हि मनस्वी ईच्छा होती... परंतु ती आता अधुरीच राहिली... अशा या माझ्या अत्यंत आवडत्या महा गायकांस जड अंतःकरणाने आणि साश्रु नयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली !!! 🙏💐😢
ते स्वतः गात आहेत.. गायनावर लक्ष केंद्रित आहे.. तुम्ही स्वतः देखील पुन्हा लक्ष देऊन ऐकाल तर जाणवेल कि साक्षात नारद पृथ्वीवर अवतरले आहेत... खोटेपणा (acting) नाहीच त्यात.. उत्तम भाव आहे