झरे मेघ आभाळी तेव्हा आपुलेच चार शब्द घ्यावे चिंब पावसात न्हावे चालीत गुंफून वाऱ्यास द्यावे बेहोश व्हावे क्षण कोलून प्यावे गुरुजी आपणांस कितींदा आठवावे🙏 शब्द आपुले उन्हात पाऊस घेऊन यावे.
वाह अप्रतिम रचना सर 👌👌👌 पावसात या चिंब भिजुनी थेंबांचे या शब्द व्हावे गुंफूनी त्या शब्दांना मग कवितेच्या झऱ्यात वाहावे झरझर झरतील शब्द असे हे नदीच्या मिलनास जावे होईल प्रीतीची अनुभूती मग कवितेच्या त्या स्वरात नहावे 😊 आपली कविता ऐकून मला सहजच सुचलेल्या ओळी
@@jkwriter25 you know what.. गुरू ठाकूर हि शाळा अनेकांना अनाहुतपणे आपल्यात दाखल करून घेत आहे. त्यांची ही संस्था त्यांच्या सारख्या अनेक कवींना तयार करून मोठी व्हावी. All the best to you 😊
पावसाच्या कविता अनेक वाचल्या, अनुभवल्या पण गुरू ठाकूर यांचे शब्द म्हणजे प्रत्यक्ष शब्दमोती आपणच विखरून पुन्हा तरल धाग्यात ओवण्याची अनुभूती देणारे.अप्रतिम 👌🏻
सर तुम्ही म्हणजे पावसाची आतुरतेने वाट पाहणारा चातक कवि. डोळ्यात अखंड साठवावे असा सुंदर हिरवा निसर्ग. कानात गुंजत राहावे अशी पावसाची रिपरिप. आणि मनात कायम आठवावे असे तुमचे शब्द काव्य.