Тёмный

एकाच वेळी असं घडलं....एक नाही.. दोघे सोडून गेले... हवं तुमचा साथ...🙏🙏 

Simply Swadisht
Подписаться 1,1 млн
Просмотров 265 тыс.
50% 1

Simply Swadisht is a food channel,in which differnt variety of recipes are shown which are easy to make and tasty too.
To order Simply Swadisht
Aagri masala,garam masala and Haldi powder
whatsapp message on - 9920093848
email- simply.swadisht@gmail.com
For sponsorship and business enquires 👇
simply.swadisht@gmail.com
simply swadisht special aagri masala process- • चला लवकर ऑर्डर करा..रं...
facebook- / simplyswadishtbybharat...
instagram- / simplyswadisht

Опубликовано:

 

1 мар 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 2,1 тыс.   
@pushpamhatre8158
@pushpamhatre8158 Год назад
तुमचं दुःख ऐकून खूपच वाईट वाटते,पण भारती जगरहाटी चालू राहील. जितकं जमेल तसे आम्ही सहकार्य सर्व करतील, अशी आशा करूया.तुमची आई, आणि तुमचे मिस्टर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.🙏🙏
@jaibheem5095
@jaibheem5095 Год назад
फार मोठे संकट कोसलले आहे तुमच्यावर. आम्ही तुमच्या सोबत आहोत. देव तुम्हाला शक्ती देवों .
@rangolisarita6284
@rangolisarita6284 Год назад
दोघांनाही भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏💐💐 ईश्वर तुम्हाला या संकटातून बाहेर पडण्याची शक्ती देवो
@sujatabhurke7985
@sujatabhurke7985 Год назад
दोघांनाही भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻🙏🏻
@rekhaalvekar3843
@rekhaalvekar3843 Год назад
ताई,म्हणत,र😅अहा,ई,अल्वेस,😅
@arunpatil6947
@arunpatil6947 Год назад
फार मोठ संकट तुझ्यावर कोसळलेले आहे, तुला याच्यातून बाहेर पडण्याची शक्ती देवो हीच परमेश्वरlकडे प्रार्थना,🙏🙏
@avinashjadhav3029
@avinashjadhav3029 Год назад
🙏💐💐
@rekhapatil8618
@rekhapatil8618 Год назад
भावपूर्ण श्रद्धांजली दोघांना 🙏🏻....... ताई खूप मोठं दुःख आलं तुझ्या वाट्याला.पण त्यातून तू खंबीरपणे उभी रहा.आम्हा सर्वांची तुला सदैव साथ राहील.
@sangeetamirashi9667
@sangeetamirashi9667 Год назад
बापरे मी तर एकून खूप शॉक झाले आणि वाईटही खूप वाटले पण मॅडम तुम्ही खंबीर रहा आम्ही तुमच्या बरोबर आहोत भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏
@B-xe7cj
@B-xe7cj Год назад
दुःख सहन करण्याची शक्ती परमेशवर तुम्हाला देवो , सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत । काळजी घ्या।
@shilpadevlekar9932
@shilpadevlekar9932 Год назад
ताई फार वाईट वाटले हे ऐकुन आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत तु स्वतःला सांभाळ आणि मुलांची काळजी घे सगळे काही ठिक होईल बाप्पा🙏 तुझ्या पाठीशी उभे आहेत
@rameshpandit712
@rameshpandit712 Год назад
दोघांनाही भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐 आपण या दुखातून बाहेर पडाल असा विश्वास आहे. आणि आपल्या बोलण्यातून तो विश्वास जाणवत आहे. जगणे आले त्यामुळे कणखर होणे गरजेचे आहे. 🙏🙏
@meenavijay7539
@meenavijay7539 Год назад
दोघांना भावपूर्ण श्रध्दांजली 🙏💐श्री स्वामी समर्थ माऊली तुम्हाला ह्या दुःखद प्रसंगातून सावरण्याची शक्ती देवोत 🙏❤️
@alkapingle9552
@alkapingle9552 Год назад
दोघांनाही विनम्र श्रद्धांजली 🙏🌹, भारती तुम्ही खूप कठीण प्रसंगातून जाताय , तुम्हाला परमेश्वर दुःख पचवण्यासाठी शक्ती देवो,आपला परिवार तुमच्या बरोबर आहे, तुम्ही तुमचे काम चालू ठेवा 🙏 !!
@sunandawalunj5673
@sunandawalunj5673 Год назад
,
@sunitagaikwad6336
@sunitagaikwad6336 Год назад
खूप खूप वाईट वाटलं भारती तुला खूप कठीण प्रसंग तून जाताय परमेश्वर तुला पाठीशी राहो दोघांनाही विनम्र श्रद्धांजली
@vibhavaribarve5049
@vibhavaribarve5049 Год назад
tuzhya dukhat sahabhagi ahe
@pradnyatambe9685
@pradnyatambe9685 Год назад
खूप धक्का बसला ऐकून. स्वतःच दुःख गिळून इतक्या धीराने तू उभी राहतेयस त्याबद्दल तुला सलाम आहे. काळजी करू नकोस बेटा, सगळं नीट होईल पुढे.आम्ही सोबत आहोतच.काळजी घे😢💐
@ushamahapadi3645
@ushamahapadi3645 Год назад
Shocke Hats off you 😰🕉
@pramilaghumare
@pramilaghumare Год назад
Salam ahe tai.parmeshvr shakti deo joprnnt canal toparyt amchi sath asnar tai.
@alkarrsakpal9753
@alkarrsakpal9753 Год назад
No tanshen no vichar mast raah and you are100/right God bless you madam
@rekhapatre6846
@rekhapatre6846 Год назад
भारती... तुझ्यावर दु:खाचा डोंगर कोसळला असताना देखील तू हिमतीनं उभी राहिली आहेस ... तुझं खूप खूप कौतुक आहे ... तू अजिबात न डगमगता पुढे जात रहा... आम्ही कायम तुझ्याबरोबर आहोत... काळजी घे ...
@aartijadhav6313
@aartijadhav6313 Год назад
दोघांनाही भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏🙏💐 ईश्वर तुम्हाला या संकटातून बाहेर पडण्याची शक्ती देवो 😔😔
@rupalivengurlekar3899
@rupalivengurlekar3899 Год назад
भावपूर्ण श्रद्धांजली दोघांना 🙏💐💐.श्री स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत🙌🙌
@shubhangisonawane7712
@shubhangisonawane7712 Год назад
भारती तुझे दुःख खूप मोठे आहे.काळजी करू नको कामात सातत्य ठेव. तुला नक्की यश मिळणार. बेस्ट ऑफ लक👍💐
@foodart1995
@foodart1995 Год назад
ताई,खरंच आम्ही तुमच्या दुःखाचा अंदाज ही नाही लावू शकत.. Stay strong 👍🏻...आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत त्याबद्दल तुम्ही अगदी निश्चिन्त रहा... एवढ्या मोठ्या आभाळा एवढ्या दुःखातून बाहेर येण्याचा तुम्ही जो प्रयत्न करत आहात त्यात आम्ही नेहमी तुमच्या सोबत असणार आहोत 🙏🙏
@shobhanakadam7595
@shobhanakadam7595 Год назад
दोघांना भावपूर्ण श्रद्धांजली परमेश्वर आपणास सावरण्याची शक्ती देवो .. आम्ही आहोतच तुमच्या सोबत 🙏
@poojasubhedar465
@poojasubhedar465 Год назад
भारती तुझ्या आईला आणि मिस्टर याना भावपूर्ण श्रद्धांजली.एवढं मोठं दुःख सहन करण्याची तुला स्वामी ताकद देवो. ही स्वामी चरणी प्रार्थना.
@usharajbahadur4853
@usharajbahadur4853 Год назад
🙏🙏
@sunitashrigadi6750
@sunitashrigadi6750 Год назад
🙏🙏
@Amhi_Swamibhakt.
@Amhi_Swamibhakt. Год назад
स्वामी सदैव तुमच्या सोबत असूदेत हीच स्वामी महाराजांच्या चरणी मनापासून प्रार्थना.. अजिबात काळजी करू नका ताई... स्वामी महाराज सगळं ठीक करतील...काळजी घ्या.. श्री स्वामी समर्थ 🌹
@sampadabhatwadekar2387
@sampadabhatwadekar2387 Год назад
ऐकताना आमच्या च डोळ्यात पाणी आलं . तुमची तर जीवाभावाची माणसं .सांगताना डोळ्यात पाणी येणारच . भावपूर्ण श्रद्धांजली . देव तुम्हाला बळ देवो . हे डोंगराएवढं दुःख पचवायला .
@vaijayantasalvegoodbetterb8118
दोघांनाही भावपूर्ण श्रद्धांजली.देव तुला शक्ती देवो.
@rashmiborkarrecipes3808
@rashmiborkarrecipes3808 Год назад
बापरे🥺🥺🙏आई आणि भाऊंना भावपुर्ण श्रध्दांजली 💐💐तुझे डोंगरा इतके दुखः पचवण्यासाठी श्री समर्थांनी तुला ताकद देवो🙏
@simpkn947
@simpkn947 Год назад
भारती ताई तुला नेहमीच तुला आमची साथ मिळेल..टेंशन घेऊ नकोस सगळं व्यवस्थित होईल..हे पण दिवस निघून जातील.परमेश्वर तुला हे दुःख सहन करण्यास ताकद देवो...आणि तू रेसिपीचे व्हिडीओ टाकायला सुरवात कर.. सर्वांनी भारती ताईचे व्हिडीओ पहा आणि शेअर करा..जेणेकरून तीला आपला सपोर्ट मिळेल. प्रसाद दादा आणि आई कुठून तरी तुला बघत असतील तू स्ट्रॉंग रहा...
@jyotimhatre9185
@jyotimhatre9185 Год назад
भारती आम्ही तुझ्या दुःखात सहभागी आहोत.देव तुला दुःख पचवण्याची टाकत देवो.दोघांनाही भावपूर्ण श्रद्धांजली .🙏🙏
@kanchanmane9090
@kanchanmane9090 Год назад
तूझ्यावर.मोठे संकट होता हे समजले आहे तू खंबीरपणे उभी रहा तूला सांगणे सोपे आहे पण तूआणि तूझ्या मुलांबरोबर खंबीर हो. दोघांना ही माझ्या परिवाराकडुन भावपूर्ण श्रद्धांजली
@spp4708
@spp4708 Год назад
अरे बापरे... खूप भयंकर धक्का बसला.... देव तुला दुःख सहन करायची ताकद देवो... आम्ही सर्व तुझ्यासाठी देवाकडे प्रार्थना नक्कीच करू🙏
@charulatawaghmare2264
@charulatawaghmare2264 Год назад
Doghana hi bhavpurna shradhanjali . Dev tumhala ya dukhatun baher padnyachi shakti devo. Amhisarv tumcha barobar ahot.
@Shubhpriyamejwani
@Shubhpriyamejwani Год назад
तुमच्या आई आणि मिस्टर यांना भावपूर्ण श्रद्धांजली... 🙏🙏🙏 देव तुम्हांला इतकं मोठं दुःखातून सावरण्यासाठी शक्ती व धीर देवो हीच परमेश्वरा जवळ प्रार्थना.... ताई तुम्ही एकटे नाही आम्ही आहोत तुमच्या सोबत....
@rekhabalekundri6715
@rekhabalekundri6715 Год назад
तुमच्या आई व मिस्टराना भावपूर्ण श्रद्धांजली , भारती तुम्हाला खूप मोठ दुःख पेलाव लागल आहे देव तूम्हाला इथुन पुढच्या वाटचालीत साथ देवो व आम्ही ही तुमच्या सोबत आहोत
@sonalis5768
@sonalis5768 Год назад
ताई हे सर्व दुःख पचवायला ईश्वर तुला ताकद देवो 🙏 माझा पण लहान भाऊ जानेवारी मध्येच वारला, त्यामुळे किती त्रास होतोय हे चांगलंच माहितेय, अजुन पण पुन्हा उभे राहण्याची ताकद होत नाहीये आम्हाला 😢 U r vry Strong diii👍
@manishakelkar6151
@manishakelkar6151 Год назад
सलाम तुम्हाला ताई पुन्हा तुम्ही नव्याने उभ्या राहिल्या त्या बद्दल सगळं व्यवस्थित होईल घाबरू नका हिम्मत ठेवा भगवंत आहेत तुमच्या सोबत
@MUKESHPATILVLOGS
@MUKESHPATILVLOGS Год назад
आज तुम्ही व्हिडिओ टाकला बरे वाटले. समजू शकतो आपण या काळात किती दुःखाला सामोऱ्या गेला असाल. पण तुम्ही पुन्हा नव्या आशेने उभ्या आहात हेच खूप आहे. आपल्याला खूप खूप शुभेच्छा . 🙏🙏
@snehamohite4729
@snehamohite4729 Год назад
💐 ताई ...स्त्री इतका मजबूत कोण नाही...
@meghadambir.2494
@meghadambir.2494 Год назад
दोघांनाही भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏 ताई ग्रेट आहात तुम्ही...स्वामींची कृपा सदैव राहो...तुम्हाला ताकद मिळो खंबीर उभे राहण्यासाठी हीच स्वामी चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏
@aryapanchal6189
@aryapanchal6189 Год назад
ताई बातमी ऐकून डोळ्यात पाणी आले. स्वामी सदैव तुमच्या पाठीशी आहेत. तसेच आम्ही पण आहोतच.
@aishwaryanaik9803
@aishwaryanaik9803 Год назад
आम्ही सर्व तुमच्या दुखा:मध्ये सहभागी आहोत. हिमतीने पुन्हा उभे राहून आयुष्याचा पुढचा प्रवास तुम्ही चालू ठेवाल, अशी आशा आणि ईश्वराजवळ हीच प्रार्थना 🙏
@sunilbhosale3432
@sunilbhosale3432 Год назад
परमेश्वर सदैव तुमच्या पाठीशी राहील. खचून जाऊ नका. हे एक कधीही न संपणारे चक्र आहे. तुमच्या दुखत आम्हीही सहभागी आहोत. ईश्वर तुमचे कल्याण करो. आमची साथ आहेच.
@suvarnasande7685
@suvarnasande7685 Год назад
खरच khup मोठ्या sankatatun जाताय तुम्ही, Parameshwar तुम्हाला khup dhadas देवो हि eccha
@user-gs3lg6wm1r
@user-gs3lg6wm1r Год назад
Tai मजबूत व्हा कारण जाणारा गेला पण जे सोबत आहेत त्यांचा विचार केला पाहिजे उलट असा विचार करा की त्यांना होणाऱ्या त्रासातून ते सुटले आणि आता कुठेतरी ते सुखात आहे आणि निरोगी आहेत असा विचार करा आणि व्हा पुढे....all the best 💗
@vaishalisabnis1962
@vaishalisabnis1962 Год назад
ऐकून खूप वाईट वाटले... परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो... तुम्ही काळजी करू नका... आपण सर्व subscriber तुमच्या सोबत आहोत...god bless you & your children & your family.
@animelover-rg5mj
@animelover-rg5mj Год назад
दुःखाचा डोंगरच कोसळला तुमच्यावर. ऐकून खूपच वाईट वाटले. तुम्हाला भरपूर सक्सेस मिळो हीच देवाच्या चरणी प्रार्थना
@rajendraraut1822
@rajendraraut1822 Год назад
आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत ,तुमच्या रेसिपी हया आधीही पहात होतो व ह्या पुढेही नक्कीच पाहू , तुम्हाला ईश्वर नक्कीच शक्ती देईल ,
@saigadekar3796
@saigadekar3796 Год назад
बापरे ताई किती मोठ दुख तुम्ही पेलले. आम्ही तुमच्या बरोबर आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली 🙏😥
@rashmimorje3451
@rashmimorje3451 Год назад
तुमचे दु:ख फार फार मोठे आहे. पण आम्ही म्हणजेच सिंपली स्वादिष्ट परिवार तुमच्या सतत सोबत आहे. देव तुम्हाला खूप खूप शक्ती देवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुमच्या मुलांना आशिर्वाद.
@jyotidesai8671
@jyotidesai8671 Год назад
वैरी जरी असला तरी असा प्रसंग परमेश्वराने कुणावरही आणू नये. ताई तुम्हाला ईश्वर तुमच्या व्यवसायात यश देवो अशी प्रार्थना करते.व‌ तुमची जिद्द तुमच्या मुलांना‌ यशस्वी व मोठे करेल.
@ashwinimangaonkar2273
@ashwinimangaonkar2273 Год назад
प्रथम दोघांना भावपूर्ण श्रद्धांजली. तुम्ही खूप धीट अहात, तुम्ही असचं तुमचं काम करत रहा. ईश्वर तुम्हाला हिंमत देईल आणि तुमच्या कामात यश देईल
@swapnapednekar4578
@swapnapednekar4578 Год назад
खरच खुप मोठे संकट आले. दोघांना भावपूर्ण श्रद्धांजली. देव तुम्हाला शक्ती देवो.
@nitingolatkar7973
@nitingolatkar7973 Год назад
Our Simply Swadisht pariwar will always be behind you . Wish you all the courage and success in your future endeavours 👍
@chinmaynasre4564
@chinmaynasre4564 Год назад
तुमचे दुःख खूप मोठे आहे ह्या दुःखाची झळ थोडी फार मीही सोसली आहे तरी तुम्ही तुमचे दुःख बाजूला सारून हिंमतीने उभ्या राहिल्या त्या हिम्मतीला सलाम देव तुम्हाला अधिक बळ देवो हीच देव पुढे पार्थना तुम्ही अशीच प्रगती करा
@meenalj1203
@meenalj1203 Год назад
ताई तुझे डोंगराएव्हढे दु:ख पचवून तू उभी राहिली आहेस. अशीच खंबीर रहा. आमची तुला नेहमीच साथ असेल.
@sangeetasawant9385
@sangeetasawant9385 Год назад
Stay strong we are with you n your channel will grow a lot shri Swami Samarth 🙏🙏
@shardabhandari7277
@shardabhandari7277 Год назад
संयम धर शांत रहा मुलांकडे लक्ष दे. देव तुला शक्ती देवो. तुझ्या मेहनतीला नक्की यश मिळेल.
@mangaljagtap....1304
@mangaljagtap....1304 Год назад
Ho
@neelamchaudhari426
@neelamchaudhari426 Год назад
आज व्हिडिओ पाहिला तुमचे दुःख ऐकून फार वाईट वाटले. इतक्या दुःखातून उभे राहिलात हेच खूप मोठे आहे.ईश्वर चरणी प्रार्थना आहे ह्या व्यवसायात यशस्वी व्हा.
@namratashinde2374
@namratashinde2374 Год назад
खूप वाईट वाटलं ताई तुझ दुःख ऐकून, आम्ही तुझ्या दुखः मध्ये सहभागी आहोत. सुख आणि दुःख प्रत्येकाला येतात. पण आपण पुढे चालत rahayach असत. आता खंबीरपणे उभी रहा.आम्ही सगळे आहोत तुझ्या बरोबर.
@sushamarane2623
@sushamarane2623 Год назад
फारच मोठ्या संकटातून गेलात तुम्ही देव तुम्हाला त्यातून बाहेर पडण्यासाठी ताकद देवो. आम्ही तर सदैव तुमच्या सोबत आहोत
@shubhanadkarni7056
@shubhanadkarni7056 Год назад
दोघ्याच्या ही आत्म्याला भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏
@minals2151
@minals2151 Год назад
नमस्कार दीदी, ऐकून खरंच खूपच वाईट वाटले, खरच तुम्ही खूप धीराच्या आहात, दोघांनाही भावपूर्ण श्रद्धांजली🙏🙏
@kavitabhandari4849
@kavitabhandari4849 Год назад
ताई यैकुन खूप धक्का बसला,पन बर वाटल तू धिराने पुन्हा उभी राहातेस ते,All the best for your future career
@charulatadhawale8297
@charulatadhawale8297 Год назад
परमेश्वर तुम्हाला खुप शक्ती आणि धीर देवो 🙏
@samiroy5158
@samiroy5158 Год назад
काळजी करू नका ताई परमेश्वर तुमच्या संगति आहे. God bless you abundantly🙏
@sonchafa25
@sonchafa25 Год назад
God bless you tai
@sanjanawalekar1034
@sanjanawalekar1034 Год назад
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏 तुम्ही खूप मोठ्या संकटातून बाहेर पडला आहात...पुढील वाटचाली साठी देव तुम्हाला शक्ती देवो...आम्ही तुमच्या सोबत आहोत....
@latikashelke1727
@latikashelke1727 Год назад
ताई ,सलाम तुझ्या जिद्दीला ,,परमेश्वर तुला दुःख सहन करून ,पुन्हा उभ राहण्याची ताकद देवो ,,ही प्रार्थना
@rachanapednekar6069
@rachanapednekar6069 Год назад
भारती ताई दोघांनाही भावपूर्ण श्रध्दांजली खुप वाईट वाटले
@priyankagurav8163
@priyankagurav8163 Год назад
खुप मोठ दुःख आहे असं दुःख कोणाच्या वाट्याला पण येऊ नये , भारती ताई तुम्ही खुप strong आहात , तुम्ही स्वतःला सांभाळा तुमच्या मागे तुमचा परिवार आहे तो तुम्हाला सांभाळायचा आहे , आम्ही तुमच्या पाठीशी आहोत 🙏🙏काळजी करू नका आम्ही video तुमचे आवडीने पाहतो आणि follow सुद्धा करतो
@anushkagole1540
@anushkagole1540 Год назад
आई आणि तुमच्या मिस्टराना भावपुर्ण श्रद्धांजली 🙏😥 खूप वाईट झाले. आम्ही तुमच्या सोबत आहोत.
@RiddhiCreation
@RiddhiCreation Год назад
दोघांनाही भावपूर्ण श्रद्धांजली. बातमी ऐकून खुप वाईट वाटलं. बाप्पा तुला दुःख पोचवायला शक्ती देतीलच. भारती तु खुप धीराची आहेस. तुला वेळ मिळेल तस काम चालू ठेव. माझी तुला साथ आहे.
@shitaldavane7506
@shitaldavane7506 Год назад
खुप मोठं संकट तुमच्यावर कोसळलं आहे भारती, पण आता तुम्हाला खंबीर उभं राहणं गरजचं आहे. समर्थ तुम्हाला शक्ती देवो. आणि देब मृतात्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना.
@saraswathivenkatkrishnan5104
May god give you strength to bear this loss. It is very painful to even hear. We will definitely support you.
@tejasmhatre7750
@tejasmhatre7750 Год назад
ताई फार वाईट वाटलं हे ऐकून .आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत तु स्वतःला सांभाळ मुलांची काळजी घे.
@vaibhavithakur7321
@vaibhavithakur7321 Год назад
दोघांनाही भावपूर्ण श्रद्धांजली🙏... देव तुम्हाला या दुखःतून बाहेर येण्याची ताकद देवो..🙏 आम्ही तुमच्या सोबत नेहमीच आहोत
@nilamlande3912
@nilamlande3912 Год назад
स्वामी समर्थ महाराज ...तुम्हाला शक्ती देवो हीच प्रार्थना स्वामींच्या चरणी .....🙏😭
@manishapawar4180
@manishapawar4180 Год назад
श्री स्वामी समर्थ तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला या परिस्थितीतुन सावरण्याची शक्ती देवो🙏 स्वामी सतत सोबत आहेत तुमच्या श्री स्वामी समर्थ🙏
@minalpashte4278
@minalpashte4278 Год назад
एैकुन खुप वाईट वाटले तु धीराने उभी रहा हींम्मत हारु नकोस तु कामात बीझी रहा परमेश्वर तुझ्या पाठीशी सैदव पाठीशी राहील 🙏🙏🙏🙏🙏
@sangitapatil6229
@sangitapatil6229 9 месяцев назад
ताई सर्वात आधी तुमच्या आई आणि मिस्टरांना श्रद्धांजली भगवन्त त्यांच्या आत्म्याला शांती देवो 🙏🙏💐💐 ताई तुम्ही सिम्पली स्वादिष्ट ला कुटुंब म्हणवताय ना मग आपल्या कुटुंबामध्ये मन मोकळे करायलाच हवे ते तुम्ही केले ते फार बरे झाले ताई खचून जाऊ नका आणि तुमची हिम्मत अशीच ठेवा ज्यावेळी ती खचायला करेल त्या वेळी मुलांच्याकडे बघून घ्यायचे तुम्ही ज्या दुःखाला सामोऱ्या जात आहात ते फार मोठे आहे पण आपल्याला हळू हळू पुढे जावेच लागेल खरं तर तुमच्या रेसिपी इतक्या छान आसतात त्यामुळे तुम्हाला भरभरून लाईक मिळतील . ताई दयेची भावना म्हणून नाही तुमच्याशी असे बोलत मी पण तुमचा स्वाभिमान वाढवा , टिकावा म्हणून एवढे बोलले
@SimplySwadisht_BharatiMhatre
@SimplySwadisht_BharatiMhatre 9 месяцев назад
thank u so much for your support. asach sath det raha
@vrushalihanamshet5700
@vrushalihanamshet5700 Год назад
खूप वाईट वाटते हे ऐकून आम्ही नक्की सपोर्ट करू श्री स्वामींचा कृपेने तुम्ही स्ट्राँग व्हायला पाहिजे
@snehalatatawade6892
@snehalatatawade6892 Год назад
Sorry for your great loss. May you get the strength to get through this tough time. Our deepest condolences 🙏 and Best wishes for your endeavors.
@varshashetye9327
@varshashetye9327 Год назад
Sorry to hear about your loss, Tai. Please stay strong. We are always with you.
@yojanagudhe9466
@yojanagudhe9466 Год назад
दोघांना भावपूर्ण श्रद्धांजली. भारती आमचा परिवार तुझ्या सोबत आहे . काळजी घे सगळ ठीक होईल.
@1993dranzer
@1993dranzer Год назад
अत्यंत दुःखद प्रसंग आहे हा. !! ह्या दुःखातून सावरण्याची ताकत परमेश्वर तुम्हाला देवो. मुलांची काळजी घ्या. शब्द अपुरे पडत आहेत. ओम शांती.🙏🙏
@meenakshi4633
@meenakshi4633 Год назад
या दुःखातून सावरण्याची ..तुम्हाला .देव .शक्ती देवो. हेच माझ्याकडून परमेश्वराला प्रार्थना🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@manishamore1378
@manishamore1378 Год назад
ताई तु हे सांगताना माझ्या डोळयात पाणी आले.😥😭पण तु strong आहेस ...तु आशीच हसुन खेळुन राहा....तुम्हाला पुढच्या वाटचालीची शुभेच्छा ....god bless you ताई ...दादा आणि आईला भावपूर्ण श्रद्धांजली 💐
@jyotibidgar54
@jyotibidgar54 Год назад
भावपूर्ण श्रद्धांजली आई आणि तुमच्या मिस्टराना💐💐 आयकुन खुपचं वाईट वाटले ताई.
@yogitapatil9146
@yogitapatil9146 Год назад
तुमच्या आयुष्यातील हा कठीण प्रसंग आहे देवाकडे इतकीच प्रार्थना की देव परिवाराला या दुःखद घटनेतून सावरण्याची शक्ती देवो 🙏भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏🏻💐😢 त्यांच्या आत्म्यास चिर:शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना !
@riyahare1809
@riyahare1809 Год назад
दोघांना भावपूर्ण श्रद्धांजली🙏🙏
@nileemakeskar3870
@nileemakeskar3870 Год назад
Heartfelt condolences... Stay strong dear... My prayers r with u... May God bless you and ur dear children n give u all strength to bear this big loss..
@rajanbhagwat9908
@rajanbhagwat9908 6 месяцев назад
Khar tar ha video mi khup uahora पाहिला...वाईट वाटल ऐकून... आपलं दुःख काय असेल याची कल्पना नाही करता येणार..पण तुम्ही तुमच्या आयुष्याचा हा काळ channel chya माध्यमातून व्यक्त zalat हे चांगल केलं...तुमच हे चॅनल तुमच कुटुंबच आहे आणि आता मी सुद्धा याचा अंशतः भाग आहे....अतिशय मोकळेपणाने आणि समतोलाने तुम्ही अपल म्हणणं स्वच्छपणे आणि आपलेपणाने मांडला आहात.....आहात....हेच आपलं कुटुंब तुम्हाला सावरेल अशी खात्री वाटते.... अधिक काय बोलू? स्वतःला जपा...
@pritigeorge6543
@pritigeorge6543 9 месяцев назад
Tai..मी तुझे सगळे रेसिपीज बघते पण ही न्यूज मला खूप उशिरा कळाली .धीर धर सगळे चांगलं होईल पुढे.आम्ही सगळे तुझ्यासोबतत आहोत
@seemabhalerao1574
@seemabhalerao1574 Год назад
ऐकून खूप मोठा धक्का बसला. धीर धरा, खचून जाऊ नका. आम्हा सर्वांची तुम्हाला साथ असेल, देव तुम्हाला शक्ती देवो.
@user-eu1ks9oj9i
@user-eu1ks9oj9i Год назад
Khoup vait zaale. Me he samju shakte. Karan me pan maza taroon. Mulga karona mdhey gamavla hey doukhh. Aabhla yevhde aahe
@rohinikatare5958
@rohinikatare5958 Год назад
भावपूर्ण श्रध्दांजली
@CHARVIARTANDFOOD
@CHARVIARTANDFOOD Год назад
दोघांनाही भावपूर्ण श्रद्धांजली,🙏
@sujathakarkera3286
@sujathakarkera3286 Год назад
May your Mother & Husband soul Rest in Peace. You are inspiration to women who lost their family members. We are always with you my baby.
@priyankaawale5969
@priyankaawale5969 Год назад
Simply swadisht हे कुटुंब आहे तू खूप मोठ्या संकटातून हिंमतीने उभी राहिली आहेस तुझा खूप अभिमान आहे . आई आणि तुझ्या मिस्टरांनी तुला खूप खूप पाठिंबा दिला होता ते नेहमीच चॅनल्सवर दिसत होते त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली . तू खूप मेहनती आहेस. खूप पुढे जाशील तुला टीव्ही वर ही बघायचे आहे तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा💐
@sangeetadalvi32
@sangeetadalvi32 Год назад
आई आणि दादांना भावपूर्ण श्रद्धांजली.फार मोठे संकट आहे हे.स्वामी तुम्हाला हे दुःख पचविण्याची ताकद देवो.आम्ही आहोत तुमच्या बरोबर.काळजी घ्या.
@ujwalaphene8198
@ujwalaphene8198 Год назад
Bharati, I am so sorry for your loss, my thoughts and prayers are with you and your family. May God give you strength during these difficult times.
@shwetamahadeshwar3914
@shwetamahadeshwar3914 Год назад
Yes dear sister !!! It’s not easy to take the death of two important people of your life. Wish you strength and good luck for your rest of your life 🙏
@sushamabrid1478
@sushamabrid1478 Год назад
दोघांना भावपूर्ण श्रद्धांजली देव तुम्हाला या दुःखातून बाहेर पडण्यासाठी बळ देवो
@ashagad4163
@ashagad4163 Год назад
फारच touching आहे... प्रसाद सरांबरोबरचे तुमचे बरेच videos मी पाहिले आहेत. तुम्हाला परत उभे राहण्याचे बळ मिळो हीच सदिच्छा. I support you from my heart. ॐ शांती... प्रसाद सर 🙏🙏
@padmasuraj2924
@padmasuraj2924 Год назад
We will surely support you Bharti .stay strong and god bless you
@pritithale4224
@pritithale4224 Год назад
आईला आणि तुझ्या मिस्टराना भावपूर्ण श्रद्धांजली.देव तुला शक्ती देवो
@vilasparab2256
@vilasparab2256 Год назад
अस संकट कोणावर येऊ नये खरच घाबरू नका ! आमचे स्वामी तुला मदत.करतील
@TruptisKitchenKatta
@TruptisKitchenKatta Год назад
दोघांनाही विनम्र श्रद्धांजली🙏 आम्ही तुमच्या सोबत आहोत.
@sujataloke5186
@sujataloke5186 Год назад
Sorry to hear about your close family members. Heartfelt condolences to you and your family 🙏🏻
@madhurapatkar7839
@madhurapatkar7839 Год назад
Stay strong, you are truly an inspiration for many women out there !! You will go a long way, hats off and best wishes
@sweetu3012
@sweetu3012 Год назад
ताई खूप मोठे संकट कोसळले आहे.......तू खूप strong आहेस.....घाबरून जाऊ नको.....देव तुला शक्ती देवो.....स्वामी पाठीशी आहेत तुझ्या
@manishasardesai4087
@manishasardesai4087 Год назад
ताई,ऐकून खूपच वाईट वाटले, आम्ही आहोत तुमच्या पाठीशी खंबीरपणे रहा. दोघांना भावपूर्ण श्रद्धांजली.
@lalitaparihar2333
@lalitaparihar2333 Год назад
भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐 या कठीण काळात देव तुम्हाला शक्ती देवो🙏🙏
Далее
Zlatan embarrasses Speed 😂 #ishowspeed
00:32
Просмотров 2,7 млн