Тёмный

अबब ! चक्क कोकणातील जंगलात सापडली युवकांना कातळात कोरलेली भली मोठी पुरातन विहीर आणि लेणी।देवली,मालवण 

Sanchit Thakur Vlogs
Подписаться 110 тыс.
Просмотров 210 тыс.
50% 1

अबब ! चक्क कोकणातील जंगलात सापडली युवकांना कातळात कोरलेली भली मोठी पुरातन विहीर आणि लेणी।देवली,मालवण
कोकणात ऐतिहासिक वास्तूंचा खजिना या जंगलामध्ये , डोंगरांमध्ये दडला आहे . अनेक लेणी ,कोरीव विहिरी ,कातळळशिल्प,गुहा अश्या खूप साऱ्या वास्तू सह्याद्रीच्या कुशीत लपलेल्या आहेत . घनदाट जंगल आणि समाजामध्ये होणाऱ्या बदलांमुळे हळू हळू माणसांचं या पुरातन गोष्टींकडे दुर्लक्ष होतंय त्यामुळे या वास्तू जंगलामध्ये आहेत आणि अजूनही दुर्लक्षित आहेत. पूर्वजांचा वारसा ,पाऊलखुणा आणि ती कलाकुसर यांचं जिवंत उदाहरण असणाऱ्या या वास्तू या डोंगरदाऱ्यांमध्ये ऊन,वारा, पाऊस यांचा मारा सहन करत आजपर्यंत आपलं अस्तित्व टिकवून उभ्या आहेत पण आता पुढे किती दिवस टिकून राहतील काय माहीत . सध्या या वास्तूंची परिस्थिती बघता यांच्या कडे आता लक्ष नाही दिलं, संवर्धन व संरक्षण नाही केलं तर पुढच्या पिढीला मिळतील की नाही हा एक मोठा प्रश्न आहे .
त्यामुळे तुमच्या गावात अश्या काही वास्तू असतील तर त्याचं जतन करा सर्वांसमोर घेऊन या....
देवली ,मालवण येथील सड्यावर नक्की तो भाग कोणत्या गावात येतो सांगणं तसं कठीण पण देवली - बंडावाडी मधून वर गेल्यावर सड्यावर(माळरानावर ) पुरातन गुहा आणि विहीर आहेत. आपल्या गावच्या सड्यावर असा पुरातन ऐतिहासिक वास्तूंचा खजिना आहे असं समजल्यावर त्या देवली गावातील 3 तरुण दीप नाईक,विनायक चव्हाण ,अजय चव्हाण शोध घेण्यासाठी माळरानावर गेले तिकडे खूप शोधलं अखेर त्यांना त्या वास्तू सापडल्या,कातळात कोरलेली विहीर आणि कोरलेली गुहा . त्यानंतर ती बातमी माझ्या पर्यंत पोहचली ,मी थेट त्या ठिकाणी पोहचलो दीप नाईक ला सोबत घेऊन मी माळरानावर जाऊन त्या ऐतिहासिक वास्तू बघायचं ठरवलं . सड्यावर जायचा रस्ता तसा चांगला , दुचाकी वाहन ठेव ते ठिकाणी जात . जाताना कातळावरून आम्ही दुचाकी चालवत त्या ठिकाणी पोहचलो . पाहिली गुहा बघितली , थोडेसे अवशेष शिल्लक होते 3 खोल्या होत्या लेण्या असू शकतात . पण या लेण्या किंव्हा कोरलेल्या गुहा आता बिकट अवस्थेत आहेत ,लांबी ,रुंदी ,उंची ला सारखी जेमतेम 4,5ft उंची आणि तिघांची मिळून रुंदी 15 ते 20ft असेल.तिकडून मी विहिरी च्या दिशेने वळलो आणि पाहताच क्षणी प्रेमात पडलो . एवढी लांब ,खोल विहीर ती पण कातळात कोरलेली मी आजपर्यंत नाही बघितली होती . 40ते50ft लांब रुंदीला 3,4ft आणि खोल 50 ते 60ft .
खाली उतरण्यासाठी 40ते50 कोरलेल्या पायऱ्या , संपूर्ण विहीर कातळात कोरलेली .विहिरीच्या वर बाजूने काही दगड रचलेले होते संरक्षण म्हणून ठेवले असावेत . विहिरी मध्ये पाणी नाही,पण खाली थंडावा जाणवतो जमीन ओली आहे म्हणजे आत पाणी अजूनही आहे . या विहिरी कडे दुर्लक्ष झाल्याने तिची आता दुरवस्था झाली आहे. पण जर तिची निगा राखली तर अजून पण तिथे पाणी मिळू शकत एवढं नक्की . विहीर आणि ती कोरलेली गुहा एका समोर एक आहेत दोघांचा ही कालखंड एकच वाटतो तरीपण पुरावे आणि इतिहास माहीत नाही.
बाकी माहिती youtube vlog मध्ये आहे
Follow us -
Email - sanchitthakurvlogs@gmail.com
Instagram
/ sanchitthakurvlogs__
Facebook - / sanchitthakurvlogs
SnapChat -
/ sanchit_vlog
Telegram -
t.me/Sanchit_T...
#ancient #ancientwell
#kokan #konkan

Опубликовано:

 

11 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 210   
@vilaskubal6954
@vilaskubal6954 2 года назад
संचित , मित्रा नेहमी प्रमाणे एक नाविन्यपूर्ण व्ही डी ओ 👌👌 कोकणचा हा ऐतिहासिक ठेवा जगा समोर आणण्याचे महत्वाचे काम तू करत आहेस त्या बद्धल धन्यवाद 🙏🙏 या मार्फत मी दर्शकांना सांगू इच्छितो की व्ही डी ओ पहाताना तो आवश्य लाईक करावा , कारण पाहणारे बरेच पण लाईक करणारे कमी , हा एक ऐतिहासिक ठेवा आहे जो खूप कष्ट घेऊन तू दाखवत असतोस मग लाईक करायला काय हरकत आहे , तेव्हा प्रोत्साहन म्हणून व्ही डी ओ लाईक करावा 🙏🙏🙏🙏
@rajeevajgaonkar4152
@rajeevajgaonkar4152 2 года назад
संचित,तू अफाट मेहनत घेत असा ऐतिहासिक ठेवा प्रसिद्धीला आणतोस.तुझ्या मेहनतीला सलाम. फिरताना आवश्यक ती काळजी घे. शक्य असल्यास कॉंबॅट बूट वापर.अशा ठिकाणी फुरशी बरीच सापडतात. ही बहुतेक पावसाचं पाणी साठवण्याची विहीर असावी असं वाटतंय.
@rajanpawar2941
@rajanpawar2941 2 года назад
खरंच जबरदस्त ठिकाण ,अजून पुरातत्व खात्याकडून शोध होणे गरजेचं आहे , स्थानिक नेते मंडळी कृपया चॅनेल पाहत असाल तर पुढाकार घेणे ही विनंती🙏🙏
@narendravichare
@narendravichare 2 года назад
मित्रा, तुला खूप धन्यवाद 👌👌 तुझ्या मेहनतीला सलाम.. तू म्हणतोस ती लेणी असतील असे वाटत नाही. परंतु माणसांनी वास्तव्य करण्यासाठी कातळात खोदलेल्या घरासारख्या गुहा असाव्यात. ते काहीही असले तरी, आपला दुर्मिळ सांस्कृतिक ठेवा प्रकाशात आणण्याचे तुम्हा तरुण मुलांचे प्रयत्न पाहून मला नेहमीच तुम्हा मुलांचे खूप कौतुक वाटते. राजापूर तालुक्यातील आमच्या देविहसोळ नावाच्या गावात सड्यावर श्री आर्यादुर्गा मातेचे मंदिर आहे. त्या देवळा पासून साधारण १५०-२०० फुटावर अशाच प्रकारची ( डिझाईन ची ) संपूर्ण कातळात ( One piece ) कोरलेली मोठी विहीर आहे. तिचे पाणी देखील भरपूर असून खूप मधुर आहे.. देवळाजवळ कातळ शिल्पे देखील आहेत.. 👍😊
@user-yt3hm4ee5b
@user-yt3hm4ee5b 2 года назад
@Kalpesh Bamne होय लेका ... तुच बनवलाईस लेण्या ... भाग हिंदुविरोधी
@actualangel5133
@actualangel5133 2 года назад
Mala pan hay lenya vatlya nahi.
@bharatagre8802
@bharatagre8802 2 года назад
संचित अप्रतिम व्हिडिओ सुंदर सादरीकरण आणि कोकणचा अमूल्य समृद्ध ठेवा तू लोकांपुढे आणला आहेस त्याबद्दल तुला खूप खूप धन्यवाद जे जे कार्य असेच चालू राहू दे यासाठी आमच्या तुला खूप शुभेच्छा!
@mangalpawar4512
@mangalpawar4512 2 года назад
Fatty livar
@varmadhav
@varmadhav 2 года назад
Hii , video banvalyabddal dhanyawad. हि विहीर आमच्या गावातली असून , गावाचे नाव कर्लाचा व्हाळ असे आहे.
@shrikantprabhudesai1971
@shrikantprabhudesai1971 2 года назад
हे फक्त जल संचयाचे स्थान असु शकेल. पूर्ण कातळात कोरलेल असल्यास पाणी पाझरणार पण नाहीत. तळातील मातीचा उपसा केल्यास झरा आहे का ते कळेल. ३०-३५ फूट उंच असल्यामुळे झऱ्यापासुन येणाऱ्या पाण्याचा अवधी किंवा झोत चांगला असु शकेल. हे पाणी त्या मानवनिर्मित स्थानात राहणाऱ्यांसाठी तयार केले असावे. राहणीस्थानात फक्त दिवा ठेवण्यासाठी भिंतीत खोबण आहे. यावरुन असे वाटते की या निर्जन स्थळी तपश्चर्या, जप, किंवा तत्सम कार्य होत असावित किंवा तसा उद्देश होता. पूर्ण 'विहीरीत' किती घनफूट पाणी मावु शकत हे सहज मोजता येईल.
@smitasawant7891
@smitasawant7891 2 года назад
संचित..तु छान जून्या वास्तू दाखवतोस आम्हाला घरी बसून बघायला मिळतात धन्यवाद संचित..तुला मनःपूर्वक शुभेच्छा संचित 💐💐
@ujwalabarve6339
@ujwalabarve6339 2 года назад
नमस्कार🙏 खूप छान स्थळ दाखवलं आहे, ज्या मुलांनी शोधून काढले त्यांचे कौतुक, आणि तुझे पण कौतुक, मस्तच, धन्यवाद
@rupalisatam8871
@rupalisatam8871 2 года назад
तुझ्या विडिओ चे खूप contain भन्नाट आणि ऐतिहासिक असतात
@Hemant1.
@Hemant1. 2 года назад
धन्यवाद संचित. तू आपल्या पूर्व इतिहासाचा संचय करीत आहेस. एक विनंति करतो. इतका प्रवास करून अवघड जागी तू जातोस, तर शांतपणे शूटींगला वेळ दे. हा VDO घाई घाईत बनवलाय असे वाटतेय. त्या वास्तू वरून हळू हळू कॅमेरा फिरवला तर सर्व details बघायला मिळतील. नंतर केंव्हाही हे VDO परत बघता येतील. या गावांमध्ये परत परत जाणे शक्य होत नाही. या गुहा कोणी बनवल्या असतील, का बनवल्या असतील याचा अभ्यास नंतर कोणी करू शकेल. तुला बेस्ट ऑफ लक.
@ashokpalav6997
@ashokpalav6997 2 года назад
खूप छान. संचित तुझ्या मुळे एक गूढ विहिरीच रहस्य लोकांना समजल. लोकप्रतिनिधी, गावकऱ्यांनी यात लक्ष घातल पाहिजे आणि पुरातत्व खात्याने याच गुढ उकलल पाहिजे. धन्यवाद एक चांगला व्हिडिओ बनवल्या बद्दल.👍👍
@aai11156
@aai11156 2 года назад
धन्यवाद. अभय सुरेश सरमळकर वेंगुर्ले.
@manaliupdate4318
@manaliupdate4318 2 года назад
संचित तुझे खूप खूप धन्यवाद पुरातन गोष्ट दाखवल्या बद्दल सुंदर व्हिडिओ
@vishalbhogale6900
@vishalbhogale6900 2 года назад
खूप छान माहिती संचित भाऊ आणि मे सुधा नक्कीच तुला छोटीशी मदत नक्कीच करेल माझा full support ahey ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@mangeshvalanju4125
@mangeshvalanju4125 2 года назад
कोकण म्हणजे खजिना आहे तो आपण जपला पाहिजे खूप भारी वाटले😊
@santoshghatge1985
@santoshghatge1985 2 года назад
ही गुफा आमच्या गावची आहे कर्लाचाव्हाळ ही पुरातन काळातील आहे आणि ती पाच पांडवांनी बनवलेली आहे
@udayniture
@udayniture 2 года назад
भाऊ निलंगा तालुक्यातील खरोसा लेणी जांबादगडात आहे ती पण दाखवली तर छान
@shreyasgosavi320
@shreyasgosavi320 2 года назад
आजचा भाग एकदम man vs. Wild होता 😀🔥
@sandeshsawant9236
@sandeshsawant9236 2 года назад
खूप छान माहिती आणि विडिओ 👌👌👌👍😊
@arjuntupe8110
@arjuntupe8110 2 года назад
संचित तुझा व्हिडिओ बघितला खूपच छान असल्या दुर्मिळ व ऐतिहासिक गोष्टींची जोपासना करणे काळाची गरज आहे खुपच छान माहिती सर्वांपर्यंत पोहोचली
@shrimangeshchavan508
@shrimangeshchavan508 2 года назад
Sanchit khup chchan mahiti tuzhya mule milali. Vihir nehmi peksha veglich ahe ani khupch puratn asavi . ha theva aapn jopasla pahije. Kokan paraytnachya drushtine pn hyala prsiddhi dyayla hvi. Khup khup abhar ani dhanywad tuze changli mahiti ghr bslya amhchya prynt pochvilya bddl. 🌺🌻🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
@hiteshmhatre2231
@hiteshmhatre2231 2 года назад
मस्त एकदा घारापुरी ला पण जाऊन बघा 👌 कोकणात बर्‍याच गोष्टी लपल्यात
@amard993
@amard993 2 года назад
एकदम भारी
@avinashthakur9237
@avinashthakur9237 2 года назад
खूप सुंदर विडीओ संचित! तुझ्यामूऴे कित्येक वर्षें अज्ञात राहिलेल्या पुरातन वास्तु उज़ेड़ात आल्या सड्यासारख्या उजाड़ माऴरानात गुहां सोबतच विहिरी सापडतात हां कोकणातील खरोखर एका जून्या संस्कृतीचाच महत्वाचा पुरावा आहे पण काऴाच्या ओघात विस्मृतीत गेला देवली गावातील त्या युवकांचे खूप खूप आभार पण हे जतन करणे आणि त्याचा पर्यटनासाठी उपयोग होणे आवश्यक आहे धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा!
@preranaparadkar612
@preranaparadkar612 2 года назад
संचित तु कोकणातील खुपच छान असतात, देवगडात सात बावडी काय आहे त्याची माहिती दिली तर बरं होईल
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
Hoo
@umakanttambe2172
@umakanttambe2172 2 года назад
@@SanchitThakurVlogs जबरदस्त मित्रा भारीच शोधले अभिनंदन
@sunilraut3731
@sunilraut3731 2 года назад
छान नवीन व अधबुत अस ठिकाण दाखल जतन करून ठेवल पाहिजे आवडला विडियो
@manalibendre2815
@manalibendre2815 2 года назад
खरच खूप छान माहिती,संचित तू तर ग्रेट आहेस,हे तर आमच्या साठी एक aacharya आहे. धन्यवाद 🙏
@dayanandpawar5116
@dayanandpawar5116 2 года назад
That's my maternal uncles village. Never knew about this discovery although had been visiting this village for fifty years. Well done young generation. God bless you.
@pravinthakur9881
@pravinthakur9881 2 года назад
छत्रपति शिवाजी महाराजांच्या काळात ही तयार केलेली दिसतेय , ईथे सैन्य दडी मारून बसलेत तर व्यवस्था असावी, साधु-संत यांना पण शांतिपूर्ण वातावरणात ध्यान धारणा करतानादेखील व्यवस्था म्हणून पण असेल, विडिओ छान आहे ,आभार ,अनेक-अनेक धन्यवाद ।
@shantaramparab1888
@shantaramparab1888 2 года назад
संचित एक. उत्कृष्ट व्हिडिओ आणि माहिती पूर्ण वर्णन खूप छान देव तुझे कल्याण करो. ..
@manojsawant2422
@manojsawant2422 2 года назад
nice sanchit khup chan mahiti detos tya mule klta ki konamadhe asa junya vastu ahet tnx ......
@jyotipawar9143
@jyotipawar9143 2 года назад
Wow..thats amazing... bhari asatat tuje videos..keep it up👍👍
@snehalv186
@snehalv186 2 года назад
Kamal ahe tuji... Khup chan chan jaga tuja mule amhala baghayal milatat. Keep it up😊
@greenplanetsunil
@greenplanetsunil 2 года назад
कोकणात खूप छान एक्सपलोअर करतोस तुझे नाव सुवर्ण अक्षरात नाव नोंदले जाईल मनापासून धन्यवाद खूप छान माहिती लोकांपर्यंत पोहोचली जाते असेच नवनवीन जागा ठिकाणे सापडतील याचा मला पूर्ण विश्वास आहे
@krishna-lr2vk
@krishna-lr2vk 2 года назад
नांगरभाट चा येथे संदर्भ आला, चौके जवळ, नांगरभाट ST बस स्टॉपच्या बरोबर पाठी सुद्धा अशीच एक दुर्लक्षित विहीर आहे, पांडव कालीन आहे असे म्हणतात कृपया आपण तेथे भेट दिली तर ती विहीर सुद्धा प्रकाशझोतात येण्यास मदत होईल समोरच ग्रामपंचायत आहे अधिक ची माहिती सुद्धा तेथे मिळू शकेल
@badshah2211
@badshah2211 2 года назад
Great work brother always support
@MrRoshan1987
@MrRoshan1987 2 года назад
तुम्ही देवलीतून आलात पण हेआमचं गाव आहे कर्लाचाव्हlळ हे माझ्या गावात आहे
@balkrishnadhanawade52
@balkrishnadhanawade52 2 года назад
खूप छान काम करत आहेस 👍 कोकणात अशा खूप गोष्टी लपलेल्या आहेत त्या दाखवत आहात त्याबद्दल तुम्हाला वंदन. 👍 असेच एक अणूस्कूरा घाटात पांडवांनी बांधलेलं मंदिर आहे.मंदिराचे काम अपूर्ण आहे.तसेच मंदिराच्या बाजूला एक शिलालेख आहे तो अजूनही कुणाला वाचता आलेला नाही.आणि त्याच्या बाजूला सह्याद्री उतारावर एक पाण्याचे कुंड आहे पांडवांनी बांधलेलं.तिथून पुर्वीच्या काळी राजापूर कोल्हापूर व्यापार चालत असे. विशालगड जवळच असल्यामुळे बहुतेक शिवाजी महाराज ह्याच वाटेने राजापूर ला गेले असावेत. पुर्वी घाटात दगडांनी बांधलेली वाट होती.अजूनही त्याचे अवशेष दिसतात
@saritaharalkar5950
@saritaharalkar5950 2 года назад
Aaj paryand jevdhya padav lenya bhetlyat tya puratatva vibhaghane clear kelay ki Buddha lenya ahet magh ajun pandav lenya ka bolta
@SKumar-sy7op
@SKumar-sy7op 2 года назад
@@saritaharalkar5950 तुम्हाला तर जिथे तिथे बुद्ध लेण्या च दिस्तात, स्वतः कहि करायचे नाही दूसरी लोकांनी शोध घेतला तर आमच्या लेण्या आहे सांगायचे आयते खायची सवय लागली आहे फुकटच मिलते ना सगल्.
@sanjivchuri1757
@sanjivchuri1757 2 года назад
Khup chan mahiti detos khup khup dhanyawad sanchit 👍👍👍👌👌👌
@nitinmore623
@nitinmore623 2 года назад
अद्भुत 💐💐💐👌
@vilaspadave4472
@vilaspadave4472 2 года назад
छान विहीर आणी गुहा याचा आणखी शोध घेणे गरजेचे आहे गावकर्यांनी स्वतः मेहेनत घेऊन विहीर उपासल्यास भरपूर पाणी मिळेल असे वाटते
@divakarshirsathe2946
@divakarshirsathe2946 2 года назад
कदाचित विहीरीशिवाय, गुहेतून गुप्त पणे पळून जाता येत असेल. शत्रुला चकवण्या साठी. मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा पुढच्या शोधांसाठी.
@user-df1xm9ml7y
@user-df1xm9ml7y 2 года назад
भारी भावा
@deepaktawde9763
@deepaktawde9763 2 года назад
Wah mitra wah.. bhari vatata he vaghayla.. koknat khup kahi ahe he navyane kaltay.. 👍👍👍👍👍👍
@Woodartdentist
@Woodartdentist 2 года назад
वाह छान कौतुकास्पद 👍👍
@sakharamthakur6589
@sakharamthakur6589 2 года назад
👌💐💐💐लय भारी
@skumarvlogs
@skumarvlogs 2 года назад
Very nice video bhai
@jawaharshetti2369
@jawaharshetti2369 2 года назад
Good information!
@amitamratsagar5954
@amitamratsagar5954 2 года назад
अशीच एक विहीर सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील दातेगड / सुंदरगड या किल्ल्यावर आहे. तलवार विहीर म्हणुन ओळखली जाते
@sawantvilas5277
@sawantvilas5277 2 года назад
Nice & informative video. Thanks for sharing with us. 🙏🏻
@riahirlekar8690
@riahirlekar8690 2 года назад
Amazing hattsoff too such creativity structure thank you so much dada pratyek video madhye tu khup mehnnat ghetos big THUMPSUP to u
@rekhaparekar3918
@rekhaparekar3918 2 года назад
फारच छान वाटलं.
@anjalisatam4947
@anjalisatam4947 2 года назад
Kgup Chhan Video 🙏🌹🌹🙏
@shreeganeshsupermarketrave9375
@shreeganeshsupermarketrave9375 2 года назад
Good job
@5a14arundhatichavan9
@5a14arundhatichavan9 2 года назад
तुमचा व्हिडीओ सुंदर आहे पण आता शिम ग्याचा संकारूर गेला आणि रिफायनरीचा भस्मा सूर आला आहे हे सुंदर कोकण हा निसर्ग वाचण्या साठी तुमच्या चैनालवर रिफायनरी हटावा कोकण वाचवा अभियान राबवा घरा घरात अंदोलन पोहचवा आपले सुंदर कोकण वाचवा एकत्र या विरोधात आवाज उठवा कोकण वाचचा पुढच्या पिढया साठी सुमृद्ध कोकण वाचवा🌴⛵🌴🙏
@Pakshya
@Pakshya 2 года назад
Great work!! Mast!! 👍👍
@sharmilagawde9755
@sharmilagawde9755 2 года назад
Nice video 👍gud narration
@shamlimbore9406
@shamlimbore9406 2 года назад
Apratim, Khoop, Sundar,,
@dolphinbhushan
@dolphinbhushan 2 года назад
सुंदर माहिती 👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@vishalparab9115
@vishalparab9115 2 года назад
Sanchit खूप छान माहिती दाखवली. तुझे व्हिडिओ मी नेहमी बघतो. देवली हे माझ्या आत्या च गाव आहे. दीप नाईक माझ्या आत्येभावाचा मुलगा. गावी गेलो की नकी visit karin. Thank you Bro & keep it up.
@sanjivanithakur7151
@sanjivanithakur7151 2 года назад
👌 Informative video 👍 khup mst 😍
@harshad9212
@harshad9212 2 года назад
Interesting bhaut hard
@swanandinerurkar8648
@swanandinerurkar8648 2 года назад
Amazing 👏 😯
@SAMEEOK
@SAMEEOK 2 года назад
👌🏻👌🏻 Superb 👌🏻👌🏻
@sunilghagare1579
@sunilghagare1579 2 года назад
वरची देवली, ( चव्हाण ) माझा आजोळ 👍
@geetagothal1247
@geetagothal1247 2 года назад
Khup chhanaapalya sanskrutechi asmita. Ticha dhyas tumha navatatunanmadhe aahe hach motha anand
@shilpashirodkar811
@shilpashirodkar811 2 года назад
आम्हाला घरांत बसून बघायला छान वाटले पण तुला खूप कष्ट करावे लागतात
@sindhudurgproperties1086
@sindhudurgproperties1086 2 года назад
मस्त संचित
@rashmisatam6946
@rashmisatam6946 2 года назад
Ek no vedio ati sundar vlogs
@pravinwaghmare1262
@pravinwaghmare1262 2 года назад
Hi sanchit superb khup divasani kahi tari navin gheun alas thanks tithe ajun pn kahi tari tractutre asu shakt
@cinnamenaaa
@cinnamenaaa 2 года назад
Khup chhan thikan dakhavalas tu aamhala gharat basun baghayla milal tuzyamule dhanyavaad pn tula ek request aahe kam June aahe varun udi marlis tevha bhiti vatli sambhalun kalji ghe jara tuzi aani ashach navnavin video amhala dakhvat raha God bless you 🙏
@santoshnalavade8404
@santoshnalavade8404 2 года назад
🙏खुप छान 👌ग्रामस्ताने विहिरीतील गाळ काढला तर बर होईल पुरातन विहीर आहे. पाणी भरपूर असणार तेही थंड गार गावाला ऐक नवी ओळख मिळेल. धन्यवाद 🙏🚩🇮🇳
@vijaymestry9905
@vijaymestry9905 2 года назад
सुंदर निसर्ग सौंदर्य विडीओ👌🌿🌿
@shalakabhosale8368
@shalakabhosale8368 2 года назад
Nice 👌👌👌👌
@vijayakute1806
@vijayakute1806 2 года назад
👍👍 nice
@prakashnarsale6264
@prakashnarsale6264 2 года назад
Khup chaan
@deepashreegharat4636
@deepashreegharat4636 2 года назад
Superb 😃👍👍
@sumantnandoskar6205
@sumantnandoskar6205 2 года назад
Great👍👏👏
@TraditionswithaTwistbyDrMadhav
@TraditionswithaTwistbyDrMadhav 2 года назад
Amezing
@chittaranjansable1066
@chittaranjansable1066 2 года назад
Khup Chan.
@rajashrighadi116
@rajashrighadi116 2 года назад
Khupch sundar 👍
@ujwalabhawsar3233
@ujwalabhawsar3233 2 года назад
चिंचोळी पट्टी असलेली विहीर बघितली आपण छान वाटलं बघून. पावसाळय़ात पाणी असल्यावर कशी दिसेल ह्या बद्द्ल उत्सुकता निर्माण झाली. आमच्या इकडे जळगाव जवळ पद्मालय ठिकाण आहे. तिथे भीम ज्या जात्यावर दळण दलायचा ते मोठ्ठ जातं पण आहे. आणि त्या काळची भली मोठी घंटा आहे. भीमाचा पाय उमटलेला ठसा .पांडवांचे वास्तव्य होते त्याठिकाणी. Like (आवड्ला)
@shenajshaikh3124
@shenajshaikh3124 2 года назад
Khup chan vihir dakvlis.
@harshuchavan3151
@harshuchavan3151 2 года назад
Amazing 🔥👍
@dharmendrajadhav4907
@dharmendrajadhav4907 2 года назад
Bhari channel aahe yaar tuze, I like it.👍👍
@radhabhaiprabhu1875
@radhabhaiprabhu1875 2 года назад
Sundar video
@sushantgaikwad4772
@sushantgaikwad4772 2 года назад
Mast
@ramchandrapatil13
@ramchandrapatil13 2 года назад
Good
@rupeshirmal8055
@rupeshirmal8055 Год назад
Nice
@satishpisat9727
@satishpisat9727 2 года назад
Very informative bhuyari vihir 💐👌👌
@ketanj4600
@ketanj4600 2 года назад
छान, साफसफाई नीट झाली तर कातळ शिल्प पण सापडु शकतील👍
@TheShashin
@TheShashin 2 года назад
विलोभनीय 🙏🙏
@uttamraodeshmukh7454
@uttamraodeshmukh7454 2 года назад
श्री प्रविण मोहन यांना कळविले या बाबत तर ते प्रत्यक्ष भेट देऊन यावर त्यांचा दृष्टीकोन आपणास सांगू शकतील
@sachinugale9228
@sachinugale9228 2 года назад
खूप छान, मी नगर मधून.
@vikeshghadivlogs
@vikeshghadivlogs 2 года назад
👍👍👍👍
@alkamore6452
@alkamore6452 2 года назад
तुम्ही खूप धाडसी आहे👌🏿
@vijaymestry9905
@vijaymestry9905 2 года назад
👍1⃣🌿🌿अभिनंदन🎉🎊 सुंदर विडीओ👌 जुना ठेवा. 👍
@atulgodambe9425
@atulgodambe9425 2 года назад
खुप सुंदर
@vinayakshingare3431
@vinayakshingare3431 2 года назад
संशोधन होणे गरजेचे आहे🙏🌹
@arunatallur7301
@arunatallur7301 2 года назад
Great👍work bhau,
Далее
Dangerous Journey to India’s Loneliest Village
20:50