Тёмный

Visapur Fort | विसापूर किल्ला | Solo Trekking  

Marathi Factor
Подписаться 277
Просмотров 175
50% 1

लोणावळ्या च्या डोंगर रांगांमध्ये लोहगड आणि विसापूर हे समोरा समोर किल्ले दिसून येतात.आज हा किल्ल्यावर पर्यटक,ट्रेकर्स,शिवप्रेमी मोठ्या संख्येने भेट देत असतात.किल्ल्याची चढाई सोपी असून किल्ल्याचा आकार लहान आहे.मान्सून मध्ये किल्ल्यावर विहंगम दृश्य पाहायवयास मिळते त्यामुळे या किल्ल्याला विषेतः मान्सून मध्ये भेट देणाऱ्याची संख्या खूप आहे.
किल्ल्याचा इतिहास :
विसापूर किल्ला हा प्रामुख्याने टेहळणी चा किल्ला म्हणून इतिहासात ओळखकला जात असे.खंडाळा घाटावर होणाऱ्या व्यापारी वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे,शत्रूची हालचाल टिपणे, लोहगडाला संरक्षण देणे या गोष्टींची जबाबदारी विसापूर किल्ल्याकडे होती.
इ.स. १६४८ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जेंव्हा लोहगड स्वराज्यात आणला त्याच वेळी विसापूर किल्ला सुद्धा स्वराज्याला मिळाला. विसापूर किल्लाचे नामकरण महाराजांनी संबळगड असे केले होते. तसेच विसागड असेही या किल्ल्याला ओळखले जात असे. पुढे १६६५ मध्ये झालेल्या ऐतिहासिक पुरंदर तहामध्ये शिवाजी महाराजांना हा विसापूर किल्ला मुघलांना द्यावा लागला होता.
शिवकाळानंतर १७१३-१७२० या काळात स्वराज्याचे पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांनी हा किल्ला मजबूत करून बांधून घेतला.पुढे १८१८ नंतर किल्ल्याचा ताबा इंग्रजांनी घेतला आणि त्यानंतर किल्ल्याची नासधूस झाली.

Опубликовано:

 

9 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 15   
Далее