मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनल वर तुम्हाला वेगवेगळ्या बिझिनेस स्टार्टअप तसेच वेगवेगळ्या बिझिनेस idea's पहायला मिळतील. त्यामुळे आपल्या या मराठी उद्योजकांच्या चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद!
मार्गदर्शन चांगले आहे. पण 100 रू लिटर दर IT park, MIDC , City area अशा ठिकाणी /जवळपास मिळू शकतो जे बोडखे साहेबांच्या आजूबाजूला भाग आहे. ग्रामीण भागात गाईचे दूध 55- 60 रू लि. दराने सुद्धा खपणे शक्य होत नाही. शहरात फिरून ग्राहक शोधत दूध किरकोळ स्वरूपात विकावे लागते. गि-हाईकही फार मर्यादित असतात याचे. हे सांगतात तशा योजना ग्रामीण भागात यशस्वी झालेल्या दिसत नाहीत. यांच्या माध्यमातील प्रयोग कुठल्या कुठल्या जिल्ह्यात यशस्वी झाल्या आहेत त्याची माहिती त्या संबंधित यशस्वी शेतक-याचे नाव व पत्त्या, मोबाईल क्र. सह व भाजीपाला, दूध खरेदी/विक्री केंद्र पत्ता यासह माहिती द्यावी म्हणजे तेथे जाऊन खात्री करू शकू व त्यांच्यामार्फत शेतीमाल व दूध इ. विक्री करता येईल.
भारतीय बाजारपेठेच्या नियमानुसार उत्पादकाला (manufacturer's) ६/८ % नफा मिळतो, विक्रेत्याला Traders 12/15% नफा मिळतो. आणि सेवा क्षेत्रात (service provider) 25/30% नफा मिळतो.
खूप छान माहिती मिळाली. जर अशा प्रकारे नवीन शेतकरी लोकांनी एकत्र येऊन शेतीमध्ये कष्ट करण्याची तयारी ठेवली तर रोजगाराचा प्रश्न मिटेल. बेरोजगारी कमी होईल. धन्यवाद तुमच्या कार्याला.