अगदी शिवरायांची मूर्ती साक्षात आमच्या समोर आणायचं काम केलंत आफळे बुवा.शब्दरचना तर अगदी उत्तम आहेच पण शब्द उच्चार सुद्धा अप्रतिम आहेत.अशीच निरुपण सेवा पुढेही करत राहा .धन्यवाद आफळे बुवा
जय देव, जय देव, जय जय शिवराया या, या अनन्य शरणां, आर्या ताराया आर्यांच्या देशावरी म्लेच्छांचा घाला आला आला सावध हो शिवभूपाला सदगदीता भूमाता दे तुज हाकेला करुणारव भेदूनी तव हृदय न का गेला जय देव, जय देव, जय जय शिवराया श्रीजगदंबा जी तव शुंभादीक भक्षी दशमुख मर्दूनी ती श्रीरघुवर संरक्षी ती पूता भूमाता, म्लेंच्छा ही छळता तुजविण शिवराया तिज कोण दुजा त्राता जय देव जय देव, जय जय शिवराया त्रस्त आम्ही दीन आम्ही, शरण तुला आली परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो साधुपरित्राणाया, दुष्कृती नाशाया भगवन भगवदगीता सार्थ कराया या जय देव, जय देव, जय जय शिवराया..
अतिशय सुंदर ही आरती श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्व्नपूर्तीसाठी आजही वेगवेगळ्या सणासुदीला, राष्ट्रीय पातळीवर त्याचे गायन आणि स्मरण होणे हे गरजेचं आहे. ही आरती ची संकल्पणा पुढे नेण अत्यंत गरजेचे आहे. आपला स्नेही, संदीप दरपेल
Namaste . To watch the full kirtan on Swatantryaveer Vinayak Damodar Savarkar by Shri Charudatta Aphale , please visit ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-0w4Dh1eS4SU.html
आरती खूपच छान पण यात एक कडवे म्हणायचे राहिले आहे.श्री जगदंबा जीस्तव शुंभादिक भक्षी, दशमुख मर्दुनी जी श्रीरघुवर संरक्षी, ती पूता भूमाता म्लेंच्छाही छळता, तुजविण शिवराया तिज कोण दुजा त्राता?