Тёмный

[अध्याय क्रमांक २, श्लोक २३] श्रीबुधभूषणम् अध्ययन, राजनीति | Budhbhushan Sanskrut Granth 

Shiv Bhushan
Подписаться 18 тыс.
Просмотров 157
50% 1

[अध्याय क्रमांक २, श्लोक २३] श्रीबुधभूषणम् अध्ययन, राजनीति | Budhbhushan Sanskrut Granth
नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे शिवभूषण ह्या युट्युब चॅनेल वर , इथे आपण कवी भुषणांचे विविध छंद अनुभवत असतो. तसेच बुधभूषणम् ह्या संस्कृत ग्रंथाचे अवलोकन करत असतो.
आजच्या व्हिडीओत आपण पाहणार आहोत..
संभाजी महाराजांनी लिहिलेल्या श्री बुधभूषणम् ग्रंथातील अध्याय क्रमांक २ मधील श्लोक क्रमांक २३.
श्रीमच्छम्भुनृपविरचितम् बुधभूषणम्
।। श्री गणेशाय नमः ।।
।। श्री नृसिंहाय नमः ।।
अध्याय २ (राजनीती)
श्लोक क्र २३
संधिश्च विग्रहश्चैव यानमासनमेव च।
द्वैधीभाव: संश्रयश्च षाड्गुण्यं परिकीर्तितम्।।
अर्थ~या श्लोकात राजाच्या ठायीं असणारी सहा लक्षणे सांगितली आहेत. मागील श्लोकातही राजनीतीतील या सहा गुणांबद्दल सांगितले आहेच. हा श्लोक जरी विष्णुधर्मोत्तर पुरणातून घेतलेला असला तरी हेच सहा गुण मनुस्मृतीने पण सांगितले आहेत.
हे सहा गुण म्हणजे-
१. संधी~तह करणे.
२. विग्रह~युद्ध करणे.
३. यान~शत्रूवर संकटात असताना हल्ला करणे अथवा दुर्बळ राजाने मित्र राजांच्या साहाय्याने प्रबळ शत्रुराज्यावर आक्रमण करणे.
४. आसन~तळ ठोकून स्वस्थ राहणे, वेढा देणे.
५. द्वैध~सैन्याची दोन ठिकाणी विभागणी करणे/तसेच शत्रूच्या सैन्यात फूट पाडणे असाही एक अर्थ आहे.
६. संश्रय~शत्रु राजाचा उपद्रव होत असेल तर आपल्याहून प्रबळ राजाच्या आश्रयाला जाणे.
शिवाजी महाराजांनी या सर्व गुणांचा प्रत्यय त्यांच्या राजकीय जीवनात दिलेला आहे.
पुरंदर गडाच्या प्रसंगात त्यांनी मिर्झा राजा जयसिंह याच्याशी तह(संधी) केला.
शाईस्ताखानावर त्यांनी स्वतःहून हल्ला(विग्रह) केला.
दक्षिणीयांची पातशाही दक्षिणी राजांच्या हातीच राहिली पाहिजे या समान मुद्द्यावर सर्व दक्षिणी राजांची एकजूट करून दिल्लीच्या सत्तेला आव्हान देण्याचे काम शिवाजी महाराजांनी केले. यालाच यान म्हणतात.
शत्रूच्या सैन्याला वेढा देऊन स्वस्थ बसणे या तंत्राचा वापर शिवाजी महाराजांच्या आयुष्यात अभावानेच आढळतो. तरीही मिरजेच्या किल्ल्याला घातलेल्या वेढ्यात आसन हा गुण दिसतो.
बहादूरखानाच्या विरुद्ध बहादूरगड येथे झालेल्या युद्धात मराठ्यांनी शत्रुसैन्याची दोन गटांत विभागणी करून त्यांस पराभूत केले. यालाच द्वैधीभाव म्हणतात.
शिवाजी महाराज केवळ सोळा वर्षांचे असताना त्यांनी आदिलशाही कैदेतून आपल्या वडिलांची(शहाजीराजांची) सुटका करून घेण्यासाठी शाहजहान बादशहाशी संगनमत करून आदिलशाहीचा यशस्वीपणे सामना केला आणि शहाजी महाराजांची सुटका करवून घेतली. याला संश्रय म्हणतात.
वेळप्रसंगी आपल्याहून शक्तिशाली राजापासून स्वतःला संरक्षित करण्यासाठी दुसऱ्या एखाद्या बलाढ्य राजाच्या आश्रयाला जाणे म्हणजे संश्रय.
श्रीबुधभूषणम् ग्रंथाचे क्रमानुसार सगळे व्हिडीओज
ru-vid.com....
तुकाराम महाराजांच्या साधनेने पावन झालेल्या डोंगरांचे व्हिडीओज
ru-vid.com....
ऐतिहासिक आणि प्रसिद्ध अशा ठिकाणाची माहिती देणारे व्हिडीओज
ru-vid.com....
शिवभूषण चॅनेल चा मुख्य कंटेंट कवी भूषणांचे सगळे छंद
ru-vid.com....
आता फेसबुक वर सुद्धा आम्हाला फॉलो करू शकता...
/ gavakadchidu .
#budhbhushanvideo #बुधभूषणव्हिडीओ #बुधभूषणसंभाजीमहाराज#शिवाजीमहाराज #कविभूषण #shivajimaharaj #kavibhushan #shivbhushan #shivrajbhushan #budhbhushan #budhbhushansambhajimaharaj #budhbhushanchevideo #parasharmone

Опубликовано:

 

15 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 2   
@shubhamgoswami9765
@shubhamgoswami9765 2 года назад
Iam waiting 😍
@pratikpalkar
@pratikpalkar Год назад
धन्यवाद.🙏🏻☺️
Далее
小丑调戏黑天使的后果#short #angel #clown
00:16
小丑调戏黑天使的后果#short #angel #clown
00:16