Тёмный

Sukhkarta Dukhharta with Lyrics & Meaning | Ganpati Marathi Aarti 

Geeta Dnyan
Подписаться 5 тыс.
Просмотров 1,1 тыс.
50% 1

॥१॥
सुखकर्ता दु:खहर्ता, वार्ता विघ्नांची|
नुरवी; पुरवी प्रेम, कृपा जयाची |
सर्वांगी सुंदर, उटी शेंदुराची|
कंठी झळके माळ, मुक्ताफळांची॥१॥
॥धृ॥
जय देव, जय देव जय मंगलमूर्ती|
दर्शनमात्रे मन कामना पुरती ॥धृ॥
॥२॥
रत्नखचित फरा, तुज गौरीकुमरा|
चंदनाची उटी, कुमकुम केशरा|
हिरेजडित मुकुट, शोभतो बरा|
रुणझुणती नूपुरे, चरणी घागरिया|
॥३॥
लंबोदर पीतांबर, फणिवरबंधना|
सरळ सोंड, वक्रतुंड त्रिनयना|
दास रामाचा, वाट पाहे सदना|
संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे, सुरवरवंदना|
सुख+कर्ता-आनंद/समाधान+रचनाकार; दु:ख+हर्ता-दु:ख+हरण करून नेणारा;
वार्ता-बातमी; विघ्नांची-संकट/आपत्ती;
नुरवी-न उरवी; पुरवी-देणे; प्रेम-प्रेम; कृपा-अनुग्रह/दया; जयाची-ज्याची;
सर्वांगी-सर्व अंगावर; सुंदर-आकर्षित/चांगले; उटी-सुगंधित लेप; शेंदुराची-शेंदुराची;
कंठी-पुरुषांच्या गळ्यातील सोन्याचा किंवा मोत्याचा अलंकार; झळके-चमक/चकाकी;
माळ-गळ्यात घातलेला हार; मुक्ता+फळांची-पुष्पक/फुल+फळांची;
जय देव-जय देव; जय देव-जय देव;
जय मंगल+मूर्ती-जय शुभ/कल्याण/चांगले+मूर्ती;
दर्शन+मात्रे-नजरभेट/पाहणे+निव्वळ/नुसता; मन-मन;
कामना-आभिलाषा/आकांशा/इच्छा; पुरती-पूर्ण होणे;
रत्न+खचित-रत्न+जडलेला/जडित; फरा-मुकुटाचा मध्यभागी असलेले रत्न;
तुज-तुला/तुजला; गौरीकुमरा-गणपती चे एक नाव/पार्वती+कुमार;
चंदनाची-गंध/लाकूड उगाळून देवास लावण्यासाठी; उटी-सुगंधित लेप;
कुमकुम-कुंकू; केशरा-केशरी रंगाचा;
हिरे+जडित-हिरे+जडलेला; मुकुट-मुकुट; शोभतो-शोभातो; बरा-चांगला/योग्य;
रुणझुणती-मंजुळ आवाज/मधुर आवाज; नूपुरे-गुंगारू/पैंजण;
चरणी-पायावर; घागरिया-घागर;
लंबोदर-गणपती चे एक नाव/लंब+उदर=मोठे पोट; पीतांबर-पिंवळ्या वर्णाच्या रेशमी वस्त्र;
फणि+वर+बंधना-नाग+वर+गांठ देणे/न हालेसा करणे;
सरळ-सरळ; सोंड-सोंड; वक्रतुंड -गणपती देवाचे एक नाव/वक्र+तोंड; त्रि+नयना-तीन+डोळे;
दास रामाचा-समर्थ रामदास; वाट-मार्ग/वाट; पाहे-प्रतिक्षा/पाहती; सदना-घर;
संकटी-अनेक कठीण प्रसंग; पावावे-प्रसन्न हो;
निर्वाणी-शेवटचा प्रसंगाकरिता राखून ठेवलेला; रक्षावे-रक्षण करणे;
सुर+वर+वंदना-देव+वर/पण+नमस्कार करणे;
भावार्थ
सुख आणणारा आणि दुःख दूर करणारा / सुख - समाधान निर्माण करणारा आणि दुःख हरणारा;
वार्ता विघ्नाची (संकट/विघ्न संपवणारा) न उरवणारा व प्रेम पुरवणारा आणि ज्याची आम्हावर कृपा आहे असा.
संपूर्ण अंगावर/शरीरावर शेंदुराचा लेप आहे, गळ्यात सुगंधित फुलांचा कंठीहार झळकत आहे.
भावार्थ
हे गणेशा तुझ्या शुभ मुर्तीच्या निव्वळ दर्शन मात्राने सर्व मनोकामना पूर्ण होतात देवा तुझा जयजयकार असो.
भावार्थ
अनेक रत्नांनी सजवलेल्या तुला गौरीपुत्रं/पार्वती पुत्राला, कपाळी/भाळी चंदन कुंकु केसर लावून सुशोभित केले आहे.
हिरे असलेला मुकुट शोभत आहे. पायात रुणझुण वाजणारी पैंजण आहेत. आणि चरणांवर घागरी वाहत/अर्पण आहेत
भावार्थ
लंबोदर(गणपतीचे एक नाव)/मोठे पोट असलेला, पीतांबर नेसलेला आणि
नागाचे(फनिवर - नागांचा राजा शेषनाग) कमरेला बंधन असलेला/नाग कमरेला बांधून ठेवलेला.
सरळ सोंड किंवा वक्र/वाकडी सोंड असलेला तीन डोळे असलेल्या/त्रिनयन असलेल्या.
मी समर्थ रामदास (आरतीचे रचनाकार/कवी) माझ्या घरी तुझी वाट पाहत आहे/
संकटकाळी धावून यावे आणि निर्वाणी/शेवटपर्यंत कायम रक्षण करावे असा तू जो देवतांना देखील वंदनीय आहे
-विनोद बोऱ्हाडे आणि नवनाथ बोऱ्हाडे

Опубликовано:

 

6 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 6   
@explorerganesh
@explorerganesh 4 года назад
Mast❤️🥰
@geetadnyan4542
@geetadnyan4542 4 года назад
Thanks sir Please share
@sachinsalunke7249
@sachinsalunke7249 4 года назад
मस्त
@geetadnyan4542
@geetadnyan4542 4 года назад
Thanks
@digambarraut7247
@digambarraut7247 3 года назад
Nice 👍
@geetadnyan4542
@geetadnyan4542 2 года назад
Thanks for reply
Далее
Сказала дочке НЕТ!
00:24
Просмотров 733 тыс.
Напугал рыжего малыша😂
01:00
Просмотров 98 тыс.
Adi Shankaracharya gave This Mantra 1000 Years Back
6:37
Сказала дочке НЕТ!
00:24
Просмотров 733 тыс.