Here is full lyrics of song.. वाट पाहते पुनवेची हाती आरती सजली गं वर्षा मागून वर्षाची परंपरा मी पुजली गं॥धृ॥ याग सयांनो मिळवा या माझ्या सूरामध्ये सूर आ.. आ..आ.. याग सयांनो मिळवा या माझ्या सूरामध्ये सूर राना वनात घुमू दे साद अशी दूर दूर जाग्या झाल्या आठवणी मला सावली हसली गं वर्षा मागून वर्षाची परंपरा मी पुजली गं ॥१॥ हात जोडूनी वडाला भाग्य कुंकवाचं मागू आ.. आ..आ.. हात जोडूनी वडाला भाग्य कुंकवाचं मागू गरतीच्या संसाराचं त्याला सुख दुःख सांगू डोळे मिटता भक्तीनं पंख पापणी भिजली गं वर्षा मागून वर्षाची परंपरा मी पुजली गं ॥२॥ माझा सावीत्रीचा वसा हाती घेईन मी वाण आ.. आ..आ.. माझा सावीत्रीचा वसा हाती घेईन मी वाण धाग्या-धाग्यात गुंफीन तन मन पंचप्राण दान टाकिलं पदरात मनी भावना रुजली गं वर्षा मागून वर्षाची परंपरा मी पुजली गं॥३॥ वाट पाहते पुनवेची हाती आरती सजली गं वर्षां मागून वर्षांची परंपरा मी पुजली गं गायिका » आशा भोसले गीतकार » जगदिश खेबुडकर संगीत » दत्ता डावजेकर चित्रपट » वाट पाहते पुनवेची (१९९२)