नमस्कार प्रथम हा नवीन उपक्रम सुरू केल्याबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद. श्री. भागवत ,मनाचे श्लोक मारूती स्तोत्र सर्वच भावपूर्ण पण श्री विष्णू सहस्रनामाने मिळालेला आनंद व समाधान शब्दांत सांगता येणार नाहीं , आत्ता पर्यंत मी पाठकरण्यासाठी खूप ठिकाणी श्री विष्णू सहस्रनाम शोधत होते पण कुठेच मनासारखे मिळाले नाही पण तुम्ही पठण केलेलं ऐकलं आणि शोध थांबला आवाज सुस्पष्ट शांत तरीही गंभीर ऐकतच रहावं .आपण पुस्तकात बघून म्हणायला लागलो तर उच्चार असे तुमच्या सारखे येत नाही .गुरुजींकडून संथा मिळाल्याचा आनंद झाला खुप खुप धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच
अतिशय शांत शुद्ध धीरगंभीर स्वरोच्चारण व त्यासवे लिखीत स्वरूपही अतिशय प्रसन्न वाटत श्रीविष्णूसहस्त्रनाम .पुरूषोत्तम मासात ह्यामुळे म्हणता ही येत.फारच आवड उत्पन्न होते रोज म्हणतांना.नमस्कार तुम्हांला बुवा.🙏🚩
खूप खूप धन्यवाद तुमच्यामुळे मी विष्णू सहस्रनाम म्हणू शकले, अतिशय स्पष्ट उच्चार आणि शांत आवाज आहे तुमचा, खूपच सुंदर, पुरूष सूक्त आणि पांडुरंग अष्टक पण ऐकायला आवडेल तुमच्या आवाजात
Namaskar buva Vishnu sahastra namavali atishay sundar avaj she Andi spast aikun mala khup bare vatate me roj sakali aikte om chya ucharane gharat prasann vatate🙏🙏👌💐
बुवा नमस्कार आपण म्हटलेले विष्णू सहस्र नाम ऐकायला अत्यंत छान सुश्राव्य तसेच अत्यंत शांत वाटते.खरोखर आत्मिक शांती मिळते पुन्हा पुन्हा ऐकावे वाटतेइतके सुंदर व स्पष्ट म्हणता आपण नमस्कार.