खूप छान मुलाखत.निनाद च बोलणं अभ्यासपूर्ण आहे.विशेष गोष्ट अशी की निनाद सारख्या नवीन कलाकाराचं बोलणं ऋजुता देशमुख ज्या कौतुकाने,तन्मयतेने ऐकत आहेत हे बघून छान वाटलं
श्री जय जय रघुवीर समर्थ. रामदास स्वामींचे जीवनावर आधारित चित्रपट येऊन. छान काम झाले. सर्व कलाकार. स्क्रिप्ट रायटर, सिंगर आणि. डायरेक्टर ,प्रोड्युसर, सर्वांचे आभार मानतो.
आजसिनेमा बघुन आलो. छत्रपती शिवाजी महाराज फक्त रामनवमी सारख्या उत्सवांना अनुदान द्यायचे इथपर्यंतच दोघांचा संबंध होता. असे दाखविण्यात आल्याचे बघुन अचंबा वाटला. त्यातसुद्धा अनुदान वेळेवर पोहोचले नाही म्हणून उत्सवाची सर्व तयारी झाल्याने ते अनुदान समर्थ रामदास स्वामी खलिता लिहून छत्रपती शिवाजी महाराजांना परत पाठवितात. कदाचित ही गोष्ट खरी असेलही पण नेमकी तीच् बाब चित्रपटात धरली आहे. एकंदर रघुवीर गाभा हरवलेला चैतन्यहीन चित्रपट. ज्या कार्यासाठी समर्थांचा जन्म झाला आहे ते मुख्य कार्य डावलून समर्थांचे इतर कार्य दाखविण्याने चित्रपटाने आत्मा हरविल्याचा अनुभव येतो.